Tata Technologies IPO opens for subscription on November 22 Here are the details  Sakal
Share Market

Tata Technologies IPO: टाटा समूहाची मोठी घोषणा! टाटा टेकचा आयपीओ 22 नोव्हेंबरला उघडणार

Tata Technologies IPO: IPO 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत गुंतवणूकदारांसाठी खुला राहील.

राहुल शेळके

Tata Technologies IPO: तब्बल दोन दशकांनंतर टाटा समूहाच्या कंपनीचा आयपीओ उघडणार आहे. 22 नोव्हेंबर 2023 रोजी रिटेल गुंतवणूकदारांसाठी IPO उघडणार आहे. हा IPO 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत गुंतवणूकदारांसाठी खुला राहील.

Tata Technologies चा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेलवर आधारित असेल. कंपनीचे प्रवर्तक आयपीओद्वारे त्यांचे स्टेक कमी करणार आहेत. या IPO द्वारे टाटा टेक्नॉलॉजीजचे एकूण 6.08 कोटी शेअर्स विकले जातील.

यापूर्वी टाटा टेक्नॉलॉजीजने IPO द्वारे 9.57 कोटी रुपयांची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. या IPO मध्ये टाटा मोटर्स 4.62 कोटी शेअर्स, अल्फा TC 97.1 लाख शेअर्स आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 48 लाख शेअर्स विकणार आहे.

JM Financial, Citi Group, Global Markets India, BofA Securities India यांना IPO साठी लीड मॅनेजर नियुक्त केले आहेत. कंपनीने लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान, टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सवर ग्रे मार्केट तेजीत आहे. ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स 275 रुपयांच्या प्रीमियमवर आहेत.

कर्मचाऱ्यांना प्राधान्य देणार

विशेष बाब म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओमध्ये टाटा मोटर्स लिमिटेडच्या भागधारकांसाठी 10 टक्के इक्विटी शेअर्स राखीव ठेवता येतात. अशा परिस्थितीत, ज्यांच्याकडे टाटा मोटर्सचे शेअर्स आहेत त्यांना IPO मध्ये शेअर्स सहज मिळू शकतात.

याशिवाय या IPO मधील काही हिस्सा कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवला जाऊ शकतो. नियमानुसार, पोस्ट ऑफर इक्विटी शेअर्सपैकी 0.50 टक्के पर्यंत कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवता येतात.

टाटा समूहाचा शेवटचा IPO 19 वर्षांपूर्वी 2004 मध्ये आला होता. त्यानंतर समूहाची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आयपीओद्वारे देशांतर्गत बाजारपेठेत प्रवेश केला. टाटा टेक्नॉलॉजीज ही टाटा मोटर्सची उपकंपनी आहे, जी अभियांत्रिकी सेवा पुरवते.

कंपनी ऑटो, एरोस्पेस, औद्योगिक अवजड यंत्रसामग्री आणि इतर उद्योगांना उत्पादन विकास आणि टर्नकी सोल्यूशन्स सेवा देते. टाटा टेक जगातील अनेक देशांमध्ये काम करते. कंपनीचे जगभरात 11,000 कर्मचारी आहेत. कंपनीचा व्यवसाय उत्तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत पसरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT