Upcoming IPO: सध्या IPOमुळे शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. छोट्या ते मोठ्या कंपन्यांचे IPO शेअर बाजारात लिस्ट होत आहेत आणि गुंतवणूकदारांना चांगला प्रीमियम देत आहेत. या अनुषंगाने येणारा आठवडाही गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा असणार आहे.
या आठवड्यात 12 नवीन IPO लाँच केले जाणार आहेत. या IPO च्या माध्यमातून कंपन्या गुंतवणूकदारांकडून 4,600 कोटी रुपये उभारतील. गेल्या आठवडाभरात कंपन्यांनी 4,000 कोटी रुपये उभे केले होते.
कोणत्या कंपन्यांचा IPO येणार?
मुथूट मायक्रोफिनचा आयपीओ 18 डिसेंबरला उघडेल आणि 20 डिसेंबरला बंद होईल. तो 760 कोटी रुपयांचा आहे आणि त्याची किंमत 277 रुपये ते 291 रुपये प्रति शेअर आहे.
सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा IPO 18 डिसेंबरला उघडेल आणि 20 तारखेला बंद होईल. तो 400 कोटी रुपयांचा आहे. त्याची किंमत 340 ते 360 रुपये प्रति शेअर आहे.
Motisons Jewellers Limited IPO देखील 18 तारखेला उघडेल आणि 20 तारखेला बंद होईल. तो 151.09 कोटी रुपयांचा आहे. त्याची किंमत 52 ते 55 रुपये प्रति शेअर आहे.
Happy Forgings Limited IPO 19 तारखेला उघडेल आणि 21 ला बंद होईल. तो 400 कोटी रुपयांचा आहे. त्याची किंमत 808 ते 850 रुपये प्रति शेअर आहे
Credo Brands Marketing Limited IPO देखील 19 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 21 डिसेंबर रोजी बंद होईल. त्याची किंमत 266 रुपये ते 280 रुपये प्रति शेअर आहे.
RBZ ज्वेलर्सचा IPO 19 ते 21 डिसेंबर या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल, ज्याचा प्राइस बँड 95 ते 100 रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे.
आझाद इंजिनियरिंग लिमिटेडचा IPO 20 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 22 रोजी बंद होईल.त्याची किंमत 499 रुपये ते 524 रुपये आहे.
Innova Captab IPO 21 डिसेंबरला सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 26 डिसेंबरला बंद होईल. IPO ची किंमत 426 रुपये ते 448 रुपये प्रति शेअर आहे.
सहारा मेरिटाइम लिमिटेडचा IPO 18 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 20 डिसेंबर रोजी बंद होईल. IPO ची किंमत 81 रुपये प्रति शेअर आहे.
इलेक्ट्रो फोर्स (इंडिया) लिमिटेड IPO 19 डिसेंबर रोजी उघडेल आणि 21 डिसेंबर रोजी बंद होईल. एका शेअरची किंमत 93 रुपये प्रति शेअर आहे.
शांती स्पिन्टेक्स लिमिटेड आयपीओ 19 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 21 डिसेंबर रोजी बंद होईल. IPO ची किंमत 66 ते 70 रुपये प्रति शेअर आहे.
Trident Techlabs Limited IPO 21 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 26 डिसेंबर 2023 रोजी बंद होईल. त्याची किंमत प्रति शेअर 33 ते 35 रुपये आहे.
'या' कंपन्यांची होणार लिस्टिंग
पुढील आठवडाभरात 8 कंपन्या लिस्ट होणार आहे. यामध्ये DOMS Industries, Indian Shelter Finance Corporation, Prestonic Engineering, SJ Logistics (India), Shree OSFM E-Mobility, Siyaram Recycling Industries, Benchmark Computer Solutions आणि Inox India Limited यांचे IPO आहेत.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.