Strong rise in Tanla platform shares, 50 percent return in one year  Sakal
Share Market

Tanla Platforms: तानला प्लॅटफॉर्मच्या शेअर्समध्ये दमदार तेजी, एका वर्षात दिला 50 टक्के परतावा

Tanla Platforms share price: कंपनीचे मार्केट कॅप 14,676.97 कोटी झाले आहे.

राहुल शेळके

Tanla Platforms share price: तानला प्लॅटफॉर्मच्या (Tanla Platforms) शेअर्समध्ये सध्या चांगली तेजी दिसून येत आहे. नुकताच हा शेअर बीएसईवर 17.95 टक्क्यांनी वाढून 1091.55 रुपयांवर बंद झाला. या वाढीसह कंपनीचे मार्केट कॅप 14,676.97 कोटी झाले आहे.

या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,317.70 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 506.10 रुपये आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये या वर्षी आतापर्यंत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जी बेंचमार्क निफ्टी 50 च्या 15 टक्क्यांच्या वाढीपेक्षा जास्त आहे.

तानला प्लॅटफॉर्म्समध्ये यावर्षी करेक्शन दिसून आले. हा शेअर ऑगस्टमधील 1,317.95 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा जवळपास 30 टक्क्यांनी खाली व्यवहार करत होता. ट्रेंडलाइन डेटानुसार, तानला प्लॅटफॉर्म्सची ऍनालिस्ट टारगेट प्राइस 1,295 रुपये आहे.

त्यानुसार एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 18 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये आहे आणि ऍनालिस्ट्स गुंतवणूकदारांना प्रॉफिट बूक करण्याचा सल्ला देत आहेत.

तानला प्लॅटफॉर्मचा सपोर्ट 1000 रुपयांवर आणि रझिस्टन्स 1120 रुपयांवर दिसून येईल असे आनंद राठीचे जिगर एस पटेल म्हणाले. पुढील काही महिन्यांत एक्सपेक्टेड ट्रेडिंग रेंज 900 ते 1,200 रुपयांच्या दरम्यान असू शकते.

तानला प्लॅटफॉर्मचा नफा सप्टेंबर 2023 ला संपलेल्या तिमाहीत 29 टक्क्यांनी वाढून 143 कोटीवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 110 कोटी होता.

त्याचा निव्वळ महसूल वार्षिक आधारावर 19 टक्क्यांनी वाढून 1009 कोटी झाला आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीचे शेअर्स 52 टक्क्यांनी वाढले आहेत. तर गेल्या एका वर्षात 45 टक्के परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashmi Shukla: महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप? रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी तर भाजपचा खोचक पलटवार...

IND vs PAK: ६ ओव्हरमध्ये ११९ धावा करूनही टीम इंडिया हरली! पाकिस्तानने ३० बॉल्समध्येच जिंकला सामना

IND vs NZ 3rd Test : एकच राडा! न्यूझीलंडची तक्रार, अम्पायरची Sarfaraz Khan ला ताकीद अन् रोहित शर्माचा सहकाऱ्याला फुल सपोर्ट

Diwali 2024: विदर्भात केली जाणारी 'सीतादही' नावाची पूजा नेमकं काय? पाहा व्हिडिओ

होऊ दे खर्च! मी मावशी झाले... १४ वर्षांनी आई झाली तेजस्विनी पंडितची बहीण, बाळासोबतचे फोटो शेअर करत म्हणाली-

SCROLL FOR NEXT