IPO Open sakal
Share Market

IPO Open : झेडटेक इंडियाचा आयपीओ 29 मेपासून खुला ; डिटेल्स जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा

झेडटेक इंडियाचा (ZTech India) आयपीओ उद्या अर्थात 29 मेपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला होत आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओ मध्ये 31 मे पर्यंत गुंतवणूक करण्याची संधी असेल. या आयपीओतून 37.30 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. आयपीओ सुरू होण्यापूर्वी ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्सना चांगली मागणी आहे. या आयपीओसाठी प्रति शेअर 104-110 रुपयांचा प्राइस बँड ठेवण्यात आला आहे. इश्यू अंतर्गत 33.91 लाख फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. त्याच वेळी, ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) कोणतीही विक्री होणार नाही.

झेडटेक इंडियाच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये जोरदार चर्चा दिसून आली. 26 मे रोजी हा आयपीओ 65 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत होता. त्यानुसार कंपनीचे शेअर्स 175 रुपयांना लिस्ट होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास गुंतवणूकदारांना 59 टक्के इतका मोठा नफा मिळेल.

टेक इंडियाच्या आयपीओमध्ये गुंतवणूकदार किमान 1200 शेअर्स आणि त्याच्या पटीत बोली लावू शकतात. त्यानुसार गुंतवणूकदारांना किमान 1 लाख 32 हजारांची गुंतवणूक करावी लागेल. सबस्क्रिप्शननंतर शेअर्सचे ऍलॉटमेंट 3 जूनला होणे अपेक्षित आहे. त्याच वेळी, रिफंड प्रोसेस 4 जूनपासून सुरू होईल. कंपनीच्या शेअर्सची एनएसई एसएमईवर लिस्ट होण्याची संभाव्य तारीख 4 जून आहे.

झेडटेक इंडियाची सुरुवात 1994 मध्ये झाली. कंपनी देशात सिव्हिल इंजिनीअरिंग उत्पादने डिझाइन करते. जे इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिव्हिल कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट्ससाठी अत्याधुनिक स्पेशालिटी जियो-टेक्निकल सॉल्यूशन्स देते. वेस्ट मॅनेजमेंट सेक्टरमध्ये अर्थात कचरा व्यवस्थापन क्षेत्रात कंपनीचा सक्रिय सहभाग आहे. रिसायकल्ड स्क्रॅप मटेरियलचा वापर करून थीम पार्क तयार करण्यावर त्यांचा फोकस आहे. झेडटेक इंडियाचा महसूल 160.28 टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्ष 2024 मध्ये 67.37 कोटी झाला. वर्षभरापूर्वी तो 25.88 कोटी होता. आर्थिक वर्षात कंपनीचा निव्वळ नफा 296.44 टक्क्यांनी वाढून 7.79 कोटी झाला. आर्थिक वर्ष 2023 मध्ये तो 1.96 कोटी होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: लाडकी बहिण योजना सरकारनं तुर्तास थांबवली! काय आहे कारण? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

JioCinema: जिओ सिनेमा लवकरच बंद होणार! मुकेश अंबानी घेऊ शकतात मोठा निर्णय; काय आहे कारण?

Local Train Derailed : मुंबईत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला; प्रवाशांचा खोळंबा

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT