Stock Market Crash: भारतीय शेअर बाजारात सध्या गोंधळाचे वातावरण आहे. गेल्या सहा दिवसांपासून बाजारात घसरणीचे वातावरण आहे. एकामागून एक नकारात्मक बातम्या येत आहेत. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावना अधिकच बिघडत आहे.
अवघ्या आठवडाभरापूर्वी भारतीय शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर होता. निफ्टीने 26,0277 अंकांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. तर सेन्सेक्स 85,978.25 वर पोहोचला होता.
आज सेन्सेक्स 81,030 अंकांवर घसरला आहे, हा निर्देशांक त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून सुमारे 5000 अंकांनी घसरला आहे. तर निफ्टी 24,789 अंकांवर घसरला आहे. निफ्टीही उच्चांकावरून जवळपास 1500 अंकांनी घसरला आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये विशेषत: किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये नाराजी आहे.
कारण गेल्या 6 दिवसांच्या घसरणीत गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे बुडाले आहेत, निर्देशांक 7 ते 8 टक्क्यांनी घसरला असला, तरी काही गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ 20 टक्क्यांनी घसरले आहेत.
आज सोमवारी भारतीय बाजार वाढीसह उघडले, निफ्टीने 100 अंकांची वाढ नोंदवली, परंतु हळूहळू बाजार घसरायला लागला आणि नंतर सेन्सेक्स-निफ्टी सुमारे 1 टक्क्यांनी घसरला. सर्वात मोठी घसरण मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये झाली.
आयटी शेअर्समध्ये थोडी तेजी दिसून आली. पण आज सरकारी कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत, रेल्वेचे शेअर्सही घसरले आहेत.
आता जेव्हा आपण घसरणीची खरी कारणे शोधतो तेव्हा गेल्या आठवड्यात इस्रायल-इराण युद्ध हे सर्वात मोठे कारण होते, परंतु याशिवाय विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून सतत पैसे काढून घेत आहेत.
गेल्या 5 दिवसांत FII ने भारतीय बाजारातून सुमारे 40 हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत. तसेच चीनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या मदत पॅकेजमुळे परदेशी गुंतवणूकदार अल्पावधीतच चिनी शेअर बाजाराकडे आकर्षित होत आहेत, त्यामुळे ते भारतीय बाजारातून पैसे काढून घेत आहेत.
पण आज बाजारातील मोठ्या घसरणीची कारणे पाहिली तर दोन राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत एक्झिट पोलमध्ये ज्याप्रकारे अंदाज वर्तवले जात आहेत, त्यामुळे बाजाराचा मूडही बिघडला आहे. असे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.
विशेषत: हरियाणा, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, दिल्लीमध्ये निवडणूका आहेत. या राज्यांमध्ये भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र आणि हरियाणा या 2 राज्यांमध्ये भाजप पराभूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हरियाणा आणि महाराष्ट्राबाबत बाजार चिंताग्रस्त आहे. कारण उद्योगाच्या दृष्टिकोनातून हरियाणा आणि महाराष्ट्र ही देशातील महत्त्वाची राज्य आहेत. इथे सत्ताबदल झाला तर धोरणातही बदल होताना दिसतो. हरियाणामध्ये गुरुग्राम, फरीदाबाद आणि रोहतक सारखे औद्योगिक केंद्र आहेत. दोन्ही राज्यांमध्ये देश आणि जगातील अनेक मोठ्या कंपन्या आहेत.
जर सरकार बदलले आणि काँग्रेस सत्तेवर आली तर केंद्र सरकारला धोरण तयार करताना काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. मात्र, देशातील मोठे उद्योग असलेल्या बहुतांश राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही. ज्यामध्ये कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि दिल्लीचा समावेश आहे.
आजची घसरण एक्झिट पोलशी जोडली जात आहे कारण, एकीकडे, बाजाराची सुरुवात तेजीसह झाली होती, कारण जागतिक संकेत चांगले होते. शुक्रवारी अमेरिकन बाजार वाढीसह बंद झाले होते.
इराण आणि इस्रायलमधील परिस्थिती गेल्या आठवड्याच्या तुलनेत बिघडलेली नाही, जर ती आणखी बिघडली असती तर त्याचा सर्वाधिक परिणाम अमेरिकन बाजारावर झाला असता. अशा स्थितीत एक्झिट पोलचा प्रभाव बाजारात दिसून येत आहे, असे म्हणता येईल.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.