Success Story of Richa Kar Owner of Zivame Undergarments Company  
Sakal Money

Success Story : रिचाने कुटुंबियांचा विरोध पत्कारून उभी केली महिलांच्या अंडरगारमेंट्सची कंपनी, आज आहे कोट्यावधींची मालकीण

एका मुलीनं कुटुंबाच्या विरोधात जाऊन महिला अडरगारमेंट्सचा व्यवसाय सुरु केला अन् आता आहे कोट्यावधींची मालकीण

सकाळ डिजिटल टीम

जग कितीही पुढे गेलं तरी अजुनही महिलांच्या अंतर्वस्त्राबद्दल बद्दल मोकळेपणाने बोलले जात नाही. विशेष म्हणजे महिलाच अतंर्वस्त्राचा विषय निघाला की कचवचतात इतकेच काय तर खरेदी करतानाही मागे पुढे कोणी आहे का? विक्रीकरता महिला आहे की पुरुष हेदेखील अनेक महिला पाहताना दिसतात. पण थोडा विचार करा.

13 वर्षापूर्वी एखाद्या मुलीनं आपल्या घरच्यांना महिलांचे अतंर्वस्त्र विकण्याचा व्यवसाय सुरु करायचा आहे असं सांगितल्यावर काय झालं असले. हो ही गोष्टी खरी आहे. एका मुलीनं कुटुंबाच्या विरोधात जाऊन हा व्यवसाय सुरुदेखील केला आणि आज ती कोट्यावधींची मालकीण आहे.

तर हा व्यवसाय करणाऱ्या मुलींच नाव रिचा कर असं आहे. तिनं घरच्यांचा विरोध पक्तरुन झीवामी ही कंपनी सुरु केली. ही कंपनी सुरु करताना, घरच्यांनी तिला अनेक सवाल उपस्थित केले. आई म्हणाली तुझी मुलगी काय करते असे कोणी विचारले तर मी काय उत्तर देऊ? माझी मुलगी ब्रा-पँटी विकते हे मी कसे सांगू? अनेक आजुबाजूचे लोक तिची चेष्टा करायचे पण रिचाने हिंमत हारली नाही. स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आज करोडोंची कंपनी चालवते.

घरच्यांचा विरोधाला सामोरं गेली

रिचा करचा जन्म 17 जुलै 1980 रोजी जमशेदपूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिनं BITS-पिलानीमधून पदवी प्राप्त केली. यानंतर ती बंगळुरूच्या एका कंपनीत काम करू लागली. यादरम्यान रिचाच्या मनात व्यवसायाची कल्पना आली.

तिच्या लक्षात आले की, महिलांना अंडरगारमेंट्स खरेदी करताना खूप लाज वाटते. रिचाने त्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. अंडरगारमेंट्सच्या व्यवसायाबद्दल तिनं आईला सांगितले. आईने ही कल्पना नाकारली. आई म्हणाली की, माझी मुलगी अंडरगारमेंट विकते हे मी कसे सांगणार? रिचाने आईला समजावून सांगितले आणि व्यवसाय करण्याचा मार्ग मोकळा झाला.

2011 मध्ये व्यवसाय सुरू केला

रिचा करने तिचे कुटुंब आणि मित्रांकडून 35 लाख रुपये गोळा केले. त्यानंतर 2011 मध्ये Zivame.com सुरू करण्यात आले. कंपनीसाठी ऑफिस शोधणे हेही मोठे काम होते. रिचा जिथे ऑफिसला जायची आणि तिच्या बिझनेसबद्दल सांगायची तिथे लोक तिला हसायचे. मात्र, या सर्वावर मात करुन रिचाने व्यवसायाची सुरुवात केली.

रिचाने तिची नोकरी व्यवसायासाठी सोडली. व्यवसायात सुरुवातीला काही विशेष घडले नाही. पण हळूहळू व्यवसायाला गती मिळू लागली आणि आज कंपनी करोडोंचा व्यवसाय करते. 3 वर्षात कंपनीकडे 200 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची टीम होती.

कोट्यावधीची मालकीण आहे रिचा

झिवामी कंपनीची एकूण संपत्ती 750 कोटी रुपये आहे. सध्या कंपनीच्या ऑनलाइन अंतर्वस्त्र स्टोअरमध्ये 5 हजारांहून अधिक अंतर्वस्त्र शैली उपलब्ध आहेत. स्टोअरमध्ये 50 ब्रँड आणि 100 प्रकार उपलब्ध आहेत. २०१४ मध्ये फॉर्च्यून इंडियाच्या ४० यादीत रिचाचा समावेश करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पारा घसरला; आजपासून थंडीचा जोर वाढणार

Rahul Gandhi : मोदींचा डोळा राज्याच्या संपत्तीवर...राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT