संपादकीय

भाजपचे सूत्र : ध्यास, श्वास आणि विश्वास

सकाळ वृत्तसेवा

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन आज (ता. २१) पुण्यात बालेवाडीत होत आहे. त्यानिमित्त पक्षाची विचारसरणी, वाटचाल आणि भूमिका याविषयी महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी मांडलेले मनोगत.

भा रतीय जनता पक्ष म्हणजे खंडप्राय भारताचा समकालीन राजकीय आविष्कार आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे एक सुप्रसिद्ध विधान सांगतो. पंडितजी म्हणायचेः विविधतेत एकता किंवा एकतेचे विविध रुपांमधील प्रकट होणे हा भारतीय संस्कृतीच्या केंद्रस्थानी असलेला विचार आहे. जनसंघ ते जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनलेला भारतीय जनता पक्ष या साऱ्या प्रवासात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा हा विचार आमची विचारधारा बनली.

भाजप सर्वसामान्यांचा पक्ष आहे, म्हणजे काय? तर देशाच्या वेगवेगळ्या भागांतील वेगवेगळ्या समाजधारणा घेऊन आलेल्या लोकांनी एकत्रितपणे विणलेला, बांधलेला आणि भक्कम केलेला हा पक्ष आहे. आमच्या विविधतेत एकता आहे आणि आमच्या एकतेचे रुप काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि ईशान्येपासून गुजरातपर्यंत विविध रुपांमध्ये प्रकट होते आहे. सर्वसामान्य भारतीयांमध्ये जी विविधता आहे ती भाजपमध्ये आहे. भारत म्हणून जी एकता आहे, अखंडता आहे ती भाजपमध्ये आहे. म्हणूनच भाजप हा संपूर्ण भारताचा राजकीय आविष्कार आहे, असे मला वाटते.

एकजुटीची, अखंडतेची भावना

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन आज (ता. २१) पुण्यात बालेवाडीत होत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते अधिवेशनात सहभागी होत आहेत. या साऱ्यांसमोर एकच लक्ष्य आहे. एकच उद्देश आहे आणि तो म्हणजे भाजपच्या एकता, अखंडता आणि विविधतेत साऱ्या राज्याला सामावून घेणे. हे सारे कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या धारणा घेऊन आले आहेत. त्यामध्ये विविधता आहे. मात्र, साऱ्यांमध्ये एकता आहे ती राष्ट्राप्रति, आपल्या पक्षाप्रति. भाजप या तीन अक्षरांभोवती त्यांची एकता सामावली आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दीर्घकाळ वावरल्यानंतर मी खात्रीने सांगू शकतो, ही या प्रकारची एकजुटीची, अखंडतेची भावना जगाच्या इतिहासात दुसरीकडे कुठे सापडणार नाही. परस्परांविषयी बांधिलकी, आपुलकी आणि साऱ्यांनी मिळून एकत्रितपणे राष्ट्राच्या कल्याणाचा विचार करण्याची अशी परंपरा भाजपशिवाय अन्यत्र कुठे आढळणार नाही. या एकतेत ताकद आहे. ही ताकद नवी आव्हाने लीलया पेलण्याचे सामर्थ्य कार्यकर्त्यांना देते, भाजपला देते.

भाजपचा संघर्ष कशासाठी?

लोकसभा निवडणुकीचे आव्हान नुकतेच भाजपने याच ताकदीवर पेलले. देशाच्या इतिहासात नरेंद्र मोदी यांचे नाव सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून कोरले गेले. राजकारणात कोणताच दिवस सोपा नसतो. कोणतीच निवडणूक विनासायास नसते. त्यातही, जेव्हा भारतीय संस्कृतीशी घट्ट बांधलेला भाजप राजकारण करू पाहतो, तेव्हा त्याला विरोध होणार हे स्वाभाविकच असते. हा विरोध आम्ही कसा पाहतो? मला सांगायला अभिमान वाटतो, की भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता, नेता संघर्षातून तयार झाला आहे. त्यामुळे, भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्त्याही संघर्षातून मागे हटत नाही. संघर्ष कशासाठी याची त्याला पूर्ण जाणीव आहे. भाजपचा संघर्ष राष्ट्रहितासाठी, देशविकासासाठी आहे. देशातील प्रत्येक राज्याच्या विकासासाठी आहे. राज्यातील प्रत्येक गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. अंतिमतः प्रत्येक भारतीयांच्या, प्रत्येक मराठीजनाच्या प्रगतीसाठी हा संघर्ष आहे.

मतदारांचा भाजपला वाढता पाठिंबा

भाजप संघर्ष करतो आणि देश विकासाच्या वाटेवर एक पाऊल पुढे टाकतो. महाराष्ट्राचा मतदार या संघर्षाचा सतत सन्मान करतो आहे. भाजपच्या पारड्यात दर निवडणुकीत अधिक मतांची भर टाकतो आहे. १९९०च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे महाराष्ट्रात ४२ आमदार निवडून आले, तेव्हा त्यांना मतदारसंघातील २९.९६ टक्के मिळाली होती. भाजपचा कार्यकर्ता, नेता संघर्ष करत राहिला. १९९५ मध्ये आमचे आमदार ६२ झाले आणि लढविलेल्या प्रत्येक जागेवरील ३२.१६ टक्के भाजपला मिळाली. १९९९ मध्ये आमच्या मतांची टक्केवारी ३५.४२ टक्के झाली. अगदी अलीकडच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमचे १०५ आमदार निवडून आले, तेव्हा भाजपच्या पाठीशी त्या त्या मतदारसंघातील ४४.५१ टक्के मतदार उभा होता. अनेकांना प्रश्न पडतो, की भाजपच्या मतदारांची टक्केवारी वाढते आहे, म्हणजे काय आहे. तेव्हा हे आकडे वाढत्या पाठिंब्याचा पुरावा आहेत. भाजप प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी आपला पाठिंबा वाढवतो आहे. महायुतीमधील प्रत्येक पक्षाच्या पाठीशी भाजपचा मतदार निःसंदिग्धपणे उभा राहतो आहे.

महाराष्ट्र भारताच्या विकासाचे इंजिन

यंदाच्या भाजपच्या अधिवेशनाचे सूत्र आहे ध्यास, श्वास आणि विश्वास. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या प्रत्येक भाजप कार्यकर्त्याचेही हेच सूत्र आहे. आम्हाला ध्यास आहे, महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर नेण्याचा. आमच्या पक्षाचा झेंडा अभिमानाने उंचावण्याचा आम्हाला ध्यास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेल्या विकसित भारताच्या मार्गावर महाराष्ट्राला नेण्याचा आम्हाला ध्यास आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस, मग तो कष्टकरी, शेतकरी आहे, आमच्या माता-भगिनी आहेत, उद्याचा महाराष्ट्र घडवणारे तरुण-तरुणी आणि आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ आमचा श्वास आहेत. भाजपचा कार्यकर्ता हा पक्षाचा श्वास आहे आणि भाजपच्या विजयासाठी कार्यकर्त्याचा प्रत्येक श्वास आहे. आमचा आमच्या संघर्षशीलतेवर विश्वास आहे. आमचा आमच्या पक्षाच्या विचारधारेवर, नेतृत्वावर, मार्गदर्शकांवर ठाम विश्वास आहे. आम्हाला विश्वास आहे, की आमचा महाराष्ट्र भारताच्या विकासाचे इंजिन आहे आणि हे इंजिन भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सक्षमपणे सांभाळणार आहे, यावर महाराष्ट्राचा विश्वास आहे. त्यामुळेच, आम्हाला विजयाचा विश्वास आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT