‘अपेक्षा’च्या जिद्दीपुढे आकाशही ठेंगणे! sakal
संपादकीय

‘अपेक्षा’च्या जिद्दीपुढे आकाशही ठेंगणे!

आपण शिकावे, शिकून मोठे व्हावे, लौकिक कमवावा, असे प्रत्येक मुला- मुलीला वाटते. मात्र अगदी दुसरीपासूनच पायांचा प्रवास पूर्णपणे ठप्प झालेल्या दुर्गम भागातील एका जिद्दी मुलीने शिकण्याच्या वाटांचा शोध कायम ठेवला.

सकाळ वृत्तसेवा

आपण शिकावे, शिकून मोठे व्हावे, लौकिक कमवावा, असे प्रत्येक मुला- मुलीला वाटते. मात्र अगदी दुसरीपासूनच पायांचा प्रवास पूर्णपणे ठप्प झालेल्या दुर्गम भागातील एका जिद्दी मुलीने शिकण्याच्या वाटांचा शोध कायम ठेवला. त्यातून नुकतीच ती बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यात तिच्या कुटुंबीयांच्या, शिक्षकांच्या सोबतीचा आधारही तितकाच महत्त्वपूर्ण ठरला. बालपणी आलेले अपंगत्व हे तिच्या शिक्षणात अडसर ठरले नाही. एकापरीने तिच्या जिद्दीपुढे आकाशही ठेंगणे वाटू लागले.

- सुनील शेडगे, सातारा

अपेक्षा जाधव ही तिचे नाव. खरे तर तिच्या नावातच खूपकाही आहे. आपल्या मुलीने शिकावे, अशी तिच्या वडिलांची अपेक्षा होती. मात्र तिच्या शिकण्यात पावलोपावली अडचणी येत राहिल्या. त्यातूनही शिकत तिने वडिलांची अपेक्षा अक्षरशः सार्थ ठरविली. पाटण तालुक्यातील डांगिष्टेवाडीसारख्या छोट्याशा वाडीतील. तिचे वडील विष्णू जाधव हे रंगकाम करतात. अपेक्षा जाधव ही इयत्ता पहिलीत दाखल झाली, तेव्हा अन्य मुलांप्रमाणेच होती. मात्र दुसरीत गेल्यावर तिच्या दोन्ही पायांत दोष असल्याचे स्पष्ट झाले. इयत्ता सहावीपासून तर तिचे चालणे पूर्णपणे थांबले. दरम्यानच्या काळात ‘सर्व शिक्षा अभियाना’तील समावेशित शिक्षणांतर्गत ‘ॲल्मिको मोजमाप कॅम्प’ मधून तिला दोन्ही पायाचे कॅलिपर मिळाले. त्या कॅलिपरचा वापर ती घरी अन् शाळेत करू लागली. पुढे क-हाडमधील ॲल्मिको कॅम्पमधून तिला मोडिफाय चेअर अन् व्हीलचेअर पुरविण्यात आले.

दहावीत असताना तर मानेपासून शरीराच्या खालच्या भागात पूर्णपणे ताठरता आली. त्यामुळे हाताच्या मुठीत पेन धरुन तिने प्रश्नपत्रिकांचा सराव केला. बारावीत लेखनिक अन् वेळ वाढवून देण्याविषयी विचारणा झाली. मात्र जिद्दी अपेक्षाने या दोन्ही सवलती घेण्यास नकार देत विज्ञान शाखेतून बारावीच्या परीक्षेत यश पटकाविले. या प्रवासात तिचे कुटुंबीय, प्राथमिक अन् माध्यमिक शाळांतील शिक्षक, तारळे येथील डे केअर सेंटर, पुण्यातील मुकूल माधव फाउंडेशन,डॉ. मंदार माळवदे, डॉ.नम्रता कदम यांच्या टीमने अपेक्षाची खूप काळजी घेतली. ‘अक्षयपात्र ट्रस्ट’चे दीपक मगर यांचीही मोलाची मदत लाभली. समावेशित शिक्षणाच्या विशेष शिक्षिका गायत्री शेळके आदींचे मार्गदर्शन लाभले.

शिक्षणाच्या वाटा चोहोबाजूंनी बंद होत असताना अपेक्षा जाधवने आपण शिकू शकतो, हे सिद्ध करून दाखविले. तिची चिकाटी, तिचे परिश्रम अन् महत्त्वाचे म्हणजे तिचा स्वतःच्या क्षमतेवर असणारा विश्वास, हा प्रेरणादायी ठरणारा आहे.

- गायत्री शेळके,

विशेष शिक्षिका, समावेशित शिक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Voting: पिपाणीने पुन्हा केला तुतारीचा गेम! वळसे पाटील थोडक्यात वाचले; पवारांच्या ९ बड्या नेत्यांना कसा बसला फटका?

Latest Maharashtra News Updates : सत्तास्थापनेनंतर पहिलाच निर्णय 'लाडकी बहिणीं'चे पैसे वाढवणार?

IND vs AUS 1st Test: टीम इंडियाचा विजय अन् पाकिस्तानला धक्का; Jasprit Bumrah ने मोडला कपिल देव यांचा विक्रम, ७ मोठे पराक्रम

Eknath Shinde: शिवसेनेच्या प्रकाश सुर्वेंची मागाठाणेत हॅट्‌ट्रिक, जाणून घ्या विजयाची इनसाइड स्टोरी

Sangli Election Results : पालकमंत्र्याची माळ कोणाच्या गळ्यात? खाडे, गाडगीळ, पडळकर, बाबर यापैकी एकाला मिळणार संधी

SCROLL FOR NEXT