When will Finance Minister present the next budget GST Council to meet on June 22  
Sakal Money

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प कधी सादर करणार? समोर आली महत्वाची अपडेट

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. १३: केंद्रातील रालोआ-३ सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सादर केला जाण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाची जबाबदारी पुन्हा एकदा निर्मला सीतारामन यांच्याकडे आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून अर्थसंकल्प सादर केला जाईल.

‘रालोआ’ सरकारचा पुढील पाच वर्षांचा आर्थिक अजेंडा सीतारामन यांच्याकडून देशासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्प सादर होण्यास सव्वा महिन्याचा कालावधी बाकी असल्याने अर्थ मंत्रालयाकडून अर्थसंकल्पावर काम सुरु झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरवर नेणे तसेच २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. त्यादृष्टीने अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या जाऊ शकतात. रिझर्व्ह बॅंकेकडून अलीकडेच सरकारला २.११ लाख कोटी रुपयांचा लाभांश मिळाला होता. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक नवीन योजना हाती घेतल्या जाऊ शकतात.

२२ जून रोजी जीएसटी परिषदेची बैठक

दरम्यान, नव्या सरकारमधील पहिल्या जीएसटी परिषदेची बैठक २२ जून रोजी होत आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या या बैठकीचा अजेंडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. याआधीची जीएसटी परिषदेची बैठक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झाली होती. जीएसटी कराची वसुली दीड लाख कोटी रुपयांच्या पुढे स्थिरावली आहे. सरत्या मे महिन्यात १.७३ लाख कोटी रुपये इतकी कर वसुली झाली होती. अर्थव्यवस्थेचा विस्तार होत असल्याने आगामी काळात जीएसटी वसुलीतील वाढीचे प्रमाण दहा टक्क्यांच्या आसपास राहू शकते, असा अर्थ मंत्रालयाचा विश्वास आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT