Share Market Opening Sakal
Sakal Money

Share Market Opening: मोदी 3.0 च्या शपथविधीनंतर शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक... सेन्सेक्स पहिल्यांदाच 77 हजारांचा टप्पा पार, निफ्टी 23400 च्या वर

Share Market Opening: देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात उच्चांकावर झाली असून यानंतर सेन्सेक्सने प्रथमच 77,000 चा आकडा ओलांडला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. रविवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर सोमवारी शेअर बाजारात तेजी आली आणि सेन्सेक्सने प्रथमच 77000 चा टप्पा पार केला.

आज सोमवारी शेअर बाजाराला सुरूवात होताच बाजारात मोठी तेजी दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत असून देशात काल नवे सरकार आल्यानंतर बाजाराला मोठी उसळी दिसून येत आहे. सेन्सेक्सने प्रथमच 77,000 अंकाचा ओलांडला असून निफ्टीने 23400 चा स्तर ओलांडून ऐतिहासिक शिखर गाठले आहे.

देशात एनडीए सरकार सत्तेवर आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. शेअर बाजारानेही सोमवारी मोदी 3.0ला सलाम करत इतिहास रचला. प्रत्यक्षात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या 30 शेअर्सच्या सेन्सेक्सने 323.64 अंकांच्या मजबूत वाढीसह प्रथमच 77,000 चा टप्पा ओलांडला. तो 77,017 च्या पातळीवर उघडला.

त्याचवेळी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकानेही बाजार उघडल्यानंतर 105 अंकांची उसळी घेतली. गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी मजबूत वाढीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 1618.85 अंकांच्या किंवा 2.16 टक्क्यांच्या वाढीसह 76,693.41 वर बंद झाला.

बाजारातील नवीन विक्रमी उच्च पातळी

आज बाजार उघडताच BSE सेन्सेक्सने 77,079.04 चा आत्तापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. त्याच वेळी, निफ्टीने 23,411.90 चा स्तर गाठून प्रथमच 23400 ची पातळी ओलांडली आहे.

बाजाराची सुरूवात कशी झाली?

आज बाजाराची सुरुवात उच्चांकावर झाली आणि सेन्सेक्स २४२.०५ अंकांच्या आणि ०.३२ टक्क्यांच्या वाढीसह ७६,९३५ वर होता, हा त्याचा नवीन विक्रमी उच्चांक आहे. तर NSE चा निफ्टी 29.00 (0.12 टक्के) वाढीसह 23,319.15 वर उघडला आहे.

बाजार उघडताच हे शेअर्स तेजीत

अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड कॉर्प, बजाज ऑटो, कोल इंडिया आणि श्रीराम फायनान्सच्या शेअर्समध्ये निफ्टी निर्देशांकात मोठी तेजी दिसून आली. याउलट टेक महिंद्रा, इन्फोसिस, डॉ रेड्डीज लॅब्स, एलटीआय माइंडट्री आणि हिंदाल्को यांच्या समभागांमध्ये घसरण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT