Ratan Tata Sakal
Sakal Money

Ratan Tata Successor: रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण? 3800 कोटींच्या साम्राज्यासाठी 'या' प्रमुख नावांची जोरदार चर्चा

Amit Ujagare (अमित उजागरे)

Ratan Tata Successor latest news in Marathi : टाटा समुहाचे माजी चेअरमन तसंच देशातील एक प्रमुख उद्योजक रतन टाटा यांनी लग्न केलेलं नसल्यानं त्यांना अपत्यही नव्हतं. त्यामुळं आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या ३८०० कोटी रुपयांच्या संपत्तीचा वारसदार कोण असणार? याची चर्चा सुरु झाली आहे. रतन टाटांनी आपल्या परिवारातील आधीच्या सर्वच पूर्वजांच्या पावलावर पाऊल टाकत टाटा उद्योगाला सर्वोच्च स्थानी नेऊन त्याचा आदरही कायम ठेवला. त्यामुळं त्यांचा हाच आदर्श पुढे नेणारा व्यक्ती कोण असेल? याकडं सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

नोएल टाटा प्रमुख दावेदार?

रतन टाटांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या कुटुंबातील नोएल टाटा यांचं नाव प्रमुख दावेदार म्हणून पुढे येताना दिसतं आहे. नवल टाटा आणि त्यांची दुसरी पत्नी सिमोन यांच्या पोटी जन्मलेल्या नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. त्यामुळं रतन टाटा यांच्यानंतर मोठे असलेले नोएल टाटा हेच त्यांच्या संपत्तीचे वारसदार असू शकतात.

त्याचबरोबर नोएल टाटा यांची तीन मुलं आहेत. त्यामुळं जर रतन टाटा यांच्या संपत्तीचे वारसदार जर नोएल टाटा ठरले तर त्यांची मुलं पुढे हा वारसा चालवतील. या तीन मुलांमध्ये माया टाटा, नेविल टाटा आणि लिया टाटा यांचा समावेश आहे.

सध्या या तिघांवर काय आहे जबाबदारी?

  1. लिया टाटा - स्पेनच्या ई बिझनेस स्कूलमध्ये शिकलेल्या ३९ वर्षीय लिया टाटा या नोएल टाटांच्या सर्वात मोठ्या कन्या आहेत. टाटा समुहाच्या हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये त्या तज्ज्ञ आहेत. त्यांनी ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स अँड पॅलेसेस या टाटांच्या मालकीच्या उद्योगात महत्वाचं योगदान दिलं आहे.

  2. माया टाटा - बेयज बिझनेस स्कूल आणि युनिव्हर्सिटी ऑफ वॉरविक इथून शिक्षण घेतलेल्या ३४ वर्षीय माया टाटा या टाटा समुहात कार्यरत असून त्याचं कार्य प्रगतीपथावर आहे. टाटा समुहात त्या टाटा अपॉर्च्युनिटीज फंड आणि टाटा डिजिटलमध्ये काम करत आहेत. टाटा न्यू अॅप लॉन्च करण्यात त्यांचं महत्वाचं योगदान होतं.

  3. नेविल टाटा - टाटा समुहाचा ग्रोसरी ब्रँड असलेल्या स्टार बझारच्या प्रमुखपदाची जबाबदारी सध्या ३२ वर्षीय नेविल टाटा यांच्यावर आहे. टाटा समुहामध्ये ते देखील चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यांचं लग्न किर्लोस्कर कुटुंबातील मानसी किर्लोस्कर यांच्यासोबत झालं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata Passed Away: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी घेतला अखेरचा श्वास; भारतीय उद्योगाचा महामेरु हरपला

Ratan Tata: सुस्वागतम... मोदींच्या एका मेसेजनंतर रतन टाटांनी नॅनोचा कारखाना गुजरातला कसा नेला?

Ratan Tata Passed Away: टाटांच्या जाण्याने अदानी, अंबानी, महिंद्रा भावुक; भावनांना वाट मोकळी करुन देत वाहिली श्रद्धांजली

Ratan Tata: रतन टाटांची 5 मोठी कामे जी देशातील प्रत्येक नागरिकाला कायम स्मरणात राहतील

Ratan Tata life history : ब्रीच कँडी रुग्णालयातून जेआरडी परतले अन् रतन टाटांना बोलावून घेतलं; 'त्या' सोमवारी घडली ऐतिहासिक घटना

SCROLL FOR NEXT