akhil bhartiy marathi sahitya sammelan latur udgir 22 latest update  sakal
संपादकीय

हौस ऑफ बांबू : उदगीरच्या मोहिमेवर...!

साहित्य निर्मितीसाठी चिक्कार घाम गाळावा लागतो. अंगमेहनत करावी लागते आणि मोहिमा माराव्या लागतात. आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर!

कु. सरोज चंदनवाले

...तिथंच खुर्चीवर बसून भाषणावर भराभरा नजर टाकली, आणि आधी प्यायचे पाणी मागितले! पंखा आणि कूलर दोन्ही जोरात सोडायला सांगितले. भाषणात भर्तृहरीपासून रुमीपर्यंत अनेकांचे स्पष्ट दाखले दिले होते. ‘मराठीत अजूनही सआदत हसन मंटोसारखा लेखक निर्माण झालेला नाही’ हे त्यातलं स्पष्ट वाक्य वाचून अडखळले. देवा परमेश्वरा!

नमस्कार! साहित्यनिर्मिती हे बैठे काम आहे, अशी सर्वसाधारण समजूत आहे, पण माझ्या वाचकांनो, हा गैरसमज आधी मनातून काढून टाका. साहित्य निर्मितीसाठी चिक्कार घाम गाळावा लागतो. अंगमेहनत करावी लागते आणि मोहिमा माराव्या लागतात. आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर!

...उपरोक्त विचार उदगीर नजीक बिदर रोडवरल्या एका लॉजमधल्या बिन हाताच्या खुर्चीत बसून मला सुचत आहेत. उदगीर मोहिमेची मसलत तशी नाशकातच शिजली होती. काहीही करुन या ऐतिहासिक गावात यायचं आणि मराठी सारस्वतांच्या फौजेत घुसायचं, हा बेत मी आधीच ठरवला होता. तदनुसार पुण्याहून (पक्षी : कोथरुड) प्रस्थान ठेविले.

उदगीरमध्ये उन्हं भयंकर असून सोबत गमछा, छत्री आदी उन्हापासून संरक्षण करणारी आयुधं ठेवावीत, ऐसी सूचना प्राप्त झाली होती. तदनुसार मजल दरमजल करत आम्ही उदगीर येथे पोचलो. बस दोन तास उशीरा पोचली.

तेथे गेल्यावर आमची सोय बिदर रोडवरल्या एका लॉजमध्ये केल्याचं सांगण्यात आलं. हजारभर निमंत्रितांसाठी उदगीर, बिदर आणि लातूरची हाटेलं, लॉजिंग सध्या राखीव आहेत, असं सांगत होते. भराभरा आवरुन साहित्य संमेलनाचा भव्य मांडव गाठला. तिथे एक सरकारी अधिकारी करड्या आवाजात स्वयंसेवकांना सूचना देत होते. जम्बो कूलर आणलेत, पण त्यात पाणी आहे का? शंभर पंखे लावलेत, पण वीज आहे का? पाण्याच्या बाटल्या आहेत, पण त्यात पाणी आहे का? असे सारखे प्रश्न विचारुन ते वातावरण तापवत होते. आभाळात मळभ होतं, त्यामुळे उदगीरचा उकाडा म्हणतात, तो जाणवत नव्हता. तो या अधिकारी व्यक्तीमुळे जाणवू लागला.

‘‘मी यावेळी माझ्या भाषणात अगदी स्पष्ट बोलणार आहे हं! मी लेखक असल्यानं ती माझी जबाबदारीच आहे...,’’ सरकारी अधिकाऱ्यानं निर्वाणीच्या सुरात इशारा दिला. तेव्हा कुठे मला कळलं की हे तर आपले संमेलनाध्यक्ष भारत सासणेसाहेब! मराठी साहित्यक्षेत्राचे कार्यक्षम प्रांताधिकारी!! सासणेसाहेब यंदा प्रचंड स्पष्ट काहीतरी बोलणार आहेत, ही हाकाटी उठल्याने सगळेच मांडववाले चपापले होते. कौतिकराव ठाले-पाटील तर थेट कूलरच्या समोरच खुर्ची टाकून बसले. बऱ्याच दिग्गजांनी उदगीरला यायचंच टाळलं. त्यांच्या हातात फायलीसारखं धरलेलं एक चोपडं होतं. (सरकारी सवय ती! काहीही हातात आलं की फायलीसारखं बगलेत मारायचं. असो.) ते त्यांनी माझ्या हातात दिलं.

‘‘आमचं अध्यक्षीय भाषण आहे...वाचून बघा, काही कळतंय का,’’ ते म्हणाले.

...तिथंच खुर्चीवर बसून भाषणावर भराभरा नजर टाकली, आणि आधी प्यायचे पाणी मागितले! पंखा आणि कूलर दोन्ही जोरात सोडायला सांगितले. भाषणात भर्तृहरीपासून रुमीपर्यंत अनेकांचे स्पष्ट दाखले दिले होते. ‘मराठीत अजूनही सआदत हसन मंटोसारखा लेखक निर्माण झालेला नाही’ हे त्यातलं स्पष्ट वाक्य वाचून अडखळले. देवा परमेश्वरा!

संमेलनाध्यक्षांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आता घरोघरी नवलेखक मंटो व्हायला बसतील, आणि पुढल्या साहित्य संमेलनात मंटोंचे कळप दाखल होतील, असं दृश्य डोळ्यांसमोर चमकून गेलं. संमेलनात शिरकाव करण्याआधी आयोजकांनी आमच्याकडून आधीच एक फॉर्म लिहून घेतला होता. त्यात मधुमेह, रक्तदाब आहे का? लस घेतली का? दाखल होतेवेळी रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण, रक्तगट कुठला? हे सगळे रकाने भरुन घेण्यात आले होते. मी सगळे रकाने प्रामाणिकपणाने भरले. सहव्याधीच्या रकान्यात ‘फुटकळ लेखन’ असेही मी लिहून टाकले. लेखकाचा कसा, कायम सत्याशी संपर्क असला पाहिजे. हो की नै? बाकी उदगीर मोहिमेविषयी सविस्तर पुढल्या खेपेला!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT