कलाकारांच्या कथा आणि व्यथा  sakal
संपादकीय

कलाकारांच्या कथा आणि व्यथा

सकाळ वृत्तसेवा

गुणवत्तावान, स्वाभिमानी, समर्पित कलाकारांची समाजात उपेक्षा होत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. त्यातच अशा कलाकारांसाठी सरकारने केलेली निवृत्तिवेतन योजना अवास्तववादी अटी-शर्तींनी असून अडचण, नसून खोळंबा अशी आहे. त्यामुळे सरकार आणि समाज अशा दोघांनी पुढाकार घेऊन कलाकारांना मदतीचा हात द्यावा.

यादवराव फड

कलाकार जन्माला यावा लागतो, असे म्हणतात. कारण प्रयत्नाने आणि प्रतिभेने कलाकार होतो, पण प्रासादिकता लाभल्याशिवाय सिद्धीप्राप्त कलाकार निर्माण होत नाही. असे हे कलाक्षेत्र कष्ट साध्य आणि बेभरवश्‍याचे आहे. पूर्वी तर गुरूगृही राहून, पडेल ते काम करून, गुरूसेवेने विद्यार्जन करावे लागे. आता सेवेची जागा गुरूदक्षिणेने घेतली आहे. गुरूकुल पद्धत एखाद-दुसरा अपवाद वगळता जवळपास संपल्यात जमा आहे.

आमची पिढी सोडून पुढील पिढीत पूर्ण वेळ कलेला वाहून घेतलेले कलाकार दुरापास्त होतील. त्यामुळे पूर्ण वेळ कलेला वाहून घेतलेल्या आणि पार्श्वभूमी नसलेल्या कलाकारांचा प्राधान्याने विचार व्हायला पाहिजे. मग लोककलाकार असोत अथवा संगीत क्षेत्रातील कलाकार असोत. यात गायक, वादक, नर्तक अशा सर्वांचा समावेश पाहिजे. आज होणारी मोठमोठी संगीत संमेलने, मग ती सरकारी असोत किंवा खासगी, इतर संगीत सभा यातून तेच ते कलाकार दिसतात. असे न होता गुणवत्तेवर संधी दिली गेली पाहिजे, मात्र तसे होत नाही. कला क्षेत्रातील प्रस्थापितांच्या गोटात तडजोडीशिवाय स्थान मिळत नाही, दुसरीकडे राजकीय नेते मंडळी दिलेली आश्वासने पाळत नाहीत. ज्येष्ठ कलाकारांना सरकारची चाळीस हजार रूपये वार्षिक उत्पन्नाची अट निवृत्तीवेतन मिळूच देत नाही. अशा परिस्थितीत कलेला पूर्णवेळ वाहून घेतलेला कलाकार वर्ग उपेक्षित राहतो.

गुणवत्तावानांवर अन्याय

कोणत्याही समाजात कलाकारांची उपेक्षा परवडणारी नसते, अशा घटनांना काळ देखील माफ करत नाही. आपली प्राचीन भारतीय संगीत परंपरा अत्यंत पवित्र आहे, तिचे पावित्र्य जपले पाहिजे. किंबहुना हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या परंपरेने सामाजिक ऐक्य टिकवण्यात देखील मोठा हातभार लावला आहे. कलाकार आणि नकलाकार यातील फरक ओळखून फक्त गुणवत्तावान कलाकारांचीच सरकारची शिष्यवृत्ती, अनुदान, तसेच विविध प्रकारची मंडळे, संस्था यावर निवड, नियुक्ती व्हावी. मात्र, आज पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या मंडळांवर, संस्थांवर केवळ वारसाहक्काने, त्यांच्यातील गुणावतेचा विचार न करता, निवड, नियुक्ती केली जाते.

अशावेळी गुणवत्तावान व्यक्तींवर अन्याय होतो. स्वाभिमानी, सदाचारी, तत्त्वनिष्ठ कलाकार अशा स्पर्धेमध्ये मागे पडतात. ही बाब कलेच्या प्रांताला मागे नेणारी आहे. यामुळे अनेक कलाकारांचे मोठे नुकसान झाले आहे, होत आहे. खरे म्हणजे मंडळ, संस्था आणि ट्रस्ट इत्यादींचे पदाधिकारी हे विश्वस्त असतात. त्यांनी नियमानुसार व्यवस्था पाहणे, योग्य निर्णय घेणे अपेक्षित असते. सत्ता माणसाला बिघडवते. काही अपवाद वगळता सध्या सर्वत्र विश्वस्तांचा मालकी हक्काने मनमानी कारभार दिसतो. आपल्या मर्जीतील कलाकारांचीच वर्णी लावतात, त्यामुळे तेव्हा व्यापक विचारांचे, गट-तटात न अडकणारे आणि गुणवत्ता ओळखून संधी देणारे नेतृत्त्व पाहिजे. काही कलाकार आपले भले आणि आपल्या शिष्यांचे भले एवढेच पाहतात. त्याऐवजी सर्वांना संधी कशी देता येईल, ते पाहणे कलाक्षेत्रासाठी हिताचे आहे. नोकरी करून कलेच्या क्षेत्रात असलेले आणि पूर्ण वेळ कला क्षेत्रात असलेले कलाकार, यांना कलाक्षेत्र आणि समाज सारखेच पाहतो. वास्तविकपणे कलेला पूर्ण वेळ वाहून घेतलेल्यांना प्राधान्य दिले पाहिजे.

भारतीय संगीताला मोठी परंपरा आहे. मानवी जीवनात शांतता, सभ्यता आणि समानता संगीतच निर्माण करू शकते. अशा या श्रेष्ठ परंपरेत महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे; म्हणूनच महाराष्ट्रात आणि त्यातही पुण्यात आपल्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी बाहेर प्रांतातील कलाकार उत्सुक असतात. हे पुणे शहराचे महात्म्य आजही कायम आहे, ते तसेच टिकवणे कलाक्षेत्राचे, जाणकारांचे आणि समाजाचे कर्तव्य आहे.

मात्र परंपरेतील गटबाजी, राजकारण आणि घराणेशाही यांच्या कात्रीत अडकलेल्या सध्याच्या परिस्थितीत बदल झाल्याशिवाय हे असंभव दिसते. त्यातच कलाकारांना संधी मिळवून देण्यासाठी एक वर्ग तत्पर असतो, तो कलाकार आणि आयोजक यांच्यात दुवा साधतो आणि दोन्हीकडून आपला खिसा भरतो. तेव्हा अशा गोष्टींना दूर ठेवून, गुणवत्तेला संधी, वाहून घेतलेल्या कलाकारांसाठी विनाअट निवृत्तीवेतन आणि लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने पूर्ण करणे अशा सुधारणा झाल्या तर कलाकारांना सहाय्यभूत ठरतील.

(लेखक लोककलाकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT