Multibagger Shares: टेक्नो इलेक्ट्रिक आणि इंजिनिअरिंग (Techno Electric) कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 4% पेक्षा जास्त वाढले. यासह, कंपनीच्या शेअर्सने त्यांच्या 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ 1,750 कोटीची ऑर्डर मिळाल्यानंतर झाली आहे. टेक्नो इलेक्ट्रिकचे शेअर्स एनएसईवर 813.00 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
कंपनीला 709 कोटीची ट्रान्समिशन ऑर्डर मिळाली आहे. यामध्ये स्टरलाइटकडून नीमराना-II साठी 199 कोटीचे 765kV AIS पॅकेज आणि सीकर इथे 765,400 kV आणि 2x1500 MVA च्या स्थापनेसाठी PGCIL कडून 223 कोटी 765kV AIS सबस्टेशन पॅकेजही मिळाले आहे.
कंपनीला दुसरी ऑर्डर एडवांस मिटरिंग इंफ्रास्ट्रक्चर (AMI) सेगमेंटला RECPDCL कडून मिळाली आहे. DBFOOT आधारावर काश्मीरमधील 7.27 लाख स्मार्ट मीटरसाठी 1,041 कोटींची ऑर्डर आहे.
यापूर्वी नोव्हेंबरमध्ये, टेक्नो इलेक्ट्रिकने केपल डेटा सेंटर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडसोबत नॉन-बाइंडिंग करार केला होता. भारतात डेटा सेंटर कॅम्पस उघडण्यासाठी करार करण्यात आला आहे.
टेक्नो इलेक्ट्रिक शेअर्सने गेल्या एका वर्षात 153% मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 11.94 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत त्याच्या शेअरची किंमत 119.44% वाढली आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.