Experienced politician 
संपादकीय

अनुभवी राजनीतिज्ज्ञ

सकाळ वृत्तसेवा

नाममुद्रा

अरविंद रेणापूरकर

राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार, चीनचे अभ्यासक ५९ वर्षीय विक्रम मिस्री यांनी परराष्ट्र सचिवपदाचा नुकताच कार्यभार स्वीकारला. १९८९ च्या तुकडीच्या परराष्ट्र सेवेचे अधिकारी असणारे मिस्री यांनी विनय क्वात्रा यांची जागा घेतली आहे. त्यांचा जन्म श्रीनगरचा असून त्यांचे प्राथमिक शिक्षण श्रीनगर येथे डीएव्ही आणि उधमपूर येथील कारमेल कॉन्व्हेंट येथे झाले. दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधून इतिहासात पदवी प्राप्त केली. शिवाय एमबीए ही केले.

प्रारंभी तीन वर्षे त्यांनी मुंबई आणि दिल्लीत जाहिरातकंपनीत काम केले. यादरम्यान स्पर्धापरीक्षेची ते तयारी करत होते.१९८९मध्ये त्यांची भारतीय परराष्ट्रसेवेत निवड झाली. सुरुवातीच्या काळातच त्यांनी १९९१ ते १९९६ ब्रुसेल्स आणि ट्यूनिस येथे विविध भारतीय मोहिमांत जबाबदाऱ्या पार पाडल्या. यादरम्यान, मिस्री यांना तीन पंतप्रधानांसमवेत स्वीय सहायक म्हणून काम करण्याचा अनुभव मिळाला. ते तीन पंतप्रधान म्हणजे इंद्रकुमार गुजराल, डॉ. मनमोहनसिंग आणि नरेंद्र मोदी.

चीनमध्ये राजदूतपदाची जबाबदारी सांभाळणे हे कठीण आणि मुत्सद्दीपणाची कसोटी पाहणारे काम. चीनच्या कुरापती सुरू असताना कौशल्याने त्यांनी या जबाबदाऱ्या निभावल्या. २०१९ ते २०२१ मध्ये चीनमध्ये राजदूत म्हणून काम करत असताना विक्रम मिस्री यांनी उभय देशांतील संबंध अधिक ताणले जाऊ नयेत, याची पुरेपूर काळजी घेतली.

जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी घुसखोरी केली आणि ती परतवून लावताना २० जवान हुतात्मा झाले. या कारणांमुळे भारत आणि चीन यांच्या संबंधात दरी निर्माण झाली. परंतु ही दरी दूर करण्यासाठी मिस्री यांनी पुढाकार घेत चर्चेच्या फेऱ्या सुरू केल्या. कालांतराने त्यांच्या कार्यकाळात उभय देशातील संबंध तणावपूर्ण; परंतु स्थिर राहिले. स्पेन आणि म्यानमारध्येही राजदूत म्हणून त्यांनी काम केले. शिवाय पाकिस्तान, अमेरिका, जर्मनी, बेल्जियम, श्रीलंकेसह अनेक देशांत भारतीय मोहिमा त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. मिस्री यांची नियुक्ती त्यांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावणारी असली तरी देशाच्या दृष्टीने संवेदनशील काळात ही नियुक्ती होत आहे.

चीनने सीमा सुरक्षेला नेहमीच आव्हान दिले आहे. अशावेळी राजनैतिक आणि कूटनीती पातळीवर चर्चेतून तोडगा काढण्यावर भारताचा भर राहिला आहे. अशावेळी चीनमधील मिस्री यांच्या राजदुतपदाचा अनुभव महत्त्वाचा. शीतयुद्ध समाप्तीनंतर बीजिंग हे जागतिक पातळीवर राजकीय आणि भू सामरिक समीकरणाचे नवे केंद्र म्हणून उदयास आलेले असताना मिस्त्री यांचा चीनसंबंधीचा अभ्यास परराष्ट्र धोरणाची दिशा ठरविण्यास उपयुक्त ठरू शकतो. शिवाय हुकुमशाहीचा सामना करणाऱ्या आणि युद्धग्रस्त म्हणून म्यानमारच्या परिस्थितीची त्यांना चांगली जाणीव असून म्यानमारलगतच्या अशांत सीमा आणि तेथील लष्करशहांना दबावाखाली ठेवणे गरजेचे असताना मिस्री यांची नियुक्ती होत आहे.

आणखी एक संदर्भ नमूद करणे आवश्यक आहे. कॅनडा आणि अमेरिकेच्या भूमीवर भारतीय गुप्तचरांकडून कारवाया होत असल्याचा आरोप केला जात आहे. हे विषय हाताळणे आव्हानात्मक असेल. मिस्री यांचा अनुभव पाहता ते यात यशस्वी होतील, असे वाटते. मिस्री यांच्या नियुक्तीकडे भारतीय परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनातील व्यापक बदल म्हणून पाहता येऊ शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT