yes bank share soared 40 percent in 3 days bank share may cross 45 rupee  Sakal
Share Market

Yes Bank: एक डील अन् गुंतवणूकदार झाले मालामाल! येस बँकेच्या शेअर्समध्ये 3 दिवसांत 40 टक्क्यांची वाढ

Yes Bank Share Price: येस बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. येस बँकेचा शेअर गुरुवारी 8 टक्क्यांहून अधिक वाढून 32.74 रुपयांवर पोहोचला. येस बँकेच्या शेअर्समध्ये गेल्या 3 दिवसात 40% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

राहुल शेळके

Yes Bank Share Price: येस बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. येस बँकेचा शेअर गुरुवारी 8 टक्क्यांहून अधिक वाढून 32.74 रुपयांवर पोहोचला. येस बँकेच्या शेअर्समध्ये गेल्या 3 दिवसात 40% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की येस बँकेचे शेअर 45 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. येस बँकेच्या शेअर्सनेही गुरुवारी 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 14.10 रुपये आहे.

एचडीएफसी 9.5% हिस्सा खरेदी करत आहे

एचडीएफसी बँकेने येस बँकेतील भागभांडवल खरेदी करण्याचा करार केला आहे आणि सोमवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 9.5 टक्के हिस्सा खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. तेव्हापासून कंपनीचे शेअर्स वाढत आहेत.

शेअर्स 3 दिवसात 40% पेक्षा जास्त वाढ

येस बँकेच्या शेअर्समध्ये गेल्या 3 दिवसात 40% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. 5 फेब्रुवारी 2024 रोजी बँकेचे शेअर्स 22.82 रुपयांवर बंद झाले होते. येस बँकेचे शेअर्स 8 फेब्रुवारी 2024 रोजी 32.74 रुपयांवर पोहोचले आहेत.

येस बँकेचे शेअर्स गेल्या 3 महिन्यांत 95% पेक्षा जास्त वाढले आहेत. 7 नोव्हेंबर 2023 रोजी बँकेचे शेअर्स 16.81 रुपयांवर होते. यावर्षी आतापर्यंत येस बँकेचे शेअर्स सुमारे 45 टक्क्यांनी वाढले आहेत.

मार्केट एक्सपर्ट कुश बोहरा यांनी सांगितले की, येस बँकेच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दीर्घकाळ वाट पाहण्यास भाग पाडले आहे. येस बँकेचे शेअर्स सुमारे साडेतीन वर्षांनंतर या पातळीवर परतले आहेत. येस बँकेचे शेअर्स तेजीत आहेत, त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे.

कुश बोहरा म्हणाले की 26-27 रुपयांची पातळीवर लक्ष असेल आणि जर बँकेच्या शेअर्सने ही पातळी ओलांडली तर त्यांचे पुढील लक्ष्य 35 रुपये असेल. यानंतर बँकेचे शेअर 45 रुपयांपर्यंत जाऊ शकतात.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jet Airways: आता जेट एअरवेज होणार इतिहासजमा; सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

Ajit Pawar: मविआकडून महिलांसाठी दरमहा 3,000 रुपयांची घोषणा, अजितदादा खवळले; संपूर्ण हिशोबच मांडला

Maharashtra Cyber Department: “गुन्हेगारी प्रवृत्तींचे उदात्तीकरण करणारे टी-शर्ट विकणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मविरुद्ध FIR नोंदवला”

अली फझल आणि रिचा चड्ढाने अखेर उघड केलं लेकीचं नाव ; नावाचा अर्थ ऐकून व्हाल चकित !

Latest Maharashtra News Updates : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT