Thaai Casting Share listed with more than 141 Percent Premium IPO Price 77 rupee Know Share Price  Sakal
Share Market

Thaai Casting IPO: 77 रुपयांचा शेअर 186 रुपयांवर लिस्ट; आयपीओ गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी 141 टक्के परतावा

Thaai Casting IPO: थाय कास्टिंग (Thaai Casting) लिमिटेडच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवणारे गुंतवणूकदार पहिल्याच दिवशी श्रीमंत झाले आहेत. कारण कंपनीचे शेअर्स त्याच्या इश्यू किंमतीपेक्षा सुमारे 141.43 टक्क्यांच्या दमदार प्रीमियमवर लिस्ट झाले आहेत.

राहुल शेळके

Thaai Casting IPO: थाय कास्टिंग (Thaai Casting) लिमिटेडच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवणारे गुंतवणूकदार पहिल्याच दिवशी श्रीमंत झाले आहेत. कारण कंपनीचे शेअर्स त्याच्या इश्यू किंमतीपेक्षा सुमारे 141.43 टक्क्यांच्या दमदार प्रीमियमवर लिस्ट झाले आहेत.

थाय कास्टिंग शेअर्सची इश्यू किंमत 77 रुपये होती, तर सध्या शेअर्स एनएसईवर 185.90 रुपयांवर लिस्ट झाले. म्हणजेच आयपीओ गुंतवणूकदारांनी पहिल्याच दिवशी सुमारे 141.43 टक्के इतका मोठा नफा कमावला आहे. हा आयपीओ एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट आहे. (Thaai Casting Share listed with more than 141 Percent Premium IPO Price 77 rupee Know Share Price)

थाय कास्टिंगचा आयपीओ 15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान खुला होता. या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि तब्बल 375 पट ओव्हरसबस्क्राइब झाला. रिटेल गुंतवणूकदारांनी 355.66 वेळा स्वत:साठी राखीव शेअर्सचे सब्सक्रिप्शन घेतले. याशिवाय, गैर-संस्थात्मक खरेदीदारांचा हिस्सा 729.72 पट आहे. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या भागाला 144.43 पट सब्सक्रिप्शन मिळाले.

कंपनीचा आयपीओची साईज 47.20 कोटी होती आणि त्याची किंमत 73 ते 77 रुपये निश्चित केली होती. कंपनीचा इश्यू पूर्णपणे नवीन शेअर्सचा होता. म्हणजेच आयपीओमधील संपूर्ण रक्कम कंपनीच्या खात्यात जाईल. त्याच्या आयपीओ डॉक्यूमेंट्सनुसार, स्टॉक एक्स्चेंजवर त्याच्या पीअर लिस्टेड कंपन्या एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज आणि इलेक्ट्रो स्टील कास्टिंग आहेत.

थाय कास्टिंग लिमिटेड ही एक ऑटोमोबाईल ऑक्जिलरी फर्म आहे जी फेरस आणि नॉन-फेरस मटेरियलचे अचूक मशिनिंग, इंडक्शन हीटिंग आणि क्वेंचिंग आणि हाय प्रेशर डाय कास्टिंगमध्ये माहिर आहे. त्याचे बिझनेस मॉडेल मुख्यत्वे B2B वर आधारित आहे आणि ते ऑटो कॉम्पोनंट सेक्टरमधील मोठ्या कंपन्यांना सेवा पुरवते.

कंपनीच्या प्रोडक्ट पोर्टफोलिओमध्ये ऑटोमोबाईल कंपोनेंट्सची संपूर्ण डायवर्सिफाइड सीरीज समाविष्ट आहे, ज्यामध्ये इंजिन माउंटिंग सपोर्ट ब्रॅकेट, ट्रान्समिशन माउंट्स, फोर्क शाफ्ट आणि हाउसिंग, आर्मेचर, स्टीयरिंग व्हील, इलेक्ट्रिकल कनेक्टर, वायएफजी बेस फ्रेम्स इत्यादींचा समावेश आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT