Subhash Awchat Sakal
संपादकीय

कलाबहर : मिश्र माध्यमांतील गंमतशीर स्वातंत्र्य!

आज त्यांच्यातल्या त्या उत्कट कलाकाराला बोलायचं होतं आजच्या ‘मिक्स मीडिया’ युगाबद्दल. त्यांच्याच शब्दांत- ‘‘सध्या जगातल्या चित्रकलेचा जो ‘इझम’ तो गंम्मतशीर आहे.

सकाळ वृत्तसेवा

- गायत्री तांबे-देशपांडे

एका कलंदर व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहितीये. सुभाष अवचट! ज्येष्ठ प्रसिद्ध चित्रकार, इलेस्ट्रेशनिस्ट, लेखक आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व. अनेक वर्षांचा कलाप्रवास आणि विविध कलाक्षेत्रातील दिग्गजांची संगत लाभलेले अवचटसर त्यांच्या चित्रांतून आणि लेखांतून आपल्याला वेगळ्या विश्वात नेतात. उत्कट आणि आत्मविश्वासी अवचटसर मोकळ्या मनाचे आणि स्पष्टवक्ते! ५० वर्षांहून अधिक कार्यकाळात त्यांनी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे केली, चित्रमालिका केल्या आणि पुस्तकंही लिहिली. त्यांच्यात उत्तम शिक्षकही दडलाय. त्यांचे वाचन दांडगे आहेच आणि चित्रकला विश्वातील नवनवीन घडामोडींची माहितीही.

आज त्यांच्यातल्या त्या उत्कट कलाकाराला बोलायचं होतं आजच्या ‘मिक्स मीडिया’ युगाबद्दल. त्यांच्याच शब्दांत- ‘‘सध्या जगातल्या चित्रकलेचा जो ‘इझम’ तो गंम्मतशीर आहे. त्याला म्हणतात ‘मिक्स मीडिया’ (मिश्रमाध्यम), एक समकालीन ‘वाद.’ त्याचा हेतू असा की, चित्रांतून जे व्यक्त करायचंय त्यातली सगळी बंधनं सुटून गेली आहेत. आता अमुक पद्धतीनेच चित्रं काढलं तरंच ते चित्र आहे, हा गैरसमज दूर झालाय. तुम्ही कुठल्याही माध्यमात मत व्यक्त करू शकता. ही देणगीच या पिढीला मिळाली आहे आणि ती त्यात अद्‍भूत कामही करत आहे. ते पाहून व्यक्तिस्वातंत्र्य आणि वैचारिक स्वातंत्र्य किती गम्मतशीर असू शकतं ते कळतं. या भाग्यवान पिढीला चित्रकलेच्या कुठल्याही नियमात बसवलेले नाही. त्यांना जे अभिव्यक्त करायचंय ते सहजतेने, पूर्णपणे कुठल्याही माध्यमातून व्यक्त करायची मुभा आहे, जी पूर्वी नव्हती. आज जगातील चित्रकला ही ‘व्हिज्युअर आर्ट’ म्हणून ओळखली जाते. पूर्वीच्या चित्ररूपी किंवा शिल्परूपी अभिव्यक्तीला सॅच्युरेशन येत गेलं. मग पेंटिंगच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काय सांगायचंय याचं स्वातंत्र्य मिळालं. ही पिढी कुठेही अडकलेली नाही, स्वच्छ मनाची आहे. आज माध्यमांचा, विचारांचा, शाळा-कॉलेजमधल्या शिकवण्याचा कर्मठपणा आणि अनेक बंधने गळून पडली आणि ही पिढी मनमोकळेपणाने हा खेळ खेळू लागली. नवीन तंत्रज्ञानाला काही लोक घाबरतात, विरोध करतात. काळाबरोबर आपण बदललंच पाहिजे.

मन व्यक्त करायला आज कुठल्याही माध्यमाचा वापर करायची प्रत्येकाला परवानगी आहे. फक्त एक नियम आहे- तंत्रज्ञानाचा बाऊ करू नये, त्यात गिमिक्स नसावे. या नवीन माध्यमांना साधन म्हणून स्वीकारावं. चित्रकलेची उत्क्रांती ही होणारच. आत्तापर्यंतच्या शिक्षणपद्धतीपलीकडे डिजिटल पद्धती सुरू झालीये. ती खेडेगावांपर्यंत पोहचावी. मग अमेरिकेतील विद्यार्थी आणि आपल्या खेड्यातील विद्यार्थी यांत फरक राहणार नाही. जो अप्रतिम विचार करतो तो आणि त्याची कला श्रेष्ठ! माध्यम कुठलेही असो, विचारच महत्त्वाचा. आपल्या खेड्यात अशी प्रगती होईल आणि त्याची जबाबदारी आहे शालेय शिक्षकांची. शिक्षणपद्धतीने पिढी घडते! मुलांच्या मनाचा विचार करून त्यांना प्रोत्साहन दिले तर खूप काही नवीन घडेल. चित्रकार हा फक्त स्टुडिओत तयार होत नाही, कला महाविद्यालयात तशी मोकळीक हवी. त्यांचा सर्वांगीण दृष्टिकोन बनू द्यावा आणि मग त्यांचे विचार चित्रांतून प्रकट व्हावेत. चित्रकार चित्रांतून बोलतो. त्यांना ‘चित्रकार’ बनवावे, केवळ क्राफ्टसमन नव्हे. नवनवीन शिक्षणपद्धती राबवून त्यांचा साधन म्हणून वापर करायला शिकवल्यास आपल्याला सुंदर तरुण चित्रकार नक्की मिळतील, अशी आशा आहे.’’ हे सर्व ऐकताना आपण भारावतो. नक्की समजलं आणि पटलंही की या ‘मिक्स मीडिया’ युगातून काही सुटका नाही. त्याचा स्वीकार करावा, सहजतेने व्यक्त व्हावे; कुठल्याही माध्यमात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT