Multibagger Stock Tips esakal
Share Market

Multibagger Stock Update: नव्या ऑर्डर्समुळे 'या' शेअरमध्ये येणार तेजी , तज्ज्ञांना विश्वास

बीएसईवर हा शेअर 10.80 टक्क्यांच्या वाढीसह 803.20 रुपयांवर ट्रेड करत आहे.

शिल्पा गुजर

Stock Market Update: ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या टॅलब्रोसच्या (Talbros) शेअर्समध्ये सध्या मजबूत तेजी दिसत आहे. कंपनीला अनेक नवीन ऑर्डर्स मिळाल्या, त्यामुळेच शुक्रवारी शेअर्सच्या किंमतींनी 15 टक्क्यांनी विक्रमी उच्चांक गाठला.

तर चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत त्याने 119% परतावा दिला आहे आणि लाँग टर्ममध्ये आपल्या गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे. बीएसईवर हा शेअर 10.80 टक्क्यांच्या वाढीसह 803.20 रुपयांवर ट्रेड करत आहे.

20 वर्षात गुंतवणुकदार कोट्यधीश

टॅल्ब्रोसचे शेअर्स 7 मार्च 2003 रोजी अवघ्या 7 रुपयांना मिळत होते. पण आता हेच शेअर्स 803.20 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच 20 वर्षांत गुंतवणूकदारांच्या संपत्ती 11374% वाढ झाली आहे.

त्यावेळी या शेअर्समध्ये ज्यांनी एक लाखाची गुंतवणूक केली असेल त्यांची संपत्ती आज 1.15 कोटी रुपयांची झाली असेल. या शेअरने केवळ लाँग टर्मच नाही तर शॉर्ट टर्ममध्येही आपल्या गुंतवणुकदारांना दमदार परतावा दिला आहे.

29 मार्च 2023 रोजी तो 380.10 रुपयांवर होता, जो एक वर्षाचा नीचांक आहे. यानंतर, 7 जुलै रोजी तो चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 119 टक्क्यांनी वाढून 832 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. यानंतर प्रॉफिट बुकींगमुळे तो थोडा घसरला आणि सध्या विक्रमी उच्चांकावरून 3 टक्क्यांनी खाली आला आहे.

कंपनीला भारत आणि विदेशातून सुमारे 400 कोटी रुपयांच्या अनेक ऑर्डर्स मिळाल्याचे एक्सचेंज फाइलिंगमध्ये कंपनीने म्हटले आहे.

यामध्ये एक्सपोर्ट कंपन्यांकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या पुरवठ्यासाठी 205 कोटी रुपयांच्या कराराचा समावेश आहे. या काँट्रॅक्ट्सनुसार कंपनी पुढील 5-7 वर्षांसाठी गॅस्केट, हीट शील्ड, फोर्जिंग आणि चेसिस पुरवणार आहे.

टॅल्ब्रोसने Marelli Talbros Chassis Systems या इव्ही कंपनीसोबत जॉईंट व्हेंचरमध्ये सुमारे 165 कोटी रुपयांच्या पाच वर्षांच्या पुरवठा करार केला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT