Share Market Opening Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराचा नवीन विक्रम; सेन्सेक्स-निफ्टी ऐतिहासिक शिखरावर, कोणते शेअर्स तेजीत?

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 27 May 2024: देशांतर्गत शेअर बाजाराने नवीन उच्चांक गाठला. निफ्टी प्रथमच 23,038 च्या पातळीवर उघडला. सेन्सेक्सने 75,655 ची पातळी गाठली. निफ्टी बँक 135 अंकानी वाढून 49,105च्या पातळीवर उघडला. आज, देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक संकेत चांगले दिसत आहेत.

या आठवड्यातील महत्त्वपूर्ण घटना कोणत्या?

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे निकाल 1 जून रोजी येणार आहेत. 30 मे रोजी यूएस जीडीपीची आकडेवारी जाहीर होणार आहे, तर 31 मे रोजी भारताच्या जीडीपीचे आकडेवारी येणार आहे. अमेरिकेत महागाईचे आकडे 31 मे रोजी जाहीर होणार आहेत, तर 1 जून रोजी भारताच्या वाहनांच्या विक्रीची आकडेवारी येणार आहे. त्यामुळे, हा आठवडा शेअर बाजारासाठी चढ-उताराचा असू शकतो.

Share Market Today

कोणते शेअर्स तेजीत?

बीएसई सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 19 शेअर्समध्ये तेजी आहे तर 11 शेअर्समध्ये घसरण होत आहे. सेन्सेक्सच्या टॉप गेनरमध्ये एचडीएफसी बँक 1.16 टक्क्यांनी वाढली आहे. कोटक बँक 0.99 टक्के आणि इंडसइंड बँक 0.93 टक्के आहे.

अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स 0.90 टक्के वाढले आहेत. भारती एअरटेलमध्ये 0.76 टक्के वाढ झाली आहे. विप्रोमध्ये 1.50 टक्क्यांची घसरण झाली. मारुती 1.20 टक्क्यांनी खाली आहे. एनटीपीसी, पॉवरग्रीड आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स घसरत आहेत.

Share Market Today

निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 24 शेअर्स तेजीत आहेत आणि 24 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. 2 शेअर्समध्ये कोणताही बदल होत नाही. डीव्हीच लॅबमध्ये 5.52 टक्के तेजी आहे.

हिंदाल्को 1.45 टक्के, अदानी पोर्ट्स 1.15 टक्के, इंडसइंड बँक 1.06 टक्के आणि एचडीएफसी बँक 0.99 टक्क्यांनी व्यहार करत आहे. निफ्टीमध्ये घसरलेल्या शेअर्समध्ये अदानी एंटरप्रायझेस 2.71 टक्क्यांनी, विप्रो 1.65 टक्क्यांनी, ओएनजीसी 1.61 टक्क्यांनी खाली आहे.

S&P BSE SENSEX

शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा विक्री केली आहे. शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदारांनी 944.8 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी म्हणजेच DII ने सलग चौथ्या सत्रात खरेदी केली आणि 2320.3 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

बीएसईच्या बाजार भांडवलाचा नवा विक्रम

बीएसईचे बाजार भांडवल नवीन विक्रम रचत आहे आणि 419.82 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अशाप्रकारे बीएसई बाजार भांडवलाने जवळपास 420 लाख कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे.

आज बीएसईवर 3375 शेअर्सचे व्यवहार होत आहेत, त्यापैकी 1527 शेअर्स वाढत आहेत आणि 1720 शेअर्स घसरत आहेत. 128 शेअर्समध्ये कोणताही बदल न होता व्यवहार होत आहेत. 173 शेअर्सवर अप्पर सर्किट तर 96 शेअर्सवर लोअर सर्किट लागू करण्यात आले आहे. 140 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहेत आणि 33 शेअर्स नीचांकी पातळीवर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

में यूपी से हू; मराठी नही आती...! मुंबई मेट्रोवनमधील कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, मराठी एकीकरण समितीकडून करेक्ट कार्यक्रम

Ranji Trophy 2024: साई सुदर्शनचे द्विशतक, Ishan kishan चे शतक, तर वॉशिंग्टन सुंदरची तुफान फटकेबाजी

आणि त्याने लगेच पाण्यात उडी मारली... 'राजा राणी'च्या सेटवर सुरज चव्हाणने वाचवला एकाचा जीव

Worli Assembly Constituency: वरळीत तिरंगी लढतीची शक्यता, आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढणार!

Latest Maharashtra News Updates : सायन-पनवेल उड्डाणपुलाखाली उभारणार स्वच्छतागृहे

SCROLL FOR NEXT