Tata Group Multibagger Stock Sakal
Share Market

Tata Group Stock: टाटा ग्रुपचा 'हा' शेअर करतोय रोज नवे विक्रम, 700 रुपयांचा आकडा होणार पार, काय सांगतात तज्ज्ञ?

कंपनीचे शेअर्स सध्याच्या बाजारभावापेक्षा सुमारे 15.86 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

शिल्पा गुजर

Tata Group Multibagger Stock: टाटा मोटर्सच्या (Tata Motors) शेअर्सने गेल्या आठवड्यातच त्याचा सर्वकालीन उच्चांक (All Time High) गाठला होता. या वर्षाच्या सुरुवातीपासून कंपनीचे शेअर्स वाढत आहेत. त्यामुळेच कंपनीच्या शेअर्समधील तेजी यापुढेही कायम राहणार असल्याचा विश्वास देशांतर्गत ब्रोकरेज फर्म शेअरखानला वाटत आहे.

शेअरखानने आपल्या अहवालात टाटा मोटर्सच्या शेअर्सवर बाय रेटिंग (BUY) कायम ठेवले आहे. शिवाय 720 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.

या कंपनीचे शेअर्स सध्याच्या बाजारभावापेक्षा सुमारे 15.86 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. टाटा मोटर्सचे शेअर्स सध्या 620.05 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, टाटा मोटर्सची उपकंपनी जग्वार लँड रोव्हरने (Jaguar Land Rover) विक्रीत 29.9 टक्क्यांची मजबूत वाढ नोंदवल्याचे शेअरखानने आपल्या अहवालात म्हटले आहे.

कंपनीचा फ्री कॅश फ्लो या तिमाहीत सुमारे 40 कोटी पाउंड असू शकतो. जेएलआरकडे 1.85 लाख युनिट्सची ऑर्डर बुक आहे, जी मजबूत मागणीचे संकेत देते.

जेएलआरच्या सर्वात फायदेशीर मॉडेल्सची मागणी मजबूत राहिली असून रेंज रोव्हर, रेंज रोव्हर स्पोर्ट आणि डिफेंडरचा ऑर्डर बुकमध्ये सुमारे 76 टक्के वाटा असल्याचेही ब्रोकरेजने सांगितले.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

SCROLL FOR NEXT