Suraj Estate Developers IPO: सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा (Suraj Estate) आयपीओ 18 डिसेंबरला खुला होणार आहे. कंपनी या आयपीओमधून 400 कोटी उभारणार आहे. डोम्स इंडस्ट्रीजनंतर, या महिन्यात मेनबोर्डद्वारे येणारा हा दुसरा आयपीओ आहे.
हा आयपीओ तीन दिवस खुला राहील आणि 20 डिसेंबरला बंद होईल. हा आयपीओ 15 डिसेंबरला एका दिवसासाठी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला केला जाईल. कंपनीने सांगितले की आयपीओ हा 400 कोटी रुपयांचा संपूर्ण नवीन इश्यू आहे आणि त्यात कोणत्याही ऑफर-फॉर-सेलचा समावेश नाही. म्हणजेच आयपीओ मधून मिळणारे सर्व पैसे कंपनीच्या खात्यात जातील.
आयपीओच्या रकमेपैकी 285 कोटी कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि 35 कोटी रुपये मुंबईतील जमीन संपादन करण्यासाठी वापरतील असे रिअल इस्टेट डेव्हलपरने सांगितले. बाकी रक्कम इतर सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी बाजूला ठेवली जाईल.
कंपनीची योजना ही आर्थिक वर्ष 2024-2025 दरम्यान भूमि अधिग्रहणासाठी राखून ठेवलेली संपूर्ण रक्कम वापरण्याची आहे. सप्टेंबर 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, कंपनीकडे एकूण 568.83 कोटीची थकबाकी आहे.
सूरज इस्टेट कंपनी राजन मीनाथाकोनिल थॉमस आणि कुटुंबाच्या मालकीची आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 21 टक्क्यांनी वाढून 32.06 कोटी झाला आहे. त्याचा महसूल वार्षिक आधारावर 12.1 टक्क्यांनी वाढून 305.7 कोटी झाला आहे.
तर चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीचा महसूल 102.41 कोटी होता आणि निव्वळ नफा 14.53 कोटी होता. आयटीआय कॅपिटल आणि आनंद राठी ऍ़डव्हायजर्स या इश्यूचे मर्चंट बँकर आहेत.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.