Tata Technologies IPO Date: Tata Group कंपनी Tata Technologies चा IPO लवकरच येऊ शकतो. कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे अर्ज केला आहे. ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजची कामगिरीही चांगली आहे.
18 वर्षांनंतर टाटा समूहाच्या कंपनीचा IPO येणार आहे. टाटा समूहाची कंपनी Tata Technologies Limited ने IPO साठी 9 मार्च 2023 रोजी SEBI कडे DRHP दाखल केला. या IPO द्वारे, टाटा मोटर्स ऑफर फॉल सेल अंतर्गत त्यांच्या स्टेकमधून 9.571 कोटी शेअर्स विकू शकते.
सध्या, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये टाटा मोटर्सचा एकूण 74.69 टक्के हिस्सा आहे. याशिवाय टाटा समूहातील अन्य कंपनी अल्फा टीसी होल्डिंग्ज, टाटा कॅपिटल ग्रोथ फंड यांचे अनुक्रमे 7.26 टक्के आणि 3.63 टक्के हिस्सेदारी आहे.
या IPO अंतर्गत, विद्यमान भागधारक त्यांचे स्टेक कमी करण्याचा विचार करू शकतात. ग्रे मार्केटमध्ये कंपनीची काय स्थिती आहे ते जाणून घेऊया?
टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या आयपीओच्या मूल्यांकनाच्या प्रश्नाला उत्तर देताना, बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक राजेश सिन्हा म्हणतात, “टाटा टेक्नॉलॉजीजने 3983 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यापैकी कंपनीचा निव्वळ नफा 513 कोटी रुपये झाला आहे.
शेअरच्या किंमतीबाबत, बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक राजेश सिन्हा म्हणतात, “आम्ही टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ सायएंटच्या तुलनेत 10 टक्के सवलतीचा अंदाज लावतो. त्यानुसार कंपनीचा IPO किंमत 268 रुपये प्रति शेअर असू शकते. त्याच वेळी, मार्केट कॅप 10,852 कोटी रुपये असू शकते.
ग्रे मार्केटचा मागोवा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, कंपनीचा IPO आज 582 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. त्यानुसार, कंपनीचा GMP अंदाजित किंमत बँडपेक्षा 200% जास्त आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.