Economist Harry Dent On Stock Market Sakal
Share Market

Stock Market Crash: धक्कादायक! 2025मध्ये शेअर बाजार होणार क्रॅश! अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाच्या दाव्याने खळबळ

Stock Market Crash: प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हॅरी डेंट यांनी 2025 मध्ये शेअर बाजार क्रॅश होऊ शकतो असा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, हा क्रॅश 2007-2008 च्या मार्केट क्रॅशपेक्षा मोठा असू शकतो. डेंटच्या मते, हा एक बुडबुडा आहे जो कधीही फुटू शकतो.

राहुल शेळके

Economist Harry Dent On Stock Market: प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हॅरी डेंट यांनी 2025 मध्ये शेअर बाजार क्रॅश होऊ शकतो असा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, हा क्रॅश 2007-2008 च्या मार्केट क्रॅशपेक्षा मोठा असू शकतो. डेंटच्या मते, हा एक बुडबुडा आहे जो कधीही फुटू शकतो.

1989 मध्ये, डेंटने जपानच्या मालमत्तेच्या किमतीचा फुगा फुटण्याचा अंदाज वर्तवला होता, जो खरा ठरला होता. यानंतर 2000 मध्ये त्यांनी डॉट कॉम बबलबाबतही अशीच भविष्यवाणी केली होती. तेव्हाही तो योग्य ठरला होता.

डेंट यांनी अमेरिकन टीव्ही चॅनल फॉक्सशी केलेल्या संभाषणात सांगितले की, “1925 ते 1929 पर्यंत एक नैसर्गिक बबल होता. अर्थव्यवस्थेत अतिरिक्त रोख रक्कम ओतल्याने अर्थव्यवस्थेला दीर्घकाळात फायदा होईल अशी अपेक्षा आहे. पण हा फुगा कधीही फुटू शकतो.''

डेंटच्या मते, ही घसरण पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून मध्यापर्यंत कधीही होऊ शकते. या घसरणीमागे त्यांनी गृहनिर्माण बाजार हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 2008 च्या क्रॅशमध्ये गृहनिर्माण बाजाराचाही मोठा वाटा होता.

डेंटच्या म्हणण्यानुसार, “हा बुडबुडा सरकारने तयार केला आहे. जर तुम्ही मानवी इतिहासावर नजर टाकली तर तुम्हाला फुकटात काहीही मिळत नाही आणि फुगे नेहमीच फुटतात. ही भीती खरी होण्याची शक्यता लोकांच्या अंदाजापेक्षा खूप जास्त आहे.”

2007-08 पेक्षाही वाईट परिस्थिती होणार

ते म्हणाले की, जेव्हा हा फुगा फुटेल तेव्हा बाजारातील घसरण 2007-08 च्या संकटापेक्षा मोठी असू शकते. ते म्हणाले की S&P 86 टक्क्यांनी आणि NASDAQ 92 टक्क्यांनी घसरेल. डेंटच्या मते, Nvidia, जो सध्या खूप मजबूत स्टॉक दिसत आहे, जर त्याचा स्टॉक 98 टक्क्यांनी घसरला तर समजून घ्या की सर्वकाही संपले आहे.

डेंट म्हटल्याप्रमाणे तसे झाले तर गुंतवणूकदारांचे लाखो डॉलर्सचे नुकसान होईल ज्यातून बाजाराला फार काळ सावरणे शक्य होणार नाही. डेंट म्हणतात की साधारणपणे 5-6 वर्षात बुडबुडे फुटतात पण हा फुगा 14 वर्षांपासून सुरू आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT