Zerodha Stock Broking scam Sakal
Share Market

Zerodha Scam: झिरोधामध्ये सर्वात मोठा स्टॉक ब्रोकिंग घोटाळा; 15 लोकांनी केली करोडोंची लूट, 432 बनावट खाती

राहुल शेळके

Zerodha Stock Broking scam: सुरतमध्ये स्टॉक ब्रोकिंग घोटाळा उघडकीस आला आहे. सीआयडी गुन्हे शाखेने 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घोटाळ्यात किशन सोनी नावाचा व्यक्ती सामील होता, ज्यावर ब्रोकरेज प्लॅटफॉर्म झिरोधावर बनावट डीमॅट आणि ट्रेडिंग खाती तयार केल्याचा आरोप आहे.

सीआयडी क्राईमच्या म्हणण्यानुसार, झिरोधा लिमिटेडने सुरतच्या किशन सोनीविरोधात तक्रार दाखल केली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार, किशन आधी झिरोधामध्ये ग्राहक म्हणून सामील झाला आणि नंतर तो स्टॉक ब्रोकर झाला. त्या बदल्यात त्याला कमिशन मिळत असे.

मात्र नंतर त्याने उघडलेली सर्व खाती बनावट असल्याचे निष्पन्न झाले. बनावट डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट तयार करून त्याने कंपनीची फसवणूक केली आहे. किशनने 2018 मध्ये प्रथम ग्राहक म्हणून कंपनीत प्रवेश केला. 2020 मध्ये तो एजंट झाला. या काळात त्याने सुमारे 432 खाती उघडली होती ज्यातून त्याला 55 लाख रुपये कमिशन मिळाले होते.

प्रकरण कसे उघड झाले?

कंपनीत उघडलेल्या 432 खात्यांपैकी 332 खात्यांमध्ये डेबिट शिल्लक असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आल्याने झिरोधाचा हा घोटाळा उघडकीस आला. मात्र खातेदारांना बोलावले असता अनेकांनी खाती दाखवण्यास नकार दिला.

कंपनीने या प्रकरणाची चौकशी केली असता किशनने उघडलेली खाती बनावट कागदपत्रांचा वापर करून तयार केल्याचे आढळून आले. बिहारमधील 14 लोकांनी ही खाती हाताळण्यास मदत केली होती.

कंपनीचे किती नुकसान झाले?

ब्रोकरेजचे जास्त शुल्क मिळविण्यासाठी अनेक खात्यांमध्ये छोटे व्यवहार केले गेले. एका तपासात असे दिसून आले की या घोटाळ्यामुळे सुमारे 2.20 कोटी रुपयांची कर आणि जीएसटी चोरी झाली आणि एकूण फसवणूकीची रक्कम 2.75 कोटी रुपये झाली.

घोटाळ्यात सहभागी असलेल्या प्रत्येक खात्याचे अंदाजे 70,000 ते 72,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी गुन्हे शाखा करत आहे.

झिरोधाने गुंतवणूकदारांना काय सल्ला दिला?

  • झिरोधाने आपल्या ग्राहकांना अधिक पैसे कमावण्यासाठी चुकीच्या पद्धतींचा वापर करू नये असा इशारा दिला आहे.

  • झिरोधाने सांगितले की शेअर बाजारातील बहुतांश फसवणुकीत पेनी स्टॉक आणि इलिक्विड पर्यायांचा वापर केला जातो.

  • झिरोधाने ग्राहकांना त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स इतर कोणालाही देऊ नका असा सल्ला दिला आहे.

  • झिरोधाने ग्राहकांना त्यांच्या ईमेल आणि सोशल मीडिया खात्यांवर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) चालू करण्याचा सल्ला दिला आहे.

  • झिरोधाने ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सेट करण्याचा सल्ला दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Row: तिरुपती लाडू प्रकरणात मोठी अपडेट! देवस्थानने 'या' संस्थेविरोधात दाखल केली तक्रार

Vasudha : सेटवरील नो फोन पॉलिसीचा अभिनेत्रीला फटका! भावाचा मृत्यू झाल्याची बातमी समजलीच नाही

PAK vs ENG: इंग्लंडला रोखण्यासाठी पाकिस्तानचे जुन्या फलंदाजाला पाचारण

Generation Z Job Crisis : 'जेन-झी' तरुणांना नोकऱ्या मिळवताना का येत आहेत अडचणी? कंपन्यांनीच थेट सांगितलं कारण

IND vs BAN: दिल्ली के छोरे! गंभीर, विराट अन् पंतची एअरपोर्टवर बग्गी राईड, Video Viral

SCROLL FOR NEXT