Stock Market  sakal
Share Market

Stock Market : शेअर बाजारात नवी प्रणाली

भारतीय शेअर बाजारातील शेअर खरेदी-विक्री व्यवहार एका दिवसांत पूर्ण करण्याच्य नव्या ‘टी प्लस झिरो’ प्रणालीची बीटा आवृत्ती २८ मार्च रोजी दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय शेअर बाजारातील शेअर खरेदी-विक्री व्यवहार एका दिवसांत पूर्ण करण्याच्य नव्या ‘टी प्लस झिरो’ प्रणालीची बीटा आवृत्ती २८ मार्च रोजी दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने केली आहे.

यामुळे ज्या दिवशी शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जातील, त्याची पूर्तताही त्याच दिवशी होईल. आता ‘टी प्लस वन’ प्रणालीनुसार, दुसऱ्या दिवशी व्यवहारांची पूर्तता होते. त्यामुळे विक्री करणाऱ्यांना दुसऱ्या दिवशी पैसे मिळतात. नव्या प्रणालीमुळे शेअर विक्री करणाऱ्या ग्राहकांना त्याच दिवशी पैसे मिळतील.

‘सेबी’ने १५ मार्च रोजी या नव्या प्रणालीच्या बीटा आवृत्तीला मंजुरी दिली होती. गुरुवारी २८ मार्च रोजी याची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी केली जाईल. त्यात सुरुवातीला २५ शेअर आणि मर्यादित ब्रोकरचा समावेश असेल. सकाळी ९.१५ ते दुपारी १.३० पर्यंत एका सत्रात हे व्यवहार होतील, असे ‘सेबी’ने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.

शेअर बाजारातील व्यवहारपूर्ती (सेटलमेंट) प्रक्रिया सुव्यवस्थित आणि वेगवान करणे, गुंतवणूकदार, ब्रोकर आदींना अधिक लवचिकता आणि कार्यक्षमता प्रदान करणे हा यामागचा उद्देश आहे, असेही ‘सेबी’ने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT