Stock market today  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात पुन्हा तेजी; फार्मा शेअर्स जोमात, सेन्सेक्स 72,700च्या वर बंद

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 13 May 2024: सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारात चांगली रिकव्हरी दिसून आली. या चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स 112 अंकांनी वाढून 72,776 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 49 अंकांनी वाढून 22,104 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँकमध्येही चांगली वाढ झाली. निर्देशांक 333 अंकांनी वाढून 47,754 वर बंद झाला.

कोणते शेअर्स तेजीत?

आज शेअर बाजारात निफ्टी 50 च्या टॉप गेनर्समध्ये सिप्ला, एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स, डिव्हिस लॅब, अदानी एंटरप्रायझेस यांचा समावेश होता. सिप्ला शेअर्स 5.61 टक्क्यांनी वधारले.

आजच्या बाजारात टाटा मोटर्सच्या निकालानंतर हा शेअर खाली आला आणि तो 8 टक्क्यांनी घसरला. यासह ऑटो इंडेक्समध्ये मोठी विक्री झाली.

टाटा मोटर्स, बीपीसीएल, श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, ओएनजीसी या कंपन्यांचे शेअर्स निफ्टीमध्ये घसरले. आजच्या बाजारात, फार्मा, आयटी आणि बँकिंग शेअर्सनी बाजाराला खालच्या स्तरावरून पाठिंबा देण्यात मोठी भूमिका बजावली.

Share Market Today

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

बँकिंग, फार्मा, आयटी, एफएमसीजी, मेटल, रिअल इस्टेट, हेल्थकेअर क्षेत्रांचा शेअर बाजारातील वाढीमध्ये मोठा वाटा आहे. या क्षेत्रांव्यतिरिक्त मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदी झाली.

Share Market Today

निफ्टीचे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक त्यांच्या खालच्या स्तरावरून पुन्हा तेजीत आले. केवळ वाहन, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 16 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 14 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

S&P BSE SENSEX

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1 लाख कोटींची वाढ

आजच्या व्यवहारात, शेअर बाजारातील खालच्या पातळीवरून झालेल्या नेत्रदीपक वसुलीमुळे, बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप 397.55 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 396.55 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1 लाख कोटींची वाढ दिसून आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT