today share market update sensex falls for 3rd day sheds 542 pts on weak global cues nifty below  eSakal
Share Market

Share Market : शेअर बाजाराची सलग तिसऱ्या दिवशी घसरण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : फीच मानांकन संस्थेने अमेरिकेचा पत दर्जा घसरवल्याचे पडसाद आजही जगातील सर्वच शेअर बाजारांमध्ये उमटले आणि भारतीय शेअर बाजारांतही घसरण कायम राहीली. ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ सलग तिसऱ्या दिवशीही पाऊण टक्क्यांच्या आसपास घसरले. आज ‘सेन्सेक्स’ ५४२.१० अंश, तर ‘निफ्टी’ १४४.९० अंश घसरला.

भारतीय शेअर बाजार निर्देशांकांमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी नफावसुली झाली. त्यातच बँक ऑफ इंग्लंडच्या व्याजदरवाढीच्या निर्णयानेही त्यात भर पडली. आज सेन्सेक्स आणि निफ्टी सकाळपासूनच तोटा दाखवीत होते आणि दिवसभर ते घसरतच गेले.

शेवटच्या अर्ध्या तासात थोडी खरेदी झाली, मात्र त्याने विशेष फरक पडला नाही. दिवसअखेर ‘सेन्सेक्स’ ६५,२४०.६८ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १९,३८१.६५ अंशांवर स्थिरावला. आज औषधनिर्मिती क्षेत्र आणि काही प्रमाणात प्रसारमाध्यमांचे क्षेत्र सोडून सर्वच क्षेत्रे तोटा दाखवत होती.

त्यातही बांधकाम व्यवसाय, ऑइल अँड गॅस आणि बँका, वित्तसंस्थांच्या शेअरनी सर्वांत जास्त घसरण दाखवली. त्याखेरीज आयटी क्षेत्रानेही घसरण दाखवली, परदेशी वित्तसंस्थांनीही आज विक्री केल्यामुळे बाजारात आणखीनच निराशेचे वातावरण पसरले.

आज ‘सेन्सेक्स’ सकाळी  ६६ हजारांच्या जवळपास गेला होता, मात्र तो ६६ हजारांना स्पर्श करू शकला नाही. शेवटच्या अर्ध्या तासात त्याने ६५ हजारांची पातळीही तोडली होती. खालच्या भावावर थोडीफार खरेदी झाल्यामुळे तो पुन्हा पासष्ठ हजारांवर बंद झाला. आज निफ्टीच्या प्रमुख ५० पैकी ३९ तर ‘सेन्सेक्स’च्या मुख्य ३० पैकी २४ शेअरचे भाव घसरले.

‘बीएसई’वर टायटन, आयसीआयसीआय बँक, बजाज फिन्सर्व्ह दोन टक्क्यांच्या आसपास घसरले. नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट, स्टेट बँक, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, टीसीएस, महिंद्र आणि महिंद्र, मारुती या शेअरचे भाव  एक ते दोन टक्का घसरले, तर इन्फोसिस, सन फार्मा, एनटीपीसी आदी शेअरचे भाव अर्धा टक्का वाढले.

रुपया ८२.७३ वर...

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आज भारतीय रुपया घसरून ८२.७३ वर स्थिरावला. काल रुपया ८२.५९ वर बंद झाला होता. आज व्यवहार सुरू होताना रुपया ८२.७१ वर उघडला होता, दिवसभरात त्याने ८२.८१ चा तळ गाठला. डॉलर इंडेक्समधील वाढ तसेच शेअर बाजारातील घसरण यामुळे रुपयावर दडपण आल्याचे एलकेपी सिक्युरीटीजचे जतीन त्रिवेदी म्हणाले.

फीच मानांकन संस्थेने अमेरिकेचे मानांकन घटवल्यामुळे बाजारात निराशा दाटल्याने आज विक्री झाली. आता यापुढे अमेरिकी बेरोजगारीच्या तपशीलावर सर्वांचे लक्ष राहील. बाजाराचा कल सकारात्मक असल्याने गुंतवणूकदारांनी तळाच्या भावाला चांगल्या शेअरची खरेदी करावी.

- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidansabha: हरियाणा नंतर आता राष्ट्रीय पक्षांचे 'मिशन महाराष्ट्र'; पंतप्रधान मोदी, राहुल गांधी करणार दौरे

NA Tax : सोसायट्यांचा ‘एनए टॅक्स’ अखेर रद्द; दोन लाखांहून अधिक सोसायट्यांना दिलासा

Maharashtra Assembly Election 2024: मोठी बातमी! संघ थेट प्रचारात उतरणार? ७० दिवसांचा मेगा प्लॅन रेडी; पण फायदा कुणाला?

Nitin Gadkari : 'झाले बहु, होतील बहु यासम हा' असं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व; काय म्हणाले गडकरी?

ATC Raid : मालेगावसह मराठवाड्यात एटीएस, एनआयएची पहाटे छापेमारी; अनेक तरुणांना उचललं

SCROLL FOR NEXT