Multibagger Stocks sakal
Share Market

Multibagger Stocks : स्टॉक स्प्लिटसह बोनस शेअर्स देणार ही कंपनी;5 वर्षात 600% परतावा

मल्टीबॅगर स्टॉकमध्ये धोका असतोच पण नफाही तेवढाच शानदार मिळतो ते ही खरे. असाच एक स्टॉक आहे वर्टोज ऍडव्हरटायझिंग लिमिटेडचा (Vertos Advertising Limited). कमी काळात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मल्टीबॅगर स्टॉकमध्ये धोका असतोच पण नफाही तेवढाच शानदार मिळतो ते ही खरे. असाच एक स्टॉक आहे वर्टोज ऍडव्हरटायझिंग लिमिटेडचा (Vertos Advertising Limited). कमी काळात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. कंपनीने नुकतेच स्टॉक स्प्लिट तसेच बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. गेल्या शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 0.16 टक्क्यांची किंचित वाढ झाली आणि शेअर एनएसईवर 701 रुपयांवर बंद झाला. या वाढीसह कंपनीचे मार्केट कॅप 2,966 कोटी झाले आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 905 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांक 218 रुपये आहे.

वर्टोज ऍडव्हरटायझिंग लिमिटेडच्या संचालक मंडळाने 10:1 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिट जाहीर केले आहे. याचा अर्थ असा की 1 रुपये फेस व्हॅल्यूचा प्रत्येक 1 इक्विटी शेअर 1 रुपयांची फेस व्हॅल्यू असणाऱ्या 10 शेअर्समध्ये विभागला जाईल, शिवाय, कंपनी 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देखील जारी करेल. या अंतर्गत, स्टॉक स्प्लिटनंतर कंपनीमध्ये असलेल्या प्रत्येक विद्यमान इक्विटी शेअरसाठी 1 बोनस शेअर जारी केला जाईल. बोर्डाने शुक्रवार, 05 जुलै 2024 ही बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे.

वर्टोज ऍडव्हरटायझिंग लिमिटेडने त्यांच्या तिमाही निकालांमध्ये सकारात्मक आकडेवारी जाहीर केली आहे. मार्च 2024 च्या तिमाहीत कंपनीचा महसूल वाढून 45.66 कोटी झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 34.32 कोटी होता. त्याचवेळी, कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीत 4.10 कोटीवरून 4.69 कोटीपर्यंत वाढला आहे.

2012 मध्ये स्थापित वर्टोज ऍडव्हरटायझिंग लिमिटेड ही ऍडव्हर्टायझिंग टेक्नोलॉजी (Ad-Tech) इंडस्ट्रीमधील एक आघाडीची कंपनी आहे. कंपनी मार्केटींग, ऍडव्हर्टायझिंग आणि मोनेटायझेशनसाठी डेटा-आधारित सॉल्यूशन्स देते. या शेअरने केवळ 1 वर्षात 200 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 5 वर्षांत, त्याच्या गुंतवणूकदारांना 600 टक्के इतका चांगला नफा मिळाला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT