lata chatre writes about mental health Living in a multicultural and multi-religious society Sakal
संपादकीय

निरामय जीवनासाठी...

प्रत्येकाला आपल्या संस्कृती, धर्माविषयी अभिमान असणे स्वाभाविकच

सकाळ वृत्तसेवा

प्रत्येकाला आपल्या संस्कृती, धर्माविषयी अभिमान असणे स्वाभाविकच

- लता छत्रे

आ पण आज बहुसांस्कृतिक आणि बहुधार्मिक समाजामध्ये राहत आहोत. प्रत्येकाला आपल्या संस्कृती, धर्माविषयी अभिमान असणे स्वाभाविकच आहे. म्हणूनच शांत, निरामय, निकोप जीवनासाठी अशा बहुसांस्कृतिक आणि बहुधार्मिक समाजामध्ये संवाद, सामंजस्य आणि एकोपा कायम राखणेही आवश्यक असते. त्यासाठी गरज असते ती मानसिक आरोग्याची.

मन सकारात्मक आणि स्वास्थ्यपूर्ण असेल तर आपले इतरांशी असलेले संबंध मनमोकळे आणि सामाजिक वातावरण उल्हसित करणारे होतात. निरामय जीवनासाठी मानसिक आरोग्य महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यासाठी सकारात्मक विचार रुजवायला पाहिजेत. मनाला तसे वळण लावण्याचा मार्ग म्हणजे ब्रह्मविहार होय.

ब्रह्मविहार ही गौतम बुद्धांनी दुःख मुक्तीसाठी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गातील ‘सम्यक समाधी’ या अंगाची एक पायरी आहे. त्याच्या अभ्यासाने मनातील राग, लोभ, द्वेष आदी अकुशल किंवा अनैतिक धर्म दूर होतात.

त्याची जागा अराग, अलोभ, अद्वेष आदी कुशल धर्म घेतात. ब्रह्मविहार म्हणजे ब्रह्माचा विहार. ब्रह्म या शब्दाने ब्रह्मदेव किंवा वेदांतातील अभिप्रेत असलेले ब्रह्मन नाही तर ज्यांनी सम्यक ज्ञानाने आणि अथक प्रयत्नांनी आपल्या राग, लोभ, द्वेष, तृष्णा आदी कुशल विकाराचा समूळ उच्छेद करून अराग, अलोभ, अद्वेष आदी सद्गुणांची वृद्धी केली आहे अशा व्यक्ती.

असे म्हणता येईल की अशा लोकांचा विहार म्हणजे ब्रह्मविहार होय. ब्रह्मविहार व्यक्तीच्या मानसिक शुचितेचे प्रतिनिधित्व करतो. ब्रह्मविहारामध्ये मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या कुशल चित्तवृतींचा समावेश आहे. सम्यक ज्ञान हा ब्रह्मविहाराचा पाया आहे. सम्यक ज्ञान म्हणजे ‘आत्मा नावाचे कोणतेही नित्य तत्त्व अस्तित्वात नाही आणि जगातील प्रत्येक व्यक्ती, तिच्या मनोवृत्ती आणि वस्तू अनित्य असतात’ असे आपल्याला झालेले ज्ञान होय.

या ज्ञानामुळे आपल्यामधील दुर्गुणांचा ऱ्हास होऊन सद्गुणांचा विकास होतो. मनामध्ये अन्य व्यक्तींविषयी मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या कुशल चित्तवृत्त जागृत होतात. परिणामी आपल्या बोलण्यात, वागण्यात गोडवा आणि मार्दव येते.

मैत्री म्हणजे सर्व प्राणीमात्रांविषयी तसेच शत्रू विषयीसुद्धा आत्यंतिक आणि निस्सीम प्रेम. करुणा म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या दुःखात सहभागी होणे, अर्थात दुसऱ्याचे दुःख पाहून आपणही दुःखी होणे हेच केवळ येथे अभिप्रेत नाही तर त्या दुःखी-कष्टी व्यक्तीला तिच्या दु:खापासून मुक्त करणे हे सुद्धा अभिप्रेत आहे.

मुदिता म्हणजे दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी होणे. जर कोणी व्यक्ती आनंदी असेल तर तिचा आनंद पाहून आपली वृतीही आनंदी होणे. उपेक्षा म्हणजे तटस्थता. जीवनात येणाऱ्या सुख-दुःखाच्या प्रसंगाकडे समदृष्टी बघणे. उपेक्षा म्हणजे सुख-दुःखाच्या प्रसंगी जमिनीवर भक्कमपणे पाय रोवून उभे राहणे.

‘सम्यक समाधी’मध्ये ब्रह्मविहाराला महत्त्व असते. कारण मन एकाग्र होण्यासाठी वाईट भावनांचा बिमोड गरजेचा असतो. ब्रह्मविहाराच्या अभ्यासामुळे व्यक्तीची मानसिक शुचिता होते, मानसिक आरोग्य लाभते आणि त्याचा परिणाम व्यक्तीच्या सामाजिक जीवनावरही होतो. कारण बौद्ध धर्मामध्ये असे मानलेले आहे की आपले मन जर कुशल गुणांनी युक्त असेल तर त्याचे प्रतिबिंब कायिक आणि वाचिक कर्मावर पडते.

म्हणूनच आपल्या सामाजिक जीवनात ब्रह्मविहाराला महत्त्वाचे स्थान आहे. एकाच समाजामध्ये विविध धर्माचे, जमातींचे, संस्कृतीचे लोक एकत्र राहात आहेत. समाजातील प्रत्येक जण माझा धर्म, माझी संस्कृती श्रेष्ठ असे अभिनिवेशाने सांगत असतो. अशा परिस्थितीमध्ये समाजात एकोपा आणि शांतता राखणे महत्त्वाचे असते.

त्याची सुरवात आपल्यापासून करायला पाहिजे. आपल्या मनात अन्य व्यक्ती विषयीचे द्वेष, मत्सर, लोभ दूर तर करावेच लागतील पण स्वतःविषयीचा अहंकार आणि अहंभावसुद्धा दूर करायला हवा. आपल्या मनात मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या नैतिक गुणांना रुजवून त्यांचा विकास केला पाहिजे. त्यासाठी सद्सद्विवेकबुद्धीला स्मरुन स्वतःच्या आणि जगाच्या सुखासाठी वाईट वृत्तींवर मात करून चांगल्या आणि नैतिक वृत्तीचा विकास ब्रह्मविहाराच्या माध्यमातून केला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT