TCS Share Buyback Sakal
Share Market

TCS Share Buyback: टाटा करणार गुंतवणूकदारांना मालामाल! एका शेअरमागे मिळणार 4,150 रुपये

राहुल शेळके

TCS Share Buyback: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 9 टक्क्यांनी वाढून 11,342 कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 10,431 कोटी रुपये होता. कंपनीने आपल्या भागधारकांना प्रति शेअर 9 रुपये लाभांश देण्याचा निर्णयही घेतला आहे.

काल टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. TCS ने काल 17 हजार कोटी रुपयांच्या बायबॅकची घोषणा केली आहे. कंपनी या बायबॅकमध्ये गुंतवणूकदारांना 15 टक्के परतावा देणार आहे. मात्र, काल कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह बंद झाले.

TCS ची 17 हजार कोटी रुपयांच्या बायबॅकची घोषणा

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 17 हजार कोटी रुपयांच्या बायबॅकला मंजुरी देण्यात आली आहे. बायबॅकच्या घोषणेसोबतच, आयटी कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकालही जाहीर केले.

या बायबॅकमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या 6 वर्षात कंपनीकडून हा 5 वा बायबॅक आहे. येत्या काही दिवसांत विप्रो आणि इन्फोसिसकडून बायबॅकची घोषणा केली जाऊ शकते.

किती कमाई होईल?

TCS ने प्रति शेअर 4,150 रुपये बायबॅक जाहीर केला आहे. याचा अर्थ असा की ज्या गुंतवणूकदाराकडे TCS चे शेअर्स आहेत त्यांना एका शेअरसाठी 4,150 रुपये मिळू शकतात. म्हणजे, जर कोणाकडे 100 TCS शेअर्स असतील आणि त्याने ते सर्व खरेदी केले तर त्याला 54,000 रुपयांचा नफा होऊ शकतो.

टीसीएसच्या शेअर्समध्ये घसरण

आज, TCS चे तिमाही निकाल जाहीर होण्यापूर्वी, कंपनीच्या शेअर्समध्ये थोडीशी घसरण झाली. बीएसईच्या आकडेवारीनुसार, कंपनीचे शेअर्स काल 0.52 टक्क्यांच्या घसरणीसह 3610.20 रुपयांवर बंद झाले.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Latest Maharashtra News Updates : आमदार राजेद्र शिंगणे यांची अजित पवारांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

बिग बॉस फेम अरमान मलिकचा मोठा अपघात; थोडक्यात बचावला जीव, व्हिडिओ शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT