गुरु गोविंद दोनों खडे sakal
संपादकीय

गुरु गोविंद दोनों खडे

जनसामान्यांत एक अशीही समजूत असते की, गुरू शिष्याला शोधतो. पण याचा अर्थ गुरू हातात दिवा घेऊन शिष्यामागे वणवण फिरतो आहे, असा नसून शिष्याला शिष्यत्व द्यायचे की नाही किंवा शिष्य म्हणून एखाद्याला स्वीकारायचे की नाही हे ठरवण्याचा अधिकार हा गुरूंचा असतो, गुरूला शिष्याची गरज नसते, शिष्य मात्र गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय पूर्णत्वाला पोहोचणे शक्य नसते.

सकाळ वृत्तसेवा

जनसामान्यांत एक अशीही समजूत असते की, गुरू शिष्याला शोधतो. पण याचा अर्थ गुरू हातात दिवा घेऊन शिष्यामागे वणवण फिरतो आहे, असा नसून शिष्याला शिष्यत्व द्यायचे की नाही किंवा शिष्य म्हणून एखाद्याला स्वीकारायचे की नाही हे ठरवण्याचा अधिकार हा गुरूंचा असतो, गुरूला शिष्याची गरज नसते, शिष्य मात्र गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय पूर्णत्वाला पोहोचणे शक्य नसते.

गुरु गोविंद दोनों खडे,

काके लागू पाँव

बलिहारी गुरु आपने,

गोविंद दियो बताय

कबीरा गोविंद दियो बताय

परमेश्र्वर व गुरू एकत्र पुढ्यात उभे राहिले, तर आधी नमस्कार कुणाला करावा, असा प्रश्र्न आला असता ‘गुरूं’ना... असे या ठिकाणी संत कबीरजी निर्विवादपणे सांगत आहेत, कारण परमेश्र्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग केवळ गुरूच दाखवू शकतात. परमेश्र्वर रुष्ट झाला तर गुरू समज काढू शकतात, पण गुरूंचा आशीर्वाद नसला तर सर्व मुसळ केरात जाते. गुरूंचा महिमा समजावा यासाठी याहून चपखल उदाहरण सापडणार नाही.

आज आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेचा पावन दिवस. हा दिवस आपल्या सद््गुरूंबरोबर घालवायचा असतो, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात, फुले-हार अर्पण करून त्यांचे आभार व्यक्त करायचे असतात. शिष्य कोठेही असला तरी तो या दिवशी गुरूंकडे जातो, त्यांची प्रार्थना करतो, आभार प्रदर्शित करतो, आशीर्वाद मिळण्याची अपेक्षा करतो. ‘सद््गुरूवाचोनि सापडेना सोय’ असे म्हटलेले आहे, म्हणजे सद््गुरू केल्याशिवाय मार्ग सापडत नाही, जीवन आनंदमय होत नाही, जिवाला स्वातंत्र्याचा अनुभव मिळू शकत नाही आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कायमस्वरूपी अवर्णनीय आनंदरूपी मुक्ती मिळू शकत नाही.

गुरू-सद््गुरू ही संकल्पना फक्त भारतीय संस्कृतीमध्ये आहे. आध्यात्मिक क्षेत्रात सद््गुरू हेच तारणहार असतात. जनसामान्यांमध्ये एक अशीही समजूत असते की, गुरू शिष्याला शोधतो. पण याचा अर्थ गुरू हातात दिवा घेऊन शिष्यामागे वणवण फिरतो आहे, असा नसून शिष्याला शिष्यत्व द्यायचे की नाही किंवा शिष्य म्हणून एखाद्याला स्वीकारायचे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार हा गुरूंचा असतो, असा आहे. गुरूला शिष्याची गरज नसते, शिष्य मात्र गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय पूर्णत्वाला पोहोचणे शक्य नसते. 

सध्याच्या काळात सद््गुरू व गुरू शोधणे, मिळणे हे खूप अवघड आहे. शिक्षक अनेक भेटतात, पण ते व्यावहारिक पातळीवर. मन शांत करणे, मनाच्या वृत्ती शांत करणे आणि एकूणच चक्रसाधना, नादोपासना, ॐकारसाधना करून घेणे हा अवघड विषय समजण्यासाठी, सिद्ध होण्यासाठी मात्र सद््गुरूंचीच आवश्यकता असते. प्रोत्साहन मिळण्यासाठी सद््गुरूंनी शिष्याच्या डोक्यावर हात ठेवला तरी शेवटी शिष्याच्या तयारीप्रमाणे, त्याच्या शुचितेनुसार, त्याच्या श्रद्धेप्रमाणे ज्ञान ग्रहण करण्याची आणि अनुभवण्याची शक्ती प्राप्त होते आणि त्याप्रमाणेच त्याला फलप्राप्ती होते.

अनेक वेळा फसवणूक करणारे गुरू भेटतात असाही आक्षेप सध्याच्या काळात घेतला जातो, परंतु चुकीच्या अपेक्षा ठेवून चुकीच्या व्यक्तीकडे गेल्यावर जे काही होणार ते चूकच असणार आहे. मग त्याला फसवणूक म्हणावी किंवा इतर कुठलाही शब्दप्रयोग करावा. मनुष्यमात्राचे कल्याण व्हावे, स्वतःला नित्यानंद, सच्चिदानंद, परमशांती मिळावी या उद्देशाने शोधलेल्या सद््गुरूंकडून फसवणूक होण्याचा प्रश्नच येणार नाही. हे खरे की कोणीतरी फसवतो म्हणून या मार्गाने न जाण्यात शेवटी तोटा साधकाचाच असतो. एखादा धंद्यात बुडतो म्हणून कुणीच धंदा न करता किंवा त्यात असणारा धोका न स्वीकारता राहिले तर कसे काय चालेल? अर्थात गुरू-शिष्याच्या नात्यात भौतिकता काहीही नाही. या नात्यात द्यायचा असतो विश्र्वास आणि घ्यायचा असतो शांतीचा, आनंदाचा, परमानंदाचा अनुभव. आपल्याला जे काही समजते व इंद्रियांना जे काही कळते, दिसते त्या इंद्रियांची जाणीव व क्षमता वाढविणे आणि भौतिकतेच्या पलीकडे असलेले विश्र्वाचे अगाधत्व व विश्र्वाचा पसारा समजून घेणे हा उद्देश असतो.

एकूणच हे सर्व विश्र्व एक कुटुंब आहे, सर्वच जण एकमेकांशी जोडलेले आहेत. प्रत्येकाचे जरी महत्त्व असले आणि प्रत्येक जण स्वतःचे काम व्यवस्थित करत असला तरी त्याचे या विश्र्वातील अस्तित्व अतिशय गौण आहे, असे लक्षात घेऊन आपापले कर्म व्यवस्थित करत राहाणे, आपल्या स्वभावानुसार खाणे, पिणे, कर्म करणे व मन शांत ठेवणे हे सद््गुरूंकडून शिकायचे असते.

शरीरातील षट्चक्रांरापैकी भ्रूमध्यातील आज्ञाचक्र हे सद््गुरूचरणांचे स्थान असते. ज्यांची आज्ञा पाळायची त्या सद््गुरूंचे स्थान दुसरे काय असणार? या आज्ञाचक्राला सिद्ध करण्याचा एकमेव मार्ग असतो, सद््गुरूंच्या पायावर डोके ठेवणे, त्यांच्या चरणरजाचे डोळ्यांत अंजन घालणे. सद््गुरू त्यांचे आयुष्य मानवतेच्या कल्याणासाठी वापरत असतात, ठिकठिकाणी भ्रमण करून भक्तांवर अनुकंपा दाखवून कृपा करत असतात म्हणून सद््गुरूंच्या चरणांना, त्यांच्या चरणरजाला इतके महत्त्व असते. सद््गुरूंच्या चरणी नतमस्तक झाल्याने मूलाधार चक्राच्या ठिकाणी असणारे पृथ्वीतत्त्व व कपाळाच्या मध्यभागी असणारे आकाशतत्त्व यांचे मिलन होते आणि गीतरामायणातील ‘आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे’ या पंक्तीनुसार सीतारूपी शरीराला  अंतिम ध्येयाची निवड स्वयंनिर्णयाने करता येते, यातूनच अंतरात्म्याची, श्रीरामपरमात्म्याची आज्ञा मिळू शकते आणि ती आज्ञाचक्राद्वारे समजून घ्यायची असते. अंतःप्रेरणा, क्लिअरव्हायन्सचे मूळ हेच होय. 

सद््गुरूंना शिष्याकडून काहीही नको असते, तसेच सद््गुरूंना देण्यासारखे शिष्याकडेही काही नसते. शिष्य सद््गुरूंना फक्त त्याच्या हृदयात स्थान देऊ शकतो, त्यांच्या चरणी नतमस्तक राहू शकतो, त्यांच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करू शकतो, त्यांना समर्पित होऊन ज्ञानाचा व शांतीचा अनुभव घेऊ शकतो. गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीगुरूंना शिरसाष्टांग नमस्कार!

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT