mosquito Sakal
संपादकीय

ग्राहकोपयोगी उत्पादनांचा ‘डास’नामा

२०२० मध्ये जागतिक पातळीवर निव्वळ डासांना दूर ठेवण्याच्या औषधांची उलाढाल ४.८अब्ज डॉलर होती.

डॉ. मानसी फडके

दरवर्षी ऑगस्ट - सप्टेंबर हे महिने आले, की ‘गुनगुना रहे हैं डास, डर लगे हमे गली-गली’ असे गाणं गुणगुणायची वेळ तुमच्या आमच्यावर येते! डास या किड्याला आता एक प्रकारचे आर्थिक ‘स्टेटस’ मिळाले आहे, असे म्हणणे वावगे नाही!

२०२० मध्ये जागतिक पातळीवर निव्वळ डासांना दूर ठेवण्याच्या औषधांची उलाढाल ४.८अब्ज डॉलर होती. या औषधांमध्ये कॉइल्स, किंवा स्प्रे आहेतच; पण अंगाला आणि कपड्यांना लावता येतील, अशी उत्पादनेदेखील आहेत. ‘खिचीखिची त्वचा’ झालेल्यांसाठीही काही उत्पादने आहेत. म्हणजेच डास या किड्याने आता औषध या अवकाशातून सौंदर्य उत्पादने या अवकाशातदेखील भरारी घेतली आहे! एवढेच नाही तर टिकाऊ मालाच्या डिझाईनमध्येही डास डोकावताना दिसतात. कोविडपश्चात काळातील वातानुकूल हे निव्वळ स्मार्ट, वीज वाचवणारे आणि आवाजाने नियंत्रित होणारे नाहीत, तर डासांना दूर ठेवणारेही आहेत.

बाजारात ‘अल्ट्रासाउंड टेक्नॉलॉजी’चा वापर करून डासांना दूर ठेवणारे टीव्हीदेखील आलेले आहेत. ‘इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ने विमा कंपन्यांकरीता नवीन सूचना जाहीर केल्या आहेत. अनेक विमा कंपन्या डासांनी पसरणाऱ्या रोगांवर स्वतंत्र विमा उत्पादने तयार करत आहेत. ती ‘मशकरक्षक’ या मानकावर आधारित असावीत, अशी सूचना दिली गेली आहे. डासांमुळे मलेरिया, डेंगी, चिकनगुनिया हे रोग सार्वजनिक आरोग्याला धोकादायक आहेत. दिल्ली सरकारने ‘दस हफ्ते, दस बजे, दस मिनिट’ या घोषणेतून लोकांना दर आठवड्यातील दहा मिनिटे स्वतःच्या घरात कुठे साठलेले पाणी नाही, याची खात्री करून घेण्याचे आवाहन केले आहे.

औषधांपासून विम्यापर्यंत सर्व क्षेत्रांत डासांची गुणगुण स्पष्ट आहे. डासांमुळे पसरणारी रोगराई टाळता येण्यासारखी आहे. पण याकरीता डासांच्या विविध रोग पसरवणाऱ्या प्रजातींची संख्या कधी आणि कुठे वाढते आहे, याची माहिती असणे गरजेचे आहे. इथे उपयुक्त असते डासांचे सर्वेक्षण! विविध देशांमध्ये राष्ट्रीय किंवा उपराष्ट्रीय पातळीवरची आरोग्य खाते प्रचलित सांख्यिकी तंत्र वापरून चक्क डासांचे सर्वेक्षण करतात. यात बरेचसे सर्वेक्षणाचे काम मलेरिया पसरवणाऱ्या डासांवर झालेले दिसते. झाडीमध्ये, पाण्याच्या डबक्यांमध्ये, वसाहतींमध्ये सापडणाऱ्या डासांचे तसेच अंडी आणि पिल्लांचे नमुने घेऊन कुठच्या भागात मलेरियाच्या डासांची संख्या वाढू शकेल याचे अंदाज बांधले जातात. डासांच्या सर्वेक्षणाकरिता हल्ली विशिष्ट प्रकारचे सापळेदेखील तयार केले गेलेले आहेत. पण हे सापळे तयार करणे फार अवघड असते. याचे मुख्य कारण हेच, की जगात माहीत असलेल्या ३०००पेक्षा अधिक डासांच्या प्रजाती आहेत.

काही प्रजाती रात्री शिकार करतात, काही दिवसा. काही डास अंगाच्या उबेवरून शिकार वेधतात, तर काही कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणावरून. अंडी घालू पाहणारी मादी उब नव्हे तर थंडाव्याच्या शोधात असते. तेथे तिला अंडी घालण्याकरिता पाणी मिळण्याची शक्यता अधिक असते. तर, सापळे कसे तयार करावे, कुठे आणि किती रचावे हा मुळातच खूप अवघड विषय आहे. कुठल्या प्रकारचे सापळे कुठल्या प्रजातींकरिता योग्य आहेत, हे प्रस्थापित करण्याकरिता देखील संख्याशास्त्राचे निकषच वापरले जातात. वेळोवेळी तयार केलेल्या आकडेवारीमुळे अनेक देशांमध्ये शास्त्रीय अंगाने मलेरिया प्रतिबंधक धोरणे राबवली गेली आहेत. २०००पासून आफ्रिकेमध्ये मलेरियाचे प्रमाण ७० टक्क्यांनी घटले आहे. अशा शास्त्रीय मोहिमांचा या यशात मोठा वाटा आहे.

वर्ष मलेरिया दर प्रति १००० (जागतिक)

२००० ७७.८१

२००५ ७५.८१

२०१० ७१.१२

२०१५ ५७.४३

२०१८ ५७.४३

स्रोत: जागतिक बँक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT