Suzlon Energy Share sakal
Share Market

Suzlon Energy Share : सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये दमदार ऍक्शन

पवन ऊर्जा क्षेत्रातील देशातील आघाडीची कंपनी सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये (Suzlon Energy) गुरुवारी (29 फेब्रुवारी) चांगलीच ऍक्शन दिसून येत आहे. गुरुवारी शेअरच्या घसरणीने ट्रेडिंगची सुरुवात झाली पण ट्रेडिंग सत्राच्या शेवटी शेअरमध्ये जोरदार रिकव्हरी झाली आणि तो अप्पर सर्किटमध्ये बंद झाला.

सकाळ वृत्तसेवा

पवन ऊर्जा क्षेत्रातील देशातील आघाडीची कंपनी सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये (Suzlon Energy) गुरुवारी (29 फेब्रुवारी) चांगलीच ऍक्शन दिसून येत आहे. गुरुवारी शेअरच्या घसरणीने ट्रेडिंगची सुरुवात झाली पण ट्रेडिंग सत्राच्या शेवटी शेअरमध्ये जोरदार रिकव्हरी झाली आणि तो अप्पर सर्किटमध्ये बंद झाला. ऊर्जा क्षेत्रातील या कंपनीला 30 मेगावॅटच्या पवन ऊर्जा प्रकल्पाची मोठी ऑर्डर मिळाली. याचा परिणाम त्याच्या स्टॉकवर दिसून येत आहे झाला आहे. सुझलॉन एनर्जीच्या स्टॉकमध्ये पुन्हा वाढ होऊ शकते आणि स्टॉक सध्याच्या पातळीपासून 27 टक्क्यांनी वाढू शकतो असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

कंपनीला 30 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्प विकासासाठी ईडीएफ रिन्युएबल्सकडून नवीन ऑर्डर मिळाल्याची माहिती सुझलॉन एनर्जीने स्टॉक एक्स्चेंजला दिली. प्रत्येकी 3 मेगावॅटच्या 10 विंड टर्बाइनचा पुरवठा करण्यासाठी ही ऑर्डर मिळाली आहे. हा प्रोजेक्‍ट गुजरातमध्ये आहे. ऑर्डरनंतर स्टॉकमध्ये मोठी रिकव्हरी झाली. सुझलॉन एनर्जीने गुरुवारी बीएसईवर 42.90 रुपयांवर ट्रेडींग सुरू केली. त्यानंतर स्टॉकने 41 रुपयांची दिवसाचा नीचांक गाठला.

पण ऑर्डरच्या वृत्तानंतर काही काळानंतर, स्टॉकमध्ये जोरदार रिकव्हरी झाली आणि स्टॉकने 45.28 रुपयांवर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटला धडक दिली. ही दिवसभरातील शेअरची सर्वोच्च पातळी होती. सुझलॉन एनर्जीच्या शेअरने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 450 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर 6 महिन्यांचा परतावा 80 टक्क्यांहून अधिक आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 50.72 रुपये आणि निचांक 6.96 रुपये आहे. बीएसईवर सुझलॉन एनर्जीचे मार्केट कॅप 61,587 कोटी आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RRB Recruitment 2024: रेल्वेत तीन हजार जागांसाठी मेगाभरती; बारावी पास असलेल्यांना संधी, शेवटचे दोन दिवस

Diwali Recipe : बुंदी-बेसनाच्या फंद्यात पडू नका, दिवाळीला अगदी झटपट होणारे हे लाडू बनवा

Latest Maharashtra News Updates Live : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर पक्षाचे नेते महाराष्ट्राच्या CEC बैठकीसाठी AICC मुख्यालयात दाखल

Maruti Suzuki Alto K10 : परदेशात देखील हवा 'लॉर्ड' अल्टोचीच! एक महिन्यात लाखो कार निर्यात, मोडले सगळे विक्रम

Ashti Assembly Election : जागावाटपाचे ठरत नसेल तर तिन्ही उमेदवारांना स्वतंत्रपणे लढण्याची परवानगी द्या - सुरेश धस

SCROLL FOR NEXT