दशकपूर्ती... निर्मल वारी अभियानाची sakal
संपादकीय

दशकपूर्ती... निर्मल वारी अभियानाची

सकाळ वृत्तसेवा

हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे. ही आगळी वेगळी सेवा आहे. दहा वर्षांपूर्वी वारीच्या मार्गातील दोन गावांमध्ये या अभियानाची सुरुवात झाली आणि त्याची व्याप्ती प्रतिवर्षी वाढत गेली. निर्मल वारीचा हा प्रवास अतिशय स्तुत्य असाच आहे.

- शैलेंद्र बोरकर

तिवर्षी देहू व आळंदीहून पंढरीला जाणारी वारी हे अवघ्या महाराष्ट्राचे भूषण आहे. लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी जात असतात आणि वारीच्या वाटेतील गावेच्या गावे वारकऱ्यांची सेवा मोठ्या भक्तीने करत असतात. कोणी त्यांच्या भोजनाची, कोणी न्याहारीची, कोणी विसाव्याची व्यवस्था करतात. कोणी फराळाची व्यवस्था करतात. कोणी वस्तू वाटतात तर कोणी वारकऱ्यांना आपल्या घरी मुक्कामासाठी आग्रहाने बोलावतात. वारकऱ्यांच्या सेवेचा असाच एक पैलू म्हणजे निर्मल वारी अभियान. यंदाचे वर्ष या आगळ्या वेगळ्या अभियानाच्या दशकपूर्तीचे आहे.

पुण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून नरेंद्र वैशंपायन यांची ओळख आहे. ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतात. निर्मल वारी अभियानाचे सक्रिय कार्यकर्ते आणि प्रारंभापासूनचे साक्षीदार म्हणूनही त्यांची ओळख सांगता येईल. वारीतून पंढरीला जात असलेल्या त्यांच्या आत्याला भेटण्यासाठी ते सासवडला गेले होते. त्या प्रथमच वारीत गेल्या होत्या. त्यावेळी वारीतील स्वच्छतेचा प्रश्न वैशंपायन यांना जाणवला आणि यावर आपण काहीतरी कृती करू या, या विचाराने त्यांनी तातडीने आराखडा तयार करायलाही सुरुवात केली. या अभियानाचा प्रारंभ आणि वाटचाल याविषयीचे अनुभव वैशंपायन यांनी सांगितले. वारी स्वच्छ, सुंदर बनवण्यासाठी आम्ही निर्मल वारी अभियानाचा प्रारंभ २०१५ मध्ये केला.

पुण्यातील सेवा सहयोग संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला. त्याच दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही कार्यकर्ते अशाच स्वरूपाचे काही काम उभे करण्यासाठी योजना आखत होते. त्यामुळे सेवा सहयोग आणि संघ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून पहिल्यावर्षी लोणी आणि यवत या दोन गावांमध्ये वारीतील वारकऱ्यांसाठी फिरती स्वच्छतागृहे किंवा स्वच्छतागृह आम्ही उभारली. स्वच्छतेची सोय, पाणी, वीज अशा पूरक व्यवस्थाही योग्यरीत्या उपलब्ध करून दिल्या. या पोर्टेबल टॉयलेट्सचा वापर वारकऱ्यांनी करावा, यासाठी त्यांना स्वयंसेवक विनंती करत होते. पहिल्यावर्षी या दोन गावांमध्ये खूप चांगला अनुभव आला. चांगला प्रतिसाद मिळाला. स्थानिक कार्यकर्ते मदतीला आले. त्यातून निर्मल वारी अभियानाची व्याप्ती दरवर्षी वाढत गेली, असे वैशंपायन म्हणाले.

पहिल्याच वर्षी मिळालेल्या यशामुळे हे अभियान पंढरपूरमध्ये करण्यासाठी शासनाकडून सांगण्यात आले. पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये अनेक पोर्टेबल टॉयलेटस्् स्वच्छतागृहे लावली गेली. पुढच्या वर्षी, २०१६ मध्ये महाराष्ट्र शासनही या उपक्रमात भक्कमपणे सहभागी झाले आणि शासनाने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी ५०० पोर्टेबल स्वच्छतागृहे तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी ३०० पोर्टेबल स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली. त्यानंतर २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्मल वारी अभियानासाठी राज्य शासनाच्या वार्षिक अंदाजपत्रकामध्येच आर्थिक तरतूद केली. यंदा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाकरता १५०० तर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग करता १२०० पोर्टेबल शौचालये उपलब्ध करून दिली. त्याबरोबरच यंदा संत सोपान देव आणि संत निवृत्तीनाथ यांच्या पालखी मार्गांना मिळून ३०० पोर्टेबल स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली गेली. सरकार या अभियानाला चांगले सहकार्य करत आणि वारकरीही आशीर्वाद देत आहेत. साथ देत आहेत. मुख्य म्हणजे या सेवेचा वापर वाढत आहे. दररोज एका स्वच्छतागृहाचा वापर किमान शंभरजण करतात, असे निरीक्षण आहे.

संयुक्त प्रयत्नातून अभियान यशस्वी

वारी निघून गेल्यावर अनेक शाळा, महाविद्यालये बंद ठेवायला लागत असत. अनेक गावातून लोक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असत. आता ती परिस्थिती हळूहळू बदलत आहे. सेवा सहयोग संस्थेबरोबरच संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि देहू संस्थानचे माजी अध्यक्ष शिवाजीराव मोरे महाराज, संघाचे तत्कालीन प्रांत प्रचारक अतुल लिमये, माजी खासदार प्रदीप रावत, संदीप जाधव, संतोष दाभाडे, राजाभाऊ माने, नीलेश देशपांडे, माऊली कुडले, किरण ढमढेरे, अमोल सोनवणे, शेखर माने, विश्वजित देशपांडे, बाळासाहेब अमराळे अशा अनेकांनी आणि हजारो स्वयंसेवकांनी हे अभियान यशस्वी होण्यासाठी जे परिश्रम केले त्यांचाही उल्लेख करावा लागेल. स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवी कार्यकर्ते, गावागावांमधील मंडळांचे सेवाभावी कार्यकर्ते, राज्य शासनाची यंत्रणा आणि मुख्य म्हणजे वारकरी यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून हे अभियान यशस्वी होत आहे. समूह आणि संघटित शक्तीचा हा प्रयोग पथदर्शी ठरत आहे.

(लेखक ‘सेवा भारती’ या अखिल भारतीय संस्थेचे पदाधिकारी आहेत.)

प्रेरणादायी हातांची गाथा

माणूस उभा राहतो तो परस्परांच्या प्रेरणांतून. लढणारे हात संकटात सापडलेल्यांना प्रेरणा आणि जिद्द देतात, प्रसंगी मार्गही दाखवितात. अशाच काही लढवय्यांच्या प्रेरणादायी कथा आपल्यासमोर सादर करत आहोत. तुमच्या शेजारी असेच लढणारे लोक असतील तर त्यांची संघर्षगाथा आम्हाला पाठवा. यासाठी फक्त एकच करायचे आहे. क्यूआरकोड स्कॅन करून किंवा नावासह editor.pune@esakal.com या मेलवर तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर माहिती पाठवावी. निवडक संघर्षगाथांना आम्ही प्रसिद्धी देऊ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT