ट्रॉम इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आयपीओचे गुंतवणूकदारांनी दमदार स्वागत केले. पहिल्या दिवशी, हा इश्यू आतापर्यंत 13.71 वेळा सबस्क्राईब झाला आहे, त्यापैकी रिटेल कॅटेगिरी 20.03 वेळा, NII कॅटेगिरी 16.58 वेळा आणि QIB कॅटेगिरी 0.50 वेळा सब्सक्राइब झाली आहे. ट्रॉम इंडस्ट्रीजचा (Trom Industries) आयपीओ 25 जुलैपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे आणि त्यात 29 जुलैपर्यंत पैसे गुंतवता येणार आहेत.
हा एक एसएमई आयपीओ आहे, जो राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट केला जाईल. कंपनीने आपल्या शेअर्ससाठी 100 ते 115 रुपये प्राइस बँड निश्चित केला आहे. या किंमतीनुसार कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 105.74 कोटी असेल. ट्रॉम इंडस्ट्रीजची या आयपीओद्वारे सुमारे 31.37 कोटी उभारण्याची योजना आहे. कंपनीचा संपूर्ण आयपीओ नवीन शेअर्सचा आहे, ज्या अंतर्गत एकूण 27.28 लाख नवीन शेअर्स विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
आयपीओमधून मिळणाऱ्या फंडचा वापर कंपनी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी, त्याच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि इतर सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी करेल. ट्रॉम इंडस्ट्रीज लिमिटेड 30 जुलै रोजी शेअर्सचे ऍलॉटमेंट करेल. कंपनीचे शेअर्स 1 ऑगस्ट रोजी एनएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट केले जाऊ शकतात.
गुंतवणूकदार या आयपीओसाठी लॉट साइजनुसार बोली लावू शकतात. एका लॉटमध्ये कंपनीचे 1,200 शेअर्स असतील. अशा परिस्थितीत, एका लॉटच्या गुंतवणूकदारांना किमान 1लाख 38 हजारांची गुंतवणूक करावी लागेल. किरकोळ गुंतवणूकदार किमान आणि कमाल एक लॉट साईजसाठी बोली लावू शकतात.
कंपनीने आयपीओ उघडण्याच्या एक दिवस आधी 24 जुलैला अँकर गुंतवणूकदारांकडून 8.93 कोटी उभे केले. एकूण 4 गुंतवणूकदार त्याच्या अँकर इश्यूमध्ये सहभागी झाले होते, ज्यांना प्रति शेअर 115 रुपये या किमतीने एकूण 7,16,40 शेअर्सचे वाटप करण्यात आले असे कंपनीने सांगितले.
ट्रॉम इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक सौर ईपीसी (इंजिनिअरिंग, प्रोक्योअरमेंट आणि कंस्ट्रक्शन) कंपनी आहे, जी निवासी सोलर रुफटॉप, इंडस्ट्रियल सोलर एनर्जी प्लांट्स, जमिनीवर बसवलेले सौर ऊर्जा प्लांट्स आणि सौर पथ दिवे यामध्ये दिग्गज मानली जाते. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 1885.2 टक्क्यांनी वाढून 5.72 कोटीवर पोहोचला, जो मागील वर्षी केवळ 28 लाख होता. या कालावधीत कंपनीचा महसूल 125.98% ने वाढून 54.54 कोटी झाला आहे, जो मागील वर्षी 24.13 कोटी होता.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.