Virender Sehwag Tweet ESakal
Sakal Money

मोदींकडून अवास्तव कौतुक; सेहवागच्या कर्मचाऱ्याला लाखोंचा भूर्दंड, विरुच्या ट्विटनं खळबळ

Virender Sehwag Tweet: विरेंद्र सेहवागचे एक ट्विट व्हायरल होत आहे. यात त्याने त्याच्या कर्मचाऱ्याचे झालेले नुकसान सांगितले आहे. मात्र नंतर ते ट्विट डिलीट करण्यात आले आहे.

Vrushal Karmarkar

भारताचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग त्याच्या बेधडक वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याची हिच बोलंदाजी अनेकदा लोकांच्या पसंतीस पडली आहे. त्यामुळे सेहवागही सुसाट सुटलेला दिसला. पण, हिच सवय त्याला गोत्यात आणणारी ठरली असती, जर त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाला जोडून एक ट्विट मागे घेतलं नसतं.. त्याचं झालं असं पंतप्रधान मोदींनी ३ बँकाचं अवास्तव कौतुक केले होते.. ते ऐकून सेहवागच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने ८० लाखांचं शेअर्स खरेदी केले आणि त्याला नुकसान सहन करावे लागलं, असा दावा करणारे ट्विट वीरूने केले होते. त्यावरून तो ट्रोल झाला आणि चूक लक्षात येताच त्याने ते डिलीट केले.

विरेंद्र सेहवाग नेमकं काय म्हणाला?

विरेंद्र सेहवागच्या कर्मचाऱ्याने शेअर बाजारातून सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांचे सुमारे ८० लाखांचे शेअर्स खरेदी केले होते. जून महिन्यात नरेंद्र मोदींनी कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँकेची प्रशंसा केली होती. आणि त्यांच्या वाढीबद्दल बोलले होते. पीएम मोदींनी कौतुक केल्यानंतर सेहवागच्या कर्मचाऱ्यांनी या बँकाचे स्टॉक विकत घेण्यासाठी त्यांची वडिलोपार्जित जमीन विकली होती. कारण ते पंतप्रधानांचे मोठे चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. तसेच त्याने मोदींच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन शेअर्स विकत घेतले.

सेहवागच्या दाव्यानुसार, ३ महिन्यांनंतर शेअर्सचे मूल्य २० टक्क्यांनी घसरले. त्यामुळे सेहवागच्या कर्मचाऱ्याचे तब्बल १६ लाखांचे नुकसान झाले. त्यावर सेहवाग म्हणाला की, शेअर बाजारात निफ्टी १० टक्क्यांनी वाढला आहे. मात्र तिन्ही बँकाच्या शेअर्सचे भाव वाढत नाहीत. आपल्या कर्मचाऱ्याचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेतला. दरम्यान सेहवागने ही पोस्ट १९ सप्टेंबर रोजी केली होती. त्यानंतर त्याने ती पोस्ट डिलीट केली आहे. मात्र या पोस्टचे आता स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT