Tata Steel Share: टाटा ग्रुपच्या शेअर्सने कायमच गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. अशात टाटा स्टीलच्या (Tata Steel) शेअर्सवर ब्रोकरेज कंपन्या अतिशय सकारात्मक दिसत आहेत. हा स्टॉक त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकापासून अवघ्या काही रुपयांच्या अंतरावर आहे.
शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 1.87 टक्क्यांची वाढ दिसून आली आणि शेअर 133.45 रुपयांवर बंद झाला. या वाढीसह कंपनीचे मार्केट कॅप 1,64,168.27 कोटी झाले. ब्रोकरेज फर्म येस सिक्युरिटीजने टाटाच्या या शेअरला आधीच 'ऍड' रेटिंग दिले आहे.
युरोपियन व्यवसायातील बदल आणि देशांतर्गत बाजारपेठेतील हिस्सा मजबूत झाल्यामुळे टाटा स्टीलमध्ये 15 टक्के वाढ होण्याची शक्यता असल्याचे ब्रोकरेज फर्म येस सिक्युरिटीजला वाटत आहे.
इंडियन स्टील सेक्टर संपूर्ण CY23 मध्ये सातत्याने वाढत आहे आणि येत्या काही वर्षांत अशीच वाढ अपेक्षित आहे असेही त्यांनी म्हटलं. इंडियन स्टील सेक्टरमध्ये आगामी वाढ साध्य करण्यासाठी टाटा स्टील महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी तयार आहे.
टाटा स्टील भारतीय स्टील सेक्टरमध्ये परफेक्ट पोझिशनमध्ये असल्याचे ब्रोकरेजने म्हटले आहे. आगामी क्षमता आणि युरोपियन बिझनेसमुळे ते तेजीने वाढत आहे. ब्रोकरेजने टाटा स्टीलच्या शेअर्सवर टारगेट प्राईस 153 रुपये केली आहे. त्यानुसार कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 14% वाढ होण्याची शक्यता आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.