Lookback 2023 Sakal
Share Market

Lookback 2023: जीडीपी वाढ ते शेअर मार्केटचा धडाका, भारतीय अर्थव्यवस्थेने 2023 मध्ये केले अनेक विक्रम

Lookback 2023: 2023 वर्षात भारताने आर्थिक विकासाचे अनेक टप्पे पार केले आहेत.

राहुल शेळके

Lookback 2023: डिसेंबर 2023 महिना सुरू झाला आहे. या वर्षात भारताने आर्थिक विकासाचे अनेक टप्पे पार केले आहेत. 2023 मध्ये देशाची अर्थव्यवस्था नव्या दिशेने वाटचाल करत आहे. जागतिक आर्थिक आव्हाने असूनही भारताचा GDP वाढत आहे.

2023 मध्ये, G20 चे यशस्वी आयोजनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळाले आहे. रशिया-युक्रेन युद्धापासून ते इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धापर्यंत जगाचे आर्थिक चाक पंक्चर झाले आहे. पण या सर्व परिस्थितीतही भारताचा विकास झपाट्याने होत आहे. भारताने यावर्षी अर्थव्यवस्थेत कोणत्या क्षेत्रात आघाडी घेतली याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

शेअर बाजाराने केला नवा विक्रम

भारतीय शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकांनी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) या वर्षी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने चालू वर्षातील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. गेल्या वर्षी शेवटच्या दिवशी म्हणजेच 30 डिसेंबर 2022 रोजी सेन्सेक्स 60,840.74 अंकांवर बंद झाला होता.

8 डिसेंबर रोजी सेन्सेक्स 69,888.33 अंकांवर पोहोचला. याचा अर्थ सेन्सेक्सने एका वर्षात गुंतवणूकदारांना सुमारे 15 टक्के परतावा दिला आहे. या वर्षी 8 डिसेंबरपर्यंत जगातील सर्वाधिक परतावा देणाऱ्या निर्देशांकांमध्ये सेन्सेक्स पाचव्या स्थानावर आहे.

8 डिसेंबर रोजी निफ्टीनेही 21000 अंकांची पातळी ओलांडली. तर चालू वर्षात निफ्टीमध्ये 2,900.8 अंकांची जबरदस्त झेप पाहायला मिळाली. 30 डिसेंबर 2022 रोजी निफ्टी 18,105.30 अंकांवर होता. या कालावधीत निफ्टीने गुंतवणूकदारांना 16 टक्के परतावा दिला आहे. जागतिक शेअर बाजारात निफ्टी हा चौथा सर्वाधिक परतावा देणारा निर्देशांक आहे.

परकीय गुंतवणूकदारांचा वाढता कल

फोर्ब्सने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की, जगात सध्या सुरू असलेल्या मंदीच्या काळात विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारपेठेतील रस वाढला आहे. तो केवळ भारतीय शेअर बाजारात पैसाच गुंतवत नाही, तर तो भारतीय कंपन्यांमध्येही गुंतवणूक करत आहे.

अहवालात भारत सरकारच्या नियमांची प्रशंसा करण्यात आली होती. अहवालात असे सांगण्यात आले होते की, डिजिटल इंडियाच्या काळात केंद्र सरकारने प्रत्येक प्रकारचे सरकारी काम ऑनलाइन केले आहे. त्यामुळे कमी वेळेत सरकारी कागदपत्रे मिळत आहेत. सरकारच्या अधिकृत वेबसाइट इन्व्हेस्ट इन इंडियानुसार, भारतात 2022-23 या आर्थिक वर्षात 70 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे.

रेकॉर्ड GST संकलन

भारतात वस्तू आणि सेवांवर जो कर आकारला जातो त्याला GST म्हणतात. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलन 15 टक्क्यांनी वाढून 1.67 लाख कोटी रुपये झाले आहे.

हा सलग चौथा महिना आहे ज्यात GST ची कमाई 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. तर ऑक्टोबर महिन्यात जीएसटी डेटा 1.71 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले. 2023-24 या आर्थिक वर्षात GST संकलनाने 1.60 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची ही सहावी वेळ आहे.

G-20 शिखर परिषदेचे आयोजन

G20 शिखर परिषदेदरम्यान 115 हून अधिक देशांतील 25 हजारांहून अधिक प्रतिनिधींनी देशभरातील 60 शहरांमध्ये 220 हून अधिक बैठका घेतल्या. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G-20 शिखर परिषदेदरम्यान भारताने संपूर्ण जगाला 'वसुधैव कुटुंबकम'चा संदेश दिला. 2023 मध्ये ब्रिटन, युरोपियन युनियन आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांसोबत मुक्त व्यापार करार किंवा FTA बाबतही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे परकीय गुंतवणूकीत झालेली मोठी वाढ.

परकीय चलनाचा साठ्यात वाढ

2023 मध्ये परकीय चलनाच्या साठ्याच्या बाबतीतही देशाची कामगिरी समाधानकारक आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला देशाच्या परकीय चलनाच्या साठ्याने पुन्हा एकदा 600 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. RBI च्या आकडेवारीनुसार, 1 डिसेंबर रोजी देशाचा परकीय चलन साठा 604 अब्ज डॉलर होता. यापूर्वी 11 ऑगस्ट रोजी देशाचा परकीय चलन साठा 600 अब्ज डॉलर होता.

जीडीपी वाढीचा अंदाज 6.4 टक्क्यांपर्यंत

सर्व जागतिक आव्हाने असूनही, 2023 मध्ये भारताने आपला विकास दर वाढवण्यात यश मिळवले आहे. सकल देशांतर्गत उत्पादनावर (GDP) रेटिंग एजन्सी S&P च्या डेटाने सकारात्मक अंदाज वर्तवला आहे. S&P ने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताच्या वाढीचा अंदाज 6.4 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

आगामी काळात देशाचा जीडीपी 6 ते 7.5 टक्क्यांच्या दरम्यान राहू शकतो. भारताची मध्यवर्ती बँक - भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चालू आणि पुढील आर्थिक वर्षासाठी GDP वाढीचा दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सरकारच्या मते आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 7.2 टक्के दराने वाढली आहे.

महागाई नियंत्रणात ठेवण्यात यश

महागाईच्या आघाडीवरही 2023 मध्ये भारताची कामगिरी समाधानकारक राहिली. केंद्र सरकार आणि RBI च्या धोरणामुळे महागाई दर चार ते सहा टक्क्यांच्या दरम्यान राखण्यात यश आले. हवामानाच्या आव्हानांमुळे खाद्यपदार्थांच्या वाढत्या किंमतींमुळे चिंता नक्कीच वाढली आहे.

परंतु सरकार आणि आरबीआयने उचललेल्या पावलांमुळे महागाई नियंत्रणात आली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने सुरुवातीला रेपो दर 6.5% पर्यंत वाढवला. महागाई वाढीत स्थिरता आल्यानंतर, रेपो दर फेब्रुवारी 2023 पासून स्थिर ठेवण्यात आला.

आयटीआर भरण्याचा नवा विक्रम

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, देशात आयकर भरणाऱ्यांची फक्त संख्याच वाढली नाही, तर आयटीआर भरण्याचा नवा विक्रमही केला आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत देशात 7.85 कोटीहून अधिक आयकर रिटर्न भरले गेले आहेत. देशातील आयटीआर दाखल करण्याचा हा आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम आहे.

आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, 2023-24 या वर्षासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत विक्रमी 7.85 कोटी प्राप्तिकर रिटर्न (ITR) दाखल करण्यात आले आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षात 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत दाखल केलेल्या आयकर रिटर्नची एकूण संख्या 7.85 कोटी आहे, जी आतापर्यंतची सर्वाधिक आहे.

UPI ने केला नवा विक्रम

युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) व्यवहारांनी नोव्हेंबरमध्ये नवीन उच्चांक गाठला. UPI व्यवहार 17.4 ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहोचले. हा आकडा ऑक्टोबरमधील 17.16 ट्रिलियन रुपयांपेक्षा 1.4 टक्के अधिक आहे.

नोव्हेंबर महिन्यात सणासुदीच्या हंगामामुळे UPI व्यवहारांमध्ये आणखी वाढ झाली आहे. लोक UPI व्यवहारांना महत्त्व देत आहेत. मेट्रो शहरांसह इतर शहरांमध्ये रोख रकमेऐवजी यूपीआय व्यवहारांचा वापर वाढला आहे. अगदी छोटे उद्योगही UPI द्वारे व्यवहार करत आहेत.

जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल

जगभरातील गुंतवणूकदार भारतात पैसे गुंतवत आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. भारतातील वाढत्या गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेचा आकार झपाट्याने वाढत आहे. S&P ग्लोबल रेटिंग्सनुसार, भारत 2030 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.

भारत सध्या अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपाननंतर जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या अंदाजानुसार भारत 2027-28 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरच्या GDP सह जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT