rishi sunak sakal
संपादकीय

‘नाम’मुद्रा : कणखर नि वेगवान

एकेकाळी भारतावर सत्ता गाजविलेल्या ब्रिटनमध्ये सध्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक या भारतीय वंशाच्या नेत्याचं नाव आघाडीवर आहे.

सारंग खानापूरकर

एकेकाळी भारतावर सत्ता गाजविलेल्या ब्रिटनमध्ये सध्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक या भारतीय वंशाच्या नेत्याचं नाव आघाडीवर आहे.

एकेकाळी भारतावर सत्ता गाजविलेल्या ब्रिटनमध्ये सध्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक या भारतीय वंशाच्या नेत्याचं नाव आघाडीवर आहे. बोरिस जॉन्सन यांना हटविण्यात नंतर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सर्वांत प्रथम वीस खासदारांचा पाठिंबा मिळविण्यात सुनक आघाडीवर आहेत. ते जन्मानं भारतीय नसले तरी त्यांचं कुटुंब भारतीय आहे आणि ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत. ब्रिटनमध्येच १९८० मध्ये जन्मलेले सुनक हे ऑक्सफर्ड आणि स्टॅनफोर्ड अशा नामांकित विद्यापीठाचे स्कॉलर आहेत. स्टॅनफोर्डमध्ये एमबीए करत असताना त्यांची ओळख अक्षता मूर्तींशी झाली होती. २००९ मध्ये बंगळूरमध्ये त्यांच्याशी विवाह झाला.

सुनक यांनी राजकारण, तत्वज्ञान आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला आहे. वयाच्या १८ व्या वर्षी वेटरचंही काम त्यांनी केलं होतं. छोट्या दुकानात काम करण्याच्या अनुभवापासून मोठ्या कंपन्यांमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळण्यापर्यंत ऋषी सुनक यांनी वेगाने झेप घेतली. तशीच झेप त्यांनी राजकारणातही घेतली. २०१५ मध्ये प्रथम यॉर्कशायरमधल्या रिचमंड येथून खासदार म्हणून निवडून गेले. वास्तविक या मतदारसंघातल्या लोकांनी विदेशी वंशाच्या लोकांना कधी पसंती दिली नव्हती.

मात्र, सुनक यांच्या बाबतीत त्यांनी २०१५ ला, आणि नंतर २०१७ आणि २०१९ मध्येही अपवाद केला. याच काळात ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या मागणीनं जोर धरला होता. सुनक यांनी प्रथमपासूनच या मागणीला पाठिंबा देत तिचा हिरिरीने प्रचारही केला. त्यामुळे पक्षात त्यांचा दबदबा वाढू लागला. जॉन्सन पंतप्रधान झाल्यावर अर्थमंत्री झालेल्या सुनक यांनी ब्रेक्झिटचा मुद्दा लावून धरत तो पूर्णत्वास नेला. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ऋषी सुनक यांनी एक अब्ज पौंड गुंतवणूक असलेल्या एका फर्मची स्थापना केली होती. त्यामुळे ब्रिटिश व्यवसाय, त्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक धोरणं याची त्यांना जाणीव होती. फेब्रुवारी २०२० मध्ये ब्रिटनचे भारतीय वंशाचे पहिले अर्थमंत्री बनून त्यांनी इतिहास घडवला.

काँझर्व्हेटिव्ह पक्षात सध्या सुरू असलेल्या चर्चेकडे पाहिल्यास जॉन्सन यांच्यानंतर पंतप्रधान बनून ते आणखी एक इतिहास घडवण्याची शक्यता आहे. जॉन्सन यांचे पाठिराखे असलेल्या सुनक यांनीच त्यांच्या नेतृत्वावर अविश्‍वास दाखवून राजीनामा दिल्यावर, आताही मते मिळविण्यासाठी जॉन्सन यांच्यावर टीका करणे त्यांना मान्य नाही. ब्रिटनच्या भविष्यासाठी काय करावे, यात जास्त रस असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कोरोना काळात जनता आर्थिक अडचणीत आली असली तरी मोठ्या प्रमाणावर करामध्ये कपात करणे आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर आपला भर असेल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

सुनक आपल्या हिंदू वारशाबद्दल अभिमान बाळगतात. महात्मा गांधींच्या स्मृत्यर्थ ब्रिटन सरकारने प्रथमच एका विशेष नाण्याचं प्रकाशन केलं होतं. याबद्दल त्यांनी जाहीररीत्या समाधान व्यक्त केलं होतं. ब्रिटनमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या भारतीय समुदायाला ही बाब आवडणारी आहे. सुनक यांनी अर्थमंत्रीपद स्वीकारल्यापासूनच त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पाहिलं गेलं आहे. ब्रिटिश माध्यमांमध्ये अनेकदा याबाबत चर्चा झाली आहे. पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या १०, डाऊनिंग स्ट्रीटच्या शेजारचे, ११, डाऊनिंग स्ट्रीट हे घर सुनक यांचे आहे. आगामी काळात ते शेजारच्या घरात राहायला जाणार का, याची उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT