Tata Technologies IPO listing: Shares debut at 140 percent premium over issue price  Sakal
Share Market

Tata Technologies: टाटा टेक्नॉलॉजीची धमाकेदार लिस्टिंग; गुंतवणूकदारांना मिळाला 140 टक्के रिटर्न

Tata Technologies Listing: टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स आज स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाले आहेत.

राहुल शेळके

Tata Technologies Listing: टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स आज स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाले आहेत. कंपनीचे शेअर्स बीएसईवर 140 टक्के प्रीमियमसह 1200 रुपयांपासून सुरू झाले आहेत. तर त्याच्या IPO ची अंतिम किंमत 500 रुपये होती. याचा अर्थ गुंतवणूकदारांनी प्रत्येक शेअरवर 700 रुपये कमावले आहेत. म्हणजेच टाटा टेकने लिस्ट झाल्यावर गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास अडीच पटीने वाढवले.

टाटा टेकचे शेअर्स लिस्ट झाल्यानंतर किंचित घसरले आहेत. ज्या लोकांना शेअर्स मिळाले आहेत त्यांनी त्यांचे शेअर्स प्रॉफिट बुकींगसाठी म्हणजेच नफा मिळविण्यासाठी विकले आहेत, असा हा संकेत आहे.

सकाळी 10.30 च्या सुमारास, BSE वर कंपनीचे शेअर्स 1305.05 रुपये होते, जे लिस्टिंग किंमतीच्या (रु. 1200) पेक्षा 105.10 रुपये किंवा 8.76 टक्क्यांनी वाढले होते. या किंमतीत कंपनीचे बाजार भांडवल सुमारे 53,000 कोटी रुपये आहे.

टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स बीएसईवर 1200 रुपयांवर लिस्ट झाले आहेत. टाटा टेक शेअर्स थेट 140 टक्के प्रीमियमसह लिस्ट आहेत. गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 700 रुपये प्रति शेअरचा थेट फायदा झाला आहे.

टाटा टेकचा आयपीओ 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला होता आणि कंपनीने शेअर्सची किंमत 475 रुपये ते 500 रुपये प्रति शेअर दरम्यान निश्चित केली होती. टाटा टेकच्या IPO ला तब्बल 69.43 टक्के सबस्क्रिप्शन मिळाले होते.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Puja Khedkar: पूजा खेडकर प्रकरणात आज निर्णय; अटक होणार की पुन्हा संरक्षण मिळणार?

Share Market Opening: फेडच्या निर्णयामुळे शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; निफ्टी 100हून अधिक अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले?

Mohammad Nabi: अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी घेणार निवृत्ती, 'ही' टूर्नामेंट असेल शेवटची

Chhagan Bhujbal: 'ईडीपासून मुक्ती मिळावी, यासाठी भाजपसोबत गेलो' भुजबळांचा खुलासा; राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात दावा

आधी सगळे नावं ठेवत होते आता मात्र... 'हंटर' मधील 'त्या' बोल्ड सीनवरबद्दल पहिल्यांदाच बोलली सई ताम्हणकर

SCROLL FOR NEXT