mumbai coastal road  sakal
संपादकीय

एका प्रकल्पाची कथा नि व्यथा

दीपा कदम deepakadam3@gmail.com

मुंबईच्या ''कोस्टल रोड'' प्रकल्पाला खीळ या वरळीतच गेली पाच वर्षे लागलेली होती, ती देखील मुंबईच्या किनाऱ्यालगत होणाऱ्या मासेमारीमध्ये अडथळा

पा याभूत सुविधांचा विकासाचा प्रकल्प मार्गी लावताना किती गोष्टींचा विचार करावा लागतो, याची झलक मुंबईच्या ''कोस्टल रोड'' प्रकल्पाच्या निमित्ताने पाहायला मिळाली. वरळीच्या किनारपट्टीला आणि वरळी कोळीवाड्याला अनेक शतकांचा इतिहास आहे. वरळी कोळीवाडा सोडून आपल्याला वरळीमध्ये किंवा वरळी मार्गे होणाऱ्या कोणत्याही पायाभूत सुविधांचा विकासाचा विचार होणे कठीण आहे. मुंबईच्या ''कोस्टल रोड'' प्रकल्पाला खीळ या वरळीतच गेली पाच वर्षे लागलेली होती, ती देखील मुंबईच्या किनाऱ्यालगत होणाऱ्या मासेमारीमध्ये अडथळा येत असल्यामुळे. वरळी जवळून कोस्टल रोड सी लिंकला जोडला जात आहे. तेथील क्लीव्ह लॅण्ड बंदराजवळ दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या कनेक्टरचे काम सुरू होते. त्या पिलरमध्ये प्रस्तावित अंतर ६० मीटर होते.

ज्यामुळे कोळ्यांच्या बोटांना ये जा करण्यासाठी अडथळा निर्माण होणार होता. हे अंतर वाढवण्याची मागणी मच्छिमार व्यावसायिकांनी केली होती. अखेरीस यासाठी नियुक्त केलेल्या समितीने दिलेल्या अहवालानुसार १२० मीटर अंतर करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली. मच्छिमारांची मागणी किमान १६० ते २०० मीटर अंतर वाढविण्याची होती, मात्र त्यांनीही १२० मीटर अंतरावर समाधान व्यक्त केल्याने कोस्टल रोडचे वरळीत थांबलेले काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महापालिकेने या प्रश्नासाठी समिती नेमली होती. अभ्यासाअंती या समितीतील तज्ज्ञांनी दोन खांबांमधील अंतर १६० मीटर करण्याची शिफारस महापालिकेला केली होती. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या चर्चा, बैठकांनंतर अखेर वरळी इथल्या समुद्रामधील सात ते नऊ या तीन खांबांमधील क्रमांक आठ हा खांब रद्द करुन दोन खांबांमधील अंतर १२० मीटर ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यावर मच्छिमार संघटना आणि पालिका यांच्यात एकमत झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या नगरविकास विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे.

मुंबईसारख्या शहरातही स्थानिकांचा (कोळी समाज) पारंपरिक रोजगार हा मासेमारीचा आहे. त्यामुळे केवळ साठसत्तर बोटी मासेमारीसाठी वरळीहून जातात. म्हणून त्याकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिकांच्या रोजगाराच्या हक्कावर गदा येत होती. पालिका आणि मच्छिमार यांच्यात अनेकदा संघर्ष झाला. याभागात मच्छिमारी होतच नसल्याचा अहवालही तयार करण्यात आला. प्रत्यक्षात बोंबिल, भिंग माशांपासून इथल्या खडकांमध्ये कालवदेखील मोठ्या प्रमाणात सापडतात. वरळी - कोळीवाडे - मासेमारी हे नातं मुंबई शहरात इतकंच पुरातन आहे, ते नाकारून कसं चालेल? प्रकल्पामुळे जवळपास ५०० कुटुंबाचा रोजगार हिरावला जाणार होता. रोजगार आणि पारंपरिक रोजगार यामध्ये काही मूलभूत फरक आहे.

पारंपरिक रोजगाराचे काय?

रोजगार हा कौशल्य विकसित करून, उदरनिर्वाहासाठी केला जातो. पण पारंपरिक रोजगारात अनेकदा कौशल्ये परंपरेने चालत येतात. तो भावनेचा, जिव्हाळ्याचा विषयही असतो. त्यामुळे विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या पारंपरिक रोजगाराकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरले असते. पण पालिका हे सर्व दुर्लक्षित करून पिलरचे अंतर कमी न करण्यावर अडून बसली होती. न्यायालयीन कज्जांनंतर अखेरीस पिलरमधील अंतर वाढवले गेले आहे. पिलरमधील अंतर वाढवल्याने बोटींची येजा सुलभ होईल, पण समुद्रात खोलवर होणार्‍या बांधकामानंतर समुद्रातील जीवसृष्टी किती टिकाव धरेल असा प्रश्न पर्यावरणप्रेमी आणि मच्छिमार उपस्थित करत आहेत.

दोन पिलरचे अंतर वाढून बोटी येण्याची वाट रुंदावली असली तरी जाळ्यात मासोळी गावण्याची वाट नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यानिमित्ताने महापालिका निवडणुकांकडे लक्ष ठेवून भाजपने शिवसेनेच्या मतदारसंघांमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे युवानेते आ.आदित्य ठाकरे यांचा वरळी हा विधानसभा मतदारसंघ आहे.

कोस्टल रोड प्रकल्पाविषयी

  • एकूण १०.५८ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंत.

  • प्रकल्पामध्ये ४+४ मार्गिका असणारे भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे यांचा समावेश.

  • किनारी रस्ता प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष ऑक्टोबर, २०१८ मध्ये सुरु झाले असून नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.

  • या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाचा वेळ कमी होऊन विद्यमान रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या निवारणासाठी मदत होणार आहे.

  • वायू आणि ध्वनिप्रदूषणाची पातळी देखील कमी होईल.

  • समर्पित बस मार्गिकेद्वारे सार्वजनिक वाहतुकीमध्ये सुधारणा होऊन अतिरिक्त हरितपट्टयांची निर्मिती देखील होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "तुमच्या मतांचा अपमान करणाऱ्यांचा वचपा काढा, ही क्रांतीची वेळ मला संधी द्या" राज ठाकरेंचे महाराष्ट्राला आवाहन

Dussehra 2024 : घरोघरी अवतरले चैतन्य! विजयादशमीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत गर्दी, सोने, झेंडु फुले महागले

Dussehra Melava 2024 Live Updates: शिवाजी पार्क मैदानावर चिखल, उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा संकटात

Ajay Jadeja: माजी क्रिकेटपटू होणार जामनगरचा पुढील महाराजा; जाणून घ्या, राजघराण्याचा इतिहास

Dussehra 2024: दसऱ्याला मलाईदार स्वादिष्ट खीर बनवायची असेल तर नोट करा सोपी रेसिपी, सर्वजण खातच राहतील

SCROLL FOR NEXT