कोरोनानंतरची अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना मास्क, सॅनिटायझर्स, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी उत्पादने याशिवाय आणखी एका प्रकारच्या उत्पादनांची बाजारपेठ प्रचंड वेगाने विस्तारते आहे, ती म्हणजे अस्पर्श उत्पादने (काँटॅक्टलेस प्रॉडक्ट्स). संसर्ग टाळण्यासाठी ही उत्पादने गरजेची असून, ती कशाप्रकारे काम करतात, याचा हा लेखाजोखा...
भारतात २४ मार्चला संपूर्ण लॉकडाउन चालू झाला आणि नवीन जीवनशैलीचा प्रारंभ झाला. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे सर्वजण अत्यावश्यक सेवा आणि भाजीपाला-किराणा हे अपवाद वगळता घरीच राहू लागले. व्यवहार ठप्प झाले. दररोज बाधितांच्या आणि त्यामुळे मृत्यू पावलेल्यांच्या बातम्यांनी सर्वसामान्यांना भयभीत केले. सप्टेंबर संपत आला तरी बाधितांचा आणि मृतांचा आकडा वाढतोच आहे. लोकांच्या मनात भय आणि अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. जुलैपासून अनलॉक सुरू झाले. अर्थव्यवस्था हळूहळू सावरत आहे. याच काळात अनेक नवीन व्यवसाय उदयास आले. मास्क, सॅनिटायझर्स, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी उत्पादने, याशिवाय आणखी एका प्रकारच्या उत्पादनांची बाजारपेठ प्रचंड वेगाने विस्तारते आहे, ती म्हणजे अस्पर्श उत्पादने (काँटॅक्टलेस प्रॉडक्ट्स).
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
काय आहेत अस्पर्श उत्पादने आणि त्यांची सुरवात कधीपासून झाली, याचा थोडा इतिहास पाहू. लहानपणी पौराणिक चित्रपट पाहताना देव किंवा ऋषी हाताच्या खुणेने इकडची वस्तू तिकडे करत. ही जादू पाहताना गंमत आणि आश्चर्य वाटायचे. नंतर ऐंशीच्या दशकात एकदा मित्राकडे रिमोट नावाच्या खेळण्याने सोफ्यावर बसून समोरच्या कोपऱ्यातील टीव्ही सुरू किंवा बंद करताना पाहिला आणि या पहिल्या (मी पाहिलेल्या) अस्पर्श उत्पादनाची ओळख झाली. पुढे नव्वदच्या दशकात नोकरीला लागल्यावर ‘क्लाउड’ म्हणजे प्रक्रिया आणि साठवण शक्तींचा एक आभासी कॉम्प्युटर असतो. तो माहितीचे विश्लेषण करून त्याचे सार किंवा तातडीच्या सूचना युजर इंटरफेसला पाठवतो. सध्याचा युजर इंटरफेस म्हणजे मोबाईल ॲप्स. या ॲप्सवरून आपण महत्त्वाच्या घडामोडी पाहू किंवा नियंत्रित करू शकतो. सेन्सर आणि ॲक्युएटरपासून मायक्रो कंट्रोल माहिती दळणवळणासाठी वायफाय, ब्ल्यूटूथ, आरएक, आरएकआयडी एनएफसी, बीकन्स या दळणवळणाच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मोबाईल ॲपद्वारे आपण अस्पर्श उत्पादने कोठूनही नियंत्रित करू शकतो.आता आपण वेगवेगळ्या क्षेत्रामधील विविध अस्पर्श उत्पादने पाहू.
अल्ट्रासॉनिक फ्लो ॲक्युएटर्स
हे कोणताही द्रव पदार्थाचा प्रवाह सुरू वा बंद करण्यासाठी वापरतात. जसे पाणी, सॅनिटायझर यामधून अल्ट्रासॉनिक सिग्नल सोडले जातात, ते एखाद्या अडथळ्यावर आपटून परत येतात, तेव्हा त्यांच्या पोचण्याच्या वेळेवरून नेमके अंतर काढता येते. आपण हात द्रव्याच्या तोटीखाली धरल्यावर हे अंतर कमी भरून मायक्रो कंट्रोलद्वारे व्हॉल्व्ह उघडून प्रवाह सुरू होतो. हात काढताच अल्ट्रासॉनिक सिग्नलचा एको येण्यास वेळ लागतो आणि व्हॉल्व्ह बंद होतो.
पेशंट मॉनिटरिंग
सध्या वेगवेगळ्या प्रकारचे बायोसेट उपलब्ध आहेत. उदा ः हार्टरेट, तापमान, ईसीजी, रक्तदाब अशा प्रकारचे सेन्सर एका बॅंडमध्ये बसवून पेशंट नेहमी ते परिधान करू शकतो. हे सेन्सर पेशंटचे वेगवेगळे वैद्यकीय गुणधर्म ब्ल्यूटूथद्वारे घरातील कॉम्प्युटर किंवा मोबाइल ॲपला पाठवतो. ती कॉम्प्युटर किंवा मोबाइल इंटरनेटद्वारे क्लाऊड सर्व्हरला पाठवतो. तिथे त्याचे विश्लेषण होऊन उपयुक्त माहिती व अलर्टस डॉक्टरला पाठवले जातात. त्यावरून डॉक्टर फोन करून औषधामध्ये बदल किंवा डोस कमी जास्त करायचे सांगू शकतात. त्यामुळे हॉस्पिटलायझेशनच्या खर्चात बचत होते.
अटेंडन्स सिस्टिम
आरएफआयडी टॅग वापरून अटेंडन्स नोंदण्यासाठी ही सिस्टिम बऱ्याच वर्षापासून विविध कार्यालये, कॉलेजमध्ये वापरली जाते. हा आरएफआयडी टॅग फोटो ओळखपत्राला लावलेला असतो. व्यक्ती ओळखपत्र आरएफआयडी स्कॅनरजवळ नेते, तेव्हा आरएफआयडी स्कॅनर १ आरएफआयडी सिग्नल पाठवतो. ओळखपत्रातील टॅग तो सिग्नल बदलून परत पाठवतो. स्कॅनर हा सिग्नल गोळा करून कोणी बदलला आहे, ते ठरवतो व त्यावरून कोणत्या व्यक्तीने व किती वाजता स्कॅन केले, ते ठरवतो. अशा तऱ्हेने प्रत्येकाचा कार्यालयात घालवलेला वेळ नोंदवता येतो. असे आरएफआयडी टॅग कोणत्याही पार्सल किंवा वस्तूला लावून त्याच्या दळणवळणादरम्यान ट्रॅक केला जातो व वेअरहाउसमध्ये योग्य प्रकारे ठेवला जातो.
डिजिटल पेमेंट
नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढले. मोबाईल फोनवरून क्यूआर कोड स्कॅन करून दुकानदार, विक्रेते आणि इतर कुठेही अगदी सहजपणे पैसे देता येतात. सध्या त्यासाठी पेटीएम, भीम, गुगल पे, फोन पे अशी अनेक ॲप्स आहेत. ती ग्राहकाच्या आणि विक्रेत्याच्या बॅंक अकाउंटला जोडलेली असतात. यामुळे कोणालाही त्वरित पैसे देणे सोपं झालंय.
स्मार्ट स्विचेस
याद्वारे आपण घर, कार्यालय, कारखान्यातील विद्युत उपकरणे चालू वा बंद करू शकतो. यासाठी आयओटी किंवा ऑटोमेशन तंत्रज्ञान वापरतात. सूचना पाठवण्यासाठी वायफाय किंवा ब्ल्यूटूथ वापरतात. तसेच बऱ्याच वेळा व्हॉइस, जसे ॲलेक्साचादेखील वापर करून तोंडी सूचनेद्वारे उपकरणे चालू-बंद करू शकतो.
सोशल डिस्टन्सिंग डिव्हाइस
कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग हा परवलीचा शब्द बनला आहे. या उपकरणाचा उपयोग सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते की नाही, हे पाहण्यासाठी होतो. विविध ठिकाणी त्याचा उपयोग होतो. ते कॉम्प्युटर व्हिजन तंत्राद्वारे दोन माणसांमधील अंतर मोजते. ते दोन मीटरपेक्षा कमी झाल्यावर लगेच बझर वाजवून अंतर वाढवण्याची सूचना देते. ते कार्यालये, कारखाने, मॉल इ. ठिकाणी वापरले जाते.
टेंपरेचर गन
हे उत्पादन काही महिन्यांपासून अतिशय प्रसिद्ध झाले. ते सोसायट्या, कॉलेज, हॉस्पिटल, ऑफिसेस यांच्या प्रवेशद्वारावर रखवालदारांकडून वापरले जाताना दिसते. प्रत्येक व्यक्तीचे तापमान त्याला स्पर्श न करता पाहता येते. त्यामुळे एखाद्यास कोविडचे लक्षण, म्हणजेच ९९पेक्षा अधिक तापमान असल्यास लगेच कळते. या गनमध्ये वातावरणातील इन्फ्रारेड किरण त्या व्यक्तीच्या हातावर आदळून लेन्सद्वारे गनमध्ये जमा होतात. व्यक्तीच्या तापमानानुसार त्याची औष्णिक ऊर्जा मोजली जाते, त्यावरून तिचे तापमान कळू शकते.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.