health department dr Subhash Salunkhe tanaji sawant bhimrao tapkir sakal
संपादकीय

आरोग्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तिमत्त्व

सकाळ वृत्तसेवा

आरोग्याच्या क्षेत्रात व्यापक आणि समाजहिताचे कार्य केल्याबद्दल तसेच वयाची नुकतीच पंचाहत्तरी पूर्ण केल्याबद्दल डॉ. सुभाष साळुंखे यांच्या गौरव

आरोग्याच्या क्षेत्रात व्यापक आणि समाजहिताचे कार्य केल्याबद्दल तसेच वयाची नुकतीच पंचाहत्तरी पूर्ण केल्याबद्दल डॉ. सुभाष साळुंखे यांच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता. २३) कात्रज येथील भिलारेवाडीतील जनसेवा फाउंडेशनच्या निराधार पुनर्वसन केंद्रात हा कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने....

- डॉ. विनोद शाह

‘प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन’ या विषयात पुणे विद्यापीठातून एम.डी. झालेले डॉ. साळुंके यांनी राज्याच्या आरोग्य सेवेत उपसंचालक ते महासंचालकपदापर्यंत ४० वर्षे सेवा कार्य केले. राज्याच्या विविध समित्या आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा भाग म्हणून देशातील आरोग्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील उद्दिष्टे तर त्यांनी प्रशासक या नात्यांनी पूर्ण केलीच; शिवाय नावीन्यपूर्ण व तर्कशुद्ध मार्गाने ती साकारली. गरजूंसाठी आरोग्य सेवा राबविल्या. ‘युएमएआय डी’च्या साहाय्याने एचआयव्ही/एड्स नियंत्रण विशेष कार्यक्रम तयार करणाऱ्या सदस्यांपैकी ते एक प्रमुख सदस्य होते.

याशिवाय, टास्क फोर्स समितीचे सदस्यही आहेत. टी. बी. कुष्ठरोग संबंधित राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम मूल्यांकन समितीचे ते अध्यक्षही आहेत. तसेच, राज्य आणि राष्ट्रीयस्तरावरील विविध तज्ज्ञ समित्यांचे ते सदस्य आहेत.

‘पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया’च्या अध्यक्षांचे डॉ. साळुंके हे वरिष्ठ सल्लागार आहेत. पुणे, दिल्ली, भुवनेश्वर येथील कार्यालयातून त्यांनी आरोग्य क्षेत्रात केलेले कार्ये कौतुकास्पद आहेत. जागतिक आरोग्य संघटनेवर सहायक प्रादेशिक संचालक म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे कार्य केले.

इंडोनेशियाच्या कार्यालयाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पडली आहे. डॉ. साळुंके यांचे अनेक लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नलमधून प्रकाशित झाले आहेत. कार्यक्षमता, कर्तव्यदक्षता आणि सर्जनशीलता या तिन्ही गुणांचा सुंदर समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात साकारला आहे.

माणसाचे मोठेपण हे त्यांच्या सामाजिक बांधिलकीतून स्पष्ट होते. माणसाच्या आरोग्यासाठी सेवाभावाने प्रशासकीय सेवेत कार्य केलेले डॉ. साळुंके सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात कार्यरत आहेत.

पुण्यातील जनसेवा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेत ते विश्वस्त व संशोधन प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलांची काळजी घेते. ऋणमूल फाउंडेशन संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत.

माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी त्यांना ही जबाबदारी दिली आहे. जनसेवा फाउंडेशनमध्ये डॉ. साळुंके यांचे योगदान मौलिक ठरले आहे. आरोग्य क्षेत्रात आयुष्यभर सेवा कार्याचे अमृतक्षण वेचलेल्या, हसतमुख चेहऱ्याच्या बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावाचे भूमिपुत्र डॉ. साळुंके यांना आगामी कार्यासाठी शुभेच्छा.

(लेखक जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT