congress party 138th foundation day history of congress political view of work Sakal
संपादकीय

Congress : काँग्रेस नावाचा इतिहास

कॉँग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने इतिहासावर एक दृष्टिक्षेप.

सकाळ वृत्तसेवा

- उल्हास पवार

स्वातंत्र्यचळवळीचा अविभाज्य भाग असलेली, जगातील राजकीय-सामाजिक प्रवाहांशी जोडलेली, आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यातही सहभागी असणारी कॉंग्रेस ही वैशिष्ट्यपूर्ण संघटना आहे. कॉँग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने इतिहासावर एक दृष्टिक्षेप.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आज १३८ वा स्थापनादिन. जगातील राजकीय प्रवाहांशी जोडलेली, स्वातंत्र्यचळवळीचा अविभाज्य भाग असलेली आणि सामाजिक परिवर्तनाशी नाळ जोडलेली अशी ही संघटना.

स्वातंत्र्यलढ्यात अपार त्याग सोसलेल्या या पक्षाला अलीकडच्या काळात बदनामीला तोंड द्यावे लागत आहे. ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षाच्या प्रसंगी काही इतर संघटना-नेते ब्रिटिशांना साथ देत होते. त्यावेळी मातृभूमीशी गद्दारी करणारे आज काँग्रेसवर टीका करत आहेत.

या पक्षाचे नाव अतिशय अर्थपूर्ण आहे. त्यातील प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. इंडियन - भारतीय, नॅशनल- राष्ट्रीय आणि कॉँग्रेस- संघटना. खरे तर कॉंग्रेसची स्थापना पुण्याला होणार होती. त्यावेळच्या प्लेगच्या साथीमुळे मुंबईत ती झाली.

सर तेजबहादूर सप्रू सभागृहात स्थापनेचा कार्यक्रम झाला. रेल्वेने पुण्याला आलेल्या सर्व नेत्यांना स्टेशनवरूनच मुंबईला जावे लागले. सर ॲलन ह्यूम हे कॉँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. संघटनेकडून सुरवातीला चर्चा-संवाद आणि सरकारला केलेले अर्ज व निवेदने असे कामाचे स्वरूप होते.

पुढच्या काळात या कामाला आणखी गती मिळाली. त्याला चळवळीचे स्वरूप आले आणि ती चळवळ देशव्यापी आणि प्रखर होत गेली. ती अविरत चालू होती. या चळवळीमुळे स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी काँग्रेसचे नाव अभिन्नपणे जोडले गेले.

अलीकच्या काळात हा इतिहास विपर्यस्त स्वरूपात मांडण्याचा, या संघटनेतील नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. पण अशा प्रयत्नांना यश येणार नाही, याचे कारण जे लोक हे प्रकार करीत आहेत, त्यांचे त्याकाळातील वर्तन तपासले तर ते उघडे पडतात.

त्यांचे ब्रिटिशधार्जिणेपण आणि द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार या गोष्टी सर्वज्ञात आहेत. देशाच्या विघटनाला खतपाणी घालणारे हे लोक, पक्ष कोणते, संघटना कोणत्या हे सर्व सूज्ञ जनतेने ओळखले आहे.

विविध धर्मांच्या, पंथांच्या, भाषांच्या व विविध प्रांतांतील नेत्यांनी गेल्या शतकात काँग्रेसचे नेतृत्व केले. भारताचे ऐक्य, अखंडत्व, सार्वभौमत्व, लोकशाही, समता, नैतिकता या मूलभूत पायावरच संघटना मजबूत झाली.

दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांच्या शोषक व साम्राज्यवादी धोरणांवर प्रखर टीका केली. असहकार, परदेशी मालाची होळी, प्रसारमाध्यमांतून जागृती अशा विविध माध्यमांतून चळवळ आकार घेत होती.

‘केसरी-मराठा’ या वृत्तपत्रांतून सरकारच्या धोरणांचे वाभाडे काढले जात होते. अशाच जहाल लेखांबद्दल राजद्रोहाचा खटला होऊन लोकमान्य टिळकांना मंडालेत तुरुंगवास सहन करावा लागला. या अटकेने सर्व देश पेटून उठला.

लाखो लोक रस्त्यावर उतरले. त्या काळात ‘लाल-बाल-पाल’ ही त्रिमूर्ती सर्वतोमुखी झाली. त्या सुमारास महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेमध्ये ब्रिटिशांच्या वर्णभेदाच्याविरुद्ध लढा देत होते. पुढच्या काळात दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यानंतर अध्यक्षपदाची शपथ घेताना लढाऊ नेते नेल्सन मंडेला कृतज्ञतेने म्हणाले, ‘‘महात्मा गांधी होते म्हणूनच या पदावर आज मी विराजमान होत आहे.’’

१९१५मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले. त्याच वेळी पुण्यात लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, न्या. रानडे (सामाजिक परिषद) सक्रिय होते. त्यांच्याशी विचारविनिमय करून गांधीजींनी आंदोलनाची, संघर्षाची दिशा ठरवली.

टिळक जहाल, तर गोपाळ कृष्ण गोखले मवाळ. गांधींना दोघांबद्दल आदर; पण त्यांनी गोखले यांना गुरूस्थानी मानले. तरीही लोकमान्य टिळकांनी, ‘‘माझे राहिलेले कार्य महात्मा गांधी पुढे चालवतील’’, असे उद्‍गार काढले होते.

मतमतांतरे असूनही सामंजस्य, परस्परांबद्दल आदर ही त्यावेळच्या नेत्यांची वैशिष्ट्ये आजही अनुकरणीय आहेत. १९१६मध्ये जो ‘लखनौ करार’ झाला, त्याविषयी गांधींचा आक्षेप होता. पण धोरणात्मक मतभेद झाले म्हणून एकमेकांविषयी आदर कमी झाला, असे होत नसे.

आजच्या काळात हे विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवे. स्वातंत्र्य दृष्टिपथात आले आणि राज्यघटनेची निर्मिती करायची होती. घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिले जावे, असे महात्मा गांधींनी सुचवले होते.

डॉ. आंबेडकरांचे काही बाबतीत कॉँग्रेसशी मतभेद असूनही गांधीजींनी ही सूचना केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही कठोर परिश्रम घेऊन, सखोल अभ्यास करून उत्तम अशी राज्यघटना तयार केली.

सर्वसमावेशक लढा हे गांधींजींचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच त्यांच्या फार मोठ्या अनुयायीवर्गात सर्व वर्ग, जाती-धर्माचे लोक होते. मौलाना आझाद, रफी अहमद किडवाई, खान अब्दुल गफार खान ( सरहद्द गांधी) असे अशा अनेक मुस्लिम नेत्यांचा त्यात समावेश होता. पुढे अनेक लढे झाले.

१९३०चा मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, नऊ ऑगस्ट १९४२ ला मुंबईच्या ऐतिहासिक गवालिया टँक मैदानात झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनातील ‘चलेजाव’चा ठराव हा सगळाच स्फूर्तिदायक इतिहास आहे.

‘करा वा मरा’ या गांधींच्या दोन शब्दांनी देशभक्तीची एक लहर वेगाने पसरली. लाखोंना अटक झाली. तुरुंग अपुरे पडले. अनेक नेते भूमिगत झाले. अनेक क्रांतिकारकांनीही स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, याची कृतज्ञतापूर्वक नोंद घेतली पाहिजे.

त्यांचे ब्रिटिशांना विरोध करण्याचे मार्ग वेगळे होते. तरीदेखील भारतीय स्वातंत्र्यलढा हा प्रामुख्याने अहिंसेच्या मार्गाने झाला, हे मान्य करावे लागेल. जगाने स्वातंत्र्यलढ्याच्या या वेगळेपणाची दखल घेतली आहे, असे आपल्याला दिसते.

४२च्या आंदोलनातील नेत्यांना अहमदनगर जिल्ह्यामधील किल्ल्यात कैद करून ठेवले गेले. पंडित जवाहरलाल नेहरूही त्यात होते. त्यांचे ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक त्यांनी देशाचा किती उत्कटतेने शोध घेतला होता, हे दाखवून देणारे आहे. शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या क्रांतिकारकांची फाशी टळावी म्हणून तुरुंगात त्यांची भेट घेऊन ‘मी तुमची वकिली करतो’, असे म्हणणारे पंडित नेहरूच होते.

बेचाळीसच्या चळवळीच्या काळात व्हाइसरॉयला पत्र लिहून ज्यांनी त्यांच्या सरकारला सहकार्याचे आश्वासन दिले. त्यांचेच वारस आज कॉंग्रेसला, गांधी-नेहरूंना बदनाम करत आहेत, हे दुर्दैव आहे. खरे तर काँग्रेसचा इतिहास खूप व्यापक आहे. तरीही ठळक घटनांवर एक नजर टाकली तरी या पक्षाचे, संघटनेचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येते.

सरदार पटेलांचा बार्डोलीचा लढा, आयुष्यभर स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक परिवर्तनाचा आग्रह धरणाऱ्या गांधीजींच्या चळवळी, अस्पृश्यता निवारणाविषयी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मांडलेला अधिवेशनातील ठराव अशा कितीतरी घटनांचा उल्लेख करता येईल.

विकासाची पायाभरणी

पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही कॉँग्रेसची कामगिरी उज्ज्वल राहिली. पंडित नेहरूंनी पंतप्रधानपदाच्या भूमिकेतून देशाच्या प्रगती व विकासाची केलेली पायाभरणी, लालबहादूर शास्त्रींनी दिलेली ‘जय जवान- जय किसान’ ही घोषणा, जगाच्या इतिहास -भूगोल बदलणाऱ्या इंदिरा गांधी, भारताच्या अर्थकारणाला आकार देणारे पी. व्ही. नरसिंह राव, आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करणारे व संगणक क्रांतिदर्शी राजीव गांधी,

जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग अशा अनेकांच्या कामगिरीने कॉंग्रेस नावाचा इतिहास साकारला गेला. सर्व मोठी धरणे , इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, अशा अनेक पायाभूत संस्थांची उभारणी यासारखी महत्त्वपूर्ण कामे कॉंग्रेसच्या सरकारने स्वातंत्र्यानंतर केली. सार्वजनिक उद्योग स्थापन केले. देशाच्या ऐक्यासाठी बलिदान दिले ते इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी. कॉंग्रेसची संपूर्ण वाटचाल म्हणजे देशाच्या इतिहासातील एक लखलखीत अध्याय होय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

बुरखा घातल्याने 'मोदीं'च्या सभेत प्रवेश नाकारला; मुस्लीम महिलांनी घेतली आक्रमक भूमिका, शिवाजी पार्कवर काय घडलं?

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

SCROLL FOR NEXT