Tension sakal
संपादकीय

भाष्य : तणावातून ‘लॉग-आउट’ कधी?

माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रश्नावरील उपाययोजनांचा समग्र विचार आवश्यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

- आनंद पोफळे

माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रश्नावरील उपाययोजनांचा समग्र विचार आवश्यक आहे. व्यवस्थापन आणि कर्मचारी या दोघांच्या पातळीवर काही बदल घडायला हवेत.

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा आपल्याकडे बराच विकास-विस्तार झाल्यानंतर चांगल्या रोजगाराची संधी म्हणून त्याकडे पाहिले जाऊ लागले. तरुणांना वेतनभत्त्यांमुळे या क्षेत्रातील नोकऱ्या आकर्षक वाटू लागल्या. पण ही झाली एक बाजू. या क्षेत्रात काम करताना ज्या प्रकारच्या तणावाला, स्पर्धेला तोंड द्यावे लागते, त्यातून समस्या उभ्या राहतात. त्याच्या चर्चेला पुन्हा तोंड फुटले ते सव्वीस वर्षीय तरुणीच्या आकस्मिक मृत्यूमुळे.

पुण्यातील ‘ईवाय’ ( अर्न्स्ट अँड ॲप यंग) या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या सनदी लेखापाल (सीए) ॲना सेबॅस्टियन या २६ वर्षाच्या तरुणीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तो कामाच्या अतिताणामुळे असल्याचा गंभीर आरोप करणारा ‘ई-मेल’ तिच्या आईने कंपनीच्या भारतातील प्रमुखांना पाठवला. हे पत्र समाजमाध्यमांतून पसरले. याची रीतसर चौकशी होऊन यथावकाश सत्य बाहेर येईल.

पण या निमित्ताने तणावाची समस्या आणि त्यावरील संभाव्य उपाय यांचा ऊहापोह सयुक्तिक ठरेल. कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर तणाव येणाऱ्या गोष्टींबाबत स्वत:ला करता येतील असे बदल वेळीच केले पाहिजेत. त्याचबरोबर व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या ‘वर्क लाइफ बॅलन्स’ साठी केलेल्या उपाययोजना आणि त्याची योग्य अंमलबजावणी होत आहे, की नाही यासाठी नियमित परीक्षण करणे आवश्यक आहे.

मुळात भारत हे उत्पादन, माहितीतंत्रज्ञान, वित्त क्षेत्रातील अनेक जागतिक कंपन्यांचे ‘ऑफशोअर डेव्हलपमेंट सेंटर’ आहे, याशिवाय बहुतांश कंपन्यांमधील ७० ते ८० टक्क्यांहून अधिक कर्मचारी भारतामधून काम करत आहेत. कामाचे स्वरूप गुंतागुंतीचे आणि परस्परावलंबी असल्याने केवळ ९ ते ६ या वेळेत काम संपवणे, हे एक आव्हान आहे.

कित्येकदा ‘कस्टमर मीटिंग’ तसेच ऑन साईटवरील सहकाऱ्यांसोबत बोलण्यासाठी कामाच्या वेळेच्याबाबत बऱ्याचदा तडजोड करावी लागते. वरच्या पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दोन्ही बाजू सांभाळून घेऊन काम करणे मोठे जिकीरीचे होते. कामाचे स्वरूप काही तासांपुरते, केवळ ऑफिसपुरते मर्यादित राहात नाहीत.

अनेक व्हॉट्सॲप ग्रुप, MS Teams ग्रुप सारख्या माध्यमातून सतत मन गुंतलेलेच राहते. कामाच्या वेळांव्यतिरिक्त कामाचा विचार सतत डोक्यात राहणे, असंख्य बैठकी, काम पूर्ण करण्याच्या तारखा यांमुळे तणावदेखील ‘२४ x ७’ झालाय. पाचवी आर्थिक शक्ती असलेला आपला देश ‘आनंदी देशां’च्या यादीत मात्र १२६व्या क्रमांकावर आहे, हे आजच्या परिस्थितीचे योग्य प्रतिबिंबच आहे.

पाश्चात्य देशांमध्ये अनेक वर्षे एकच प्रकारचे काम करण्यात कित्येकांना फारसे वेगळे वाटत नाही. याउलट आपल्याकडे एखादा मात्र एखाद्याला काही वर्षात पदोन्नती न मिळाल्यास, त्या कर्मचाऱ्यांच्या क्षमतांवर शंका उपस्थित केली जाते आणि या मानसिकतेमुळेच ताण येतोच. अपरिहार्य आहे. याचबरोबर सध्याच्या पिढीची जडणघडणदेखील याला कारणीभूत आहे.

या पिढीमध्ये आपल्या क्षमतांचा पूर्ण विचार न करता, त्यांना झटपट यश आणि पैसा मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. पण या स्पर्धेला सामोरे जाताना योग्य वयात तणावाचे व्यवस्थापन करण्याविषयी आवश्यक असे मार्गदर्शन मिळताना दिसत नाही. तणाव घेण्याची वृत्ती ही व्यक्तिसापेक्ष आहे.

कंपनीमध्ये एकाच प्रकारचे काम अनेक कर्मचारी करत असतात, काही जण ते आव्हानात्मक असूनही त्यात झोकून देऊन काम करू शकतात, तर काहींना त्याचा खूप ताण येऊ शकतो. तेव्हा वैयक्तिक पातळीवर आपल्या क्षमतांचा पूर्ण विचार करून, आपली आवड काय आहे, कुठल्या गोष्टींमध्ये आपल्याला काम करताना ताण येतो याच्याकडे बारकाईने लक्ष देऊन, वेळीच आपल्या सहकाऱ्यांशी, अधिकाऱ्यांशी मोकळेपणाने बोलणे हेदेखील प्रत्येकाने आवर्जून अमलात आणले पाहिजे; परंतु मला हे काम जमणार नाही किंवा ते करायला वेळ लागेल, असे सांगण्यात बऱ्याच जणांना कमीपणा वाटतो, तर कधी याचा परिणाम आपल्या कामगिरीच्या मूल्यमापनावर होईल, अशा भीतीने अनेकदा कर्मचारी याबद्दल चर्चाच करत नाहीत.

छंद, व्यायाम, ध्यान

वैयक्तिक पातळीवर तणाव कमी करण्यासाठी आपले छंद जपणे, व्यायाम आणि ध्यान यासोबतच तणाव येण्याचे मूळ कारण शोधून काढून त्यावर वेळीच उपाययोजना केल्यास या तणावावर मात करणे शक्य आहे. बहुतेक भारतीयांच्या ‘डीएनए’ मध्ये नाही म्हणता न येणे हा दोष आहे. तोदेखील या तणावाला आमंत्रण देतो. अनेक कंपन्यांमध्ये अधिकारीवर्ग कामाच्या ‘डेडलाईन’ साठी ‘कृत्रिम दबाव’ निर्माण करतो.

उदाहरणार्थ, प्रत्यक्ष कामाची डेडलाइन तीन दिवसाची असल्यास उच्चपदस्थ ते अडीच दिवसांतच केले पाहिजे, अशी अपेक्षा करतात, तर त्यांच्याखालचे अधिकारी कर्मचाऱ्यांना ते दोन दिवसातच करून देण्याची मागणी करतात. परिणामस्वरूप हा ताण प्रत्येक पातळीवर उतरतो.

योग्य तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी लोकांमध्ये आणि अधिक जलदपणे काम करून देणे अशा प्रकारची उद्दिष्टे अनिवार्य केली आहेत. कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थेमध्ये ‘व्यवस्थापक’ पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांची ‘भावनिक बुद्धिमत्ता’ कशी विकसित करता येईल, यासाठी आग्रहपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे.

आपल्या टीममधील कच्चे दुवे, बलस्थाने, परस्परसंबंध याचा उत्तम अभ्यास असलेला व्यवस्थापक कर्मचाऱ्यांमधील तणाव दूर करणारा मोठा दुवा आहे. अनेक कंपन्यांमध्ये ‘मनुष्यबळविकास विभाग, कर्मचाऱ्यांच्या तणाव व्यवस्थानासाठी, त्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राहावे यासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवतात. याबरोबरीने कर्मचाऱ्यांचे ‘वर्क -लाइफ बॅलन्स’ कसे मोजता येईल, याचा विचार व्हायला हवा. नव्या कल्पना पुढे यायला हव्यात.

अन्यथा कर्मचाऱ्यांसाठी ‘कल्याणाचे कार्यक्रम’ अनेक होतील. पण त्याचा उपयोग होईल का? किती कर्मचारी कामाच्या ठरलेल्या वेळांच्या पलीकडे काम करत आहेत? किंवा ४०-४५ तासापेक्षा अधिक काम करत आहे का? अशा प्रकारची ‘माहिती’ घेणे ही केवळ सुरवात आहे. अशा प्रकारचे काम का करावे लागत आहे, कर्मचारी आणि अधिकारी यांचा संवाद कसा आहे, यावर लक्ष दिले जावे.

मोकळे वातावरण हवे

कर्मचारी अडचणी मोकळेपणाने मांडू शकतील, अशी कार्यसंस्कृती प्रत्यक्षात आणण्याची गरज निर्माण झाली आहे.मर्यादित प्रमाणात तणाव हा काम वेळेवर आणि गुणवत्तापूर्वक करण्यासाठी आवश्यक आहे; परंतु त्याचा अतिरेक घातकच. तेव्हा वर्षाखेर आर्थिक ताळेबंदाचे जसे लेखापरीक्षण (ऑडिट) होते, तशी कंपन्यांमध्ये ‘वर्क- लाइफ बॅलन्स’ची मोजणी कशी केली जाते आणि ती परिणामकारक आहे का, याचीदेखील नियमित तपासणी करणे मनुष्यबळ विकासाचे प्रमुख उद्दिष्ट असावे.

मागच्या महिन्यातच ऑस्ट्रेलियामध्ये नोंदणीकृत कंपन्यांचे नियमन करणाऱ्या ‘फेअर वर्क कमिशन’ने लक्षावधी ऑस्ट्रेलियन कर्मचाऱ्यांना कामाच्या तासांच्या बाहेर त्यांच्या बॉसकडे दुर्लक्ष करण्याची अधिकृत परवानगी दिली आहे, याचा अर्थ कंपनीकडून अशा प्रकारचे ‘कॉल’ येणार नाहीत असा नाही, तर कर्मचाऱ्यांना योग्य कारण असेल तर अशा प्रकारचे कॉल न घेण्याची म्हणजे ‘राइट टू डिसकनेक्ट’ होण्याची अधिकृत परवानगी मिळाली आहे.

अशा प्रकारचा कायदा जगभर माहिती तंत्रज्ञान आणि सेवा पुरवणाऱ्या भारतासारख्या देशात करता येणे शक्य आहे का, हा कळीचा मुद्दा आहे; पण अशा प्रकारच्या कायद्याने कर्मचाऱ्यांना ‘वर्क लाइफ बॅलन्स’ सांभाळणे शक्य होईल का, याचा विचार करायला हवा.

आता सरकारलाही जाग आली आहे, असे दिसते. देशाच्या विकासात ५० टक्क्यांहून अधिक योगदान देणाऱ्या सेवाक्षेत्रातील वाढत्या तणावाच्या या मुद्द्यावर सर्व बाजूनी चर्चा होऊन याबाबत योग्य मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरणांची अंमलबजावणी होईल, ही अपेक्षा.

(लेखक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित असून ‘विमर्श कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’चे संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT