driving sakal
संपादकीय

दुनियादारी - जग घुमेया!

अगं पण आता हॉर्न उगाचच न वाजवायचा असा नियमच आहे

आदित्य महाजन

‘‘छान प्रवास झाला ना? काहीच ट्रॅफिक नव्हतं.’’

‘‘हो ना! सरप्राइझिंगली स्त्यावरही कोणीच गर्दी करत नव्हतं. कोणी हॉर्न सुद्धा उगाच मारला नाही.’’

‘‘अगं पण आता हॉर्न उगाचच न वाजवायचा असा नियमच आहे ना... मग नियम केलाय तर आपल्या इथली जनता तो पळणाराच की!’’

‘‘खरंय रे! आज आपल्याकडून आपण चांगली गाडी चालवली म्हणून टोल नाक्यावर टोल पण नाही घेतला नाही का त्या माणसानं!’’

‘‘हो ना! त्यामुळं मला अजून छान वाटतंय माझ्या ड्रायव्हिंगचं. बरं... तुझ्या कामावर तू आज सुट्टी टाकलीस ती मिळाली का तुला लगेच?’’

‘‘हो एकदम इझिली मिळाली. ह्या महिन्यात आधीच २ वेळा २-२ तास जास्तीचं काम केलंय मी. माझा बॉस म्हणाला की माझं सुट्टी घेणं हा माझा हक्क आहे, सो घेच.’’

‘‘बेस्टच झालं. माझी पण फ्री-लान्सची सगळी कामं उरकली मी.’’

‘‘बरं केलंस... पण त्या सगळ्यांनी पेमेंट केल्या का रे तुला? फ्री-लान्स करताना पेमेंट लवकर देत नाहीत अरे क्लायंट, नाही का?’’

‘‘नाही, नाही, असं काही नाही... माझे सगळे क्लायंट नशिबानं चांगले आहेत. त्यांनी मला सगळं पेमेंट आधीच केलं होतं. एका क्लायंटनं तर तीन महिन्यांचं पूर्ण पेमेंट आधीच केलंय.’’

‘‘वाह वाह! सुखच!’’

‘‘ए ते बघ तिकडे! तोच आहे ना गं तो माणूस, मगाशी कारची खिडकी खाली घेऊन सारखा थुंकत होता? कुठल्यातरी पोलिटिकल पार्टीची मोठी पाटी पण होती मागे कारवर त्याच्या.’’

‘‘हो रे! तोच आहे हा! धरला मस्त त्याला पोलिसांनी. आता जितक्या वेळेला रस्त्यात थुंकलाय तेवढी पावती फाडणार त्याची.’’

‘‘हाहाहा! मी तर असंही ऐकलंय की आता खूपदा असं थुंकताना पकडला गेला, की पाच वर्षासाठी गाडी चालवण्याचा लायसन्स रद्द केला जातो.’’

‘‘आय थिंक, हे सेम नियम पब्लिक प्लेसेसमध्ये सिगारेट ओढणाऱ्यांना पण लागू केलेत ना?’’

‘‘असेल... मी सिगारेट ओढत नाही त्यामुळं मला ते सांगणं अवघडे!’’

‘‘अरे फालतू! लगेच सज्जनतेचे गुणगान नको गात बसू तुझ्या. माहिती आहे मला तू किती चांगला आणि गुणी आहेस ते.’’

‘‘हीहीही... मग ठीके!’’

‘‘बाय द वे... तुझा तो लाडका सिनेमा आणि वाढदिवस असं दोन्ही येत आहे ना? आणि दोन आठवड्यांनी एक लाँग विकेंड आहे... तर मी प्लॅन करतीये तुला एक छान छोटी ट्रीप, सिनेमा आणि ट्रीट द्यावी.’’

‘‘अगं ए! इतकं कशाला? आणि इतका खर्च नको करूस...’’

‘‘गप रे! तू इतकं करतोस इतरांसाठी... एकदा तुझ्यासाठी केलं तर काही होत नाही. आणि खर्च नाहीये जास्त. सगळ्यांनी कोविडमध्ये वाढवलेले भाव आता आपणहून कमी केले आहेत. सगळं परवडेबल आहे आता...’’

तेवढ्यात श्रीधरला कुठूनतरी लांब कूकरच्या शिट्ट्यांचा आवाज येतो. तो तसाच गादीत लोळत असताना एक डोळा उघडतो. त्याची आई लांबून ओरडत असते, ‘‘अरे उठ आता... जरा आवरून घे. सणवार आहेत घरी. कसं होणार ह्या पोराचं लग्न झाल्यावर??’’

तसंच पडल्या पडल्या तो एका हातानं त्याचा मोबाईल उघडतो. कामाच्या वेळे बाहेर कामाचे मेसेज पर्सनलला करत जाऊ नका, असं चार वेळा स्पष्ट सांगूनही त्याच्या बॉसचे साडेसात मेसेजेस सकाळी ७.३०ला येऊन पडले असतात. कुठल्यातरी सिग्नलला श्रीधरची गाडी दोन इंच झेब्रा क्रॉसिंगवर कॅमेरामध्ये आढळली असल्यानं त्याला ५०० रुपयांचा दंड भरा असा रीमाइंडर त्याला आलेला असतो.

राधिकाला श्रीधरनं १४ तासांपूर्वी केलेल्या मेसेजला तिनं अद्याप रिप्लाय दिला नव्हता, हे पाहून तो सगळ्या नोटिफिकेशन मध्ये आलेल्या सरकार विरोधातल्या बातम्या उडवून टाकतो.

‘‘पॅरलल वर्ल्ड ह्या कॉन्सेप्टवर एक मस्त देसी वेब सिरीजची पटकथा लिहावी...’’ असा विचार करत तो निवांतपणे बाथरूमचं दार लावतो.

mahajanadi333@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : 'ED प्रकरणात कोर्टानं मला क्लीन चिट दिलीये, शरद पवारांना याची माहिती नाही'; काय म्हणाले मुश्रीफ?

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

'PM मोदी उठता-बसता बाळासाहेबांचं नाव घेतात आणि उद्धव ठाकरेंच्याच पाठीत खंजीर खुपसतात'; प्रियांका गांधींचा हल्ला

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Panchang 17 November: आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

SCROLL FOR NEXT