Budget 2024 Share Market Sakal
Share Market

Budget 2024: अर्थसंकल्पापूर्वी आणि नंतर कसा असतो शेअर बाजार? गुंतवणूक करावी का? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला

Budget 2024 Share Market: सध्या शेअर बाजारात तेजी आहे आणि केंद्रीय अर्थसंकल्प 2024 पर्यंत बाजारात ही तेजी कायम राहील असा विश्वास आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर होण्यासाठी आता अवघे काहीच दिवस उरले आहेत.

राहुल शेळके

Budget 2024 Share Market: सध्या शेअर बाजारात तेजी आहे आणि केंद्रीय अर्थसंकल्प 2024 पर्यंत बाजारात ही तेजी कायम राहील असा विश्वास आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर होण्यासाठी आता अवघे काहीच दिवस उरले आहेत. पण केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आणि सादर झाल्यानंतर शेअर बाजार कसा असतो ते जाणून घेऊया.

2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. निवडणुकीनंतर सरकारने 5 जुलै 2019 रोजी अर्थसंकल्प सादर केला. यापूर्वी 10 जुलै 2014 आणि 6 जुलै 2009 रोजी सरकारने निवडणुकीनंतर पूर्ण अर्थसंकल्प सादर केला होता.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन अशा वेळी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत जेव्हा अर्थव्यवस्थेचा विकासदर 8 टक्क्यांच्या वर आहे. शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी उच्चांकावर आहेत. अनेक शेअर्सच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. बाजारातील काही तज्ञ उच्च मूल्यांकनावर चिंता व्यक्त करत आहेत.

Budget 2024 Share Market

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख सिद्धार्थ खेमका यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती खूपच मजबूत आहे. जीडीपी वाढ खूप जास्त आहे. सरकारची आर्थिक स्थिती सुधारली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमी-अधिक प्रमाणात स्थिर राहिला आहे.

कंपन्यांच्या नफ्यात चांगली वाढ आहे. तेजी मंडीचे उपाध्यक्ष (संशोधन) राज व्यास म्हणाले की, शेअर बाजाराचे मूल्यांकन थोडे जास्त वाटते परंतु कालावधीच्या दृष्टीकोनातून ते जास्त नाही. भारताची विकास क्षमता जगातील इतर देशांच्या तुलनेत खूप जास्त आहे. परंतु, अनेक तज्ञ मूल्यांकन हे चिंतेचे कारण मानतात. गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे ते म्हणतात. पुढे बाजारात मोठी घसरण होऊ शकते.

अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारात मोठी घसरण

गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की, अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारात मोठी घसरण झाली होती. 2009 मध्ये पूर्ण अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजार 5 टक्क्यांहून अधिक घसरला होता. मात्र, अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवसांत बाजारात तेजी होती.

2009 च्या अर्थसंकल्पाच्या आधीच्या दिवसांत 15 टक्क्यांची कमाल वाढ दिसून आली. 2019 आणि 2004 च्या अर्थसंकल्पानंतर बाजार घसरला होता. 2014 आणि 2009 मध्ये घसरण झाली होती.

यावेळी सरकारकडे पैशांची कमतरता नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. RBI कडून अपेक्षेपेक्षा जास्त लाभांश मिळाल्याने मनोबल उंचावले आहे. यासह, Fiscal Consolidationवर लक्ष केंद्रित करत सरकारला खर्च वाढवण्यास वाव आहे. अर्थसंकल्पात वित्तीय तूट नियंत्रणात ठेवताना सरकार खर्च वाढवण्यासाठी काय उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT