Tata Sons: देशातील आघाडीची कंपनी टाटा सन्स आपली सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) शेअर्स विकणार आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, टाटासन्सने ब्लॉक डील अंतर्गत TCS चे 2.34 कोटी शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला आहे.
करारानुसार, टाटा सन्स प्रत्येकी 4,001 रुपयांच्या किंमतीला 2.34 कोटी शेअर्स विकणार आहे. मूळ किंमत TCS च्या मागील बंद किंमतीपेक्षा 3.7 टक्के कमी आहे आणि त्यानुसार टाटा सन्स 9,362 कोटी रुपये उभारू शकते.
या महिन्यात देशांतर्गत बाजारपेठेतील ही दुसरी मोठी ब्लॉक डील असेल. 13 मार्च रोजी, ब्रिटिश अमेरिकन टोबॅगो (BAT) ने ITC मधील 3.5 टक्के हिस्सा विकून 17,485 कोटी रुपये उभे केले. JPMorgan आणि Citi या दोन गुंतवणूक बँका नवीन शेअर विक्रीचे व्यवस्थापन करतील.
TCS शेअर्स सोमवारी 1.8 टक्क्यांनी घसरून 4,144 रुपयांवर बंद झाले. सध्या, टाटा सन्सची TCS मध्ये 72.38 टक्के हिस्सेदारी आहे ज्याची किंमत 10.9 लाख कोटी रुपये आहे. डिसेंबरमध्ये, टाटा सन्सने बायबॅकमध्ये TCS चे शेअर्स विकून सुमारे 12,300 कोटी रुपये उभे केले होते. 2017 पासून, टाटा सन्सने बायबॅक प्रक्रियेत शेअर्स ऑफर करून सुमारे 54,000 कोटी रुपये उभे केले आहेत.
टाटा सन्सचे शेअर्स गेल्या एका वर्षात 30 टक्क्यांनी वाढले आहेत. अहवालानुसार टाटा सन्सला आयपीओ लाँच करायचा नाही म्हणून कंपनी शेअर्स विकत आहे.
आरबीआयच्या नियमांनुसार, मोठे मार्केट कॅप असलेल्या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीला शेअर बाजारात लिस्ट करणे आवश्यक आहे. टाटा सन्स कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी कमी करून या कोंडीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे. अशी शक्यता वर्तवली जात आहे.
TCSच्या शेअर्सनी काल इंट्राडे ट्रेडिंगमध्ये 52 आठवड्यांचा उच्चांक 4254 रुपये गाठला होता. मात्र, बाजार बंद होईपर्यंत तो 1.7 टक्क्यांनी घसरला होता. सोमवारी हा शेअर बीएसईवर 4,144 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. आजही कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होण्याची शक्यता आहे.
अलीकडे टाटा समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. याचे कारण टाटा सन्स आयपीओ आणणार यामुळे शेअर्स वाढत होते. मात्र, कंपनीने याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही आणि कोणत्याही बातमीला दुजोरा दिला नाही. आता येत असलेल्या बातम्यांवरून असे दिसते की टाटा सन्स आयपीओ लॉन्च करण्याच्या मूडमध्ये नाही.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.