Maharashtra the land of sant social reformers intellectuals era of progressive ideas shahu maharaj esakal
संपादकीय

समाजाचा उलट दिशेचा प्रवास धोक्याचा

संतांची, समाजसुधारकांची आणि विचारवंतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात प्रागतिक विचारांची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि येथील जनतेनेही पुरोगामी  विचारांना बळ दिले.

सकाळ वृत्तसेवा

संतांची, समाजसुधारकांची आणि विचारवंतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात प्रागतिक विचारांची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि येथील जनतेनेही पुरोगामी  विचारांना बळ दिले.

संतांची, समाजसुधारकांची आणि विचारवंतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात प्रागतिक विचारांची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि येथील जनतेनेही पुरोगामी  विचारांना बळ दिले. परंतु सद्यःस्थितीतील राजकारण समाजाला पुन्हा एकदा अठराव्या शतकाकडे नेत असल्याची खंत वाटते. राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती. राजर्षी शाहूंनी घालून दिलेली पुरोगामी विचारांची शिकवण पुन्हा एकदा अधोरेखित करण्याची आवश्‍यकता आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक लोकशाहीचे पुरस्कर्ते होते.  त्यांनी  दिलेला सामाजिक सलोख्याचा मंत्र  नव्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी व बहुजन समाजाच्या उद्धारासाठी राजर्षींनी उत्तुंग काम केले.

जातिभेदावर प्रहार करताना अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी ठोस पावले उचलली. सर्व जाती-धर्मांच्या मुलांसाठी समान व मोफत शिक्षणाबरोबरच गावच्या पाटलाने कारभार चालवावा यासाठी ‘पाटील शाळा’,  प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण तसेच विविध तंत्रे व कौशल्य शिकवणाऱ्या शाळा, बहुजनांसाठी वैदिक पाठशाळा,  संस्कृत शाळा सुरू करून शिक्षणाची दारे खुली केली.

आज सर्वच जण राजर्षी शाहूंच्या नावाचा जयजयकार करत असले, तरी शालेय विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे विचार रुजवण्याची आवश्‍यकता आहे. शालेय अभ्यासक्रमात राजर्षीं शाहूंच्या विचारांचा व्यापक समावेश व्हायला हवा.

समाजमन बदलण्यासाठी  केवळ पुस्तकातूनच नव्हे तर छोट्या छोट्या गोष्टींमधूनही हा विचार रुजवला जायला हवा आणि ही जबाबदारी प्रत्येक पालकाची, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांचीही आहे. 

काही दिवसांपूर्वी शाहूनगरीमध्ये घडलेली घटना ही राजर्षी शाहूंच्या  विचारांना धक्का लावणारी घटना होती. लोकांची डोकी  भडकावून बाजूला होणारे तथाकथिक राजकीय आणि सामाजिक नेतेच त्याला जबाबदार आहेत.

ज्यांच्याकडून हे कृत्य घडले ते जन्मतः गुन्हेगार नाहीत किंवा ते त्यासाठीच रस्त्यावर आले होते, असे म्हणता येणार नाही.  घडलेल्या घटनेबाबत कायदेशीर कारवाई होत असली  तरी त्या मुलांचे  किंवा कार्यकर्त्यांचे मनपरिवर्तन करण्याची किंवा त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ही समाजाचीच आहे.

त्यासाठीच शाहू विचारांवर चालण्याची भूमिका प्रत्येकाने घ्यायला हवी. केवळ कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण देशभरातील समाज एकसंध राहण्याची आवश्‍यकता आहे. कोणी त्यातील त्रुटी शोधून गैरफायदा घेऊ नये, अशीच भूमिका प्रत्येकाची असायला हवी.

स्वतःच्या कृतीतून युवा वर्गाला मार्ग दाखवून सलोखा स्थापन करणे, ही आजची नितांत गरज आहे आणि तीच राजर्षी शाहू महाराजांना खरी आदरांजली ठरेल.

धर्मापेक्षा राष्ट्र प्रथम

जाती-धर्मातील एकोपा टिकविताना शाहू महाराजांची धर्मविषयक भूमिका अगदी स्पष्ट होती. ‘सायंटिफिक इंडिया’ ही संकल्पना स्वीकारताना ‘आध्यात्मिक भारत’ ही संकल्पनाही त्यांनी स्वीकारली.

पण, या दोन्ही  संकल्पनांचा अतिरेक होऊ न देता त्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. राष्ट्र ही संकल्पना लोककल्याणाशी जोडली. राज्य, राष्ट्र, धर्म, इतिहास, नागरी समाज या सर्वांचा शाहू महाराजांनी एकत्रित मेळ घातला.

आजच्या राजकीय नेत्यांनी त्याचा अभ्यास करण्याची आवश्‍यकता आहे.  शाहूंचे विचार मानणारे अनेक नेते - कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडून शाहू विचारांचा प्रसार होत असताना  तरुण वर्गापर्यंत हे विचार पूर्णपणे पोहोचत नाहीत. पोहोचवण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्‍यकता आहे.

राजर्षी शाहूंच्या विचारांच्या प्रसाराची पहिली पायरी शालेय पातळीवर असणे ही काळाची गरज बनलेली आहे. आधुनिक भारतीय राज्यसंस्थेची स्थापना हा ‘आयडिया ऑफ इंडिया'' संकल्पनेशी सुसंगत असणारा विचार राजर्षी  शाहू महाराजांनी मांडला.  

त्यांनी धार्मिक सुधारणांचा विचार स्वीकारला होता.  धर्म आणि राष्ट्र यापैकी राष्ट्राला अव्वल स्थान दिले होते. असे असूनही शाहू महाराजांनी धार्मिक श्रद्धांचा आणि धार्मिक सुधारणांचा पुरस्कार केला होता.

पण  सामाजिक आणि राजकीय सुधारणा यांच्याशी जुळता असा अध्यात्माचा विचारही स्वीकारला होता.  राजर्षी शाहू महाराज आयुष्यभर सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी व बहुजन समाजाच्या उद्धारासाठी सदैव कार्यरत राहिले.

 त्यांनी आपल्या संस्थानामध्ये लोकांना एकाच पातळीवर आणण्यासाठी २६ जुलै १९०२ मध्ये आरक्षणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.  पन्नास टक्के जागा या मागासलेल्या लोकांसाठी भराव्यात, असा हा जाहीरनामा म्हणजे क्रांतिकारी निर्णय होता.

मागासलेल्या सर्व जातींसाठी हा निर्णय सूर्योदयाच्या नव्या किरणांप्रमाणे होता. या जाहीरनाम्याचा परिणाम शिक्षणाच्या चळवळीवर सकारात्मक व्हावा, अशी अपेक्षा महाराजांची होती.  

सर्व जाती-धर्मांसाठी वसतिगृहे

तळागाळातील लोकांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी शाळा सुरू केल्या. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासाचा हा प्रश्न समोर उभा ठाकताच त्यांनी त्यावर तातडीने मार्ग काढत सर्व विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह सुरू केले.

त्या वेळी जाती व्यवस्थेचा  लोकांवर पगडा होता. परिणामी या वसतिगृहातून उच्चवर्णीय वगळता अन्य विद्यार्थी कमी होऊ लागले. महाराजांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर जातिव्यवस्थेचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होऊन त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये,

म्हणून  १९०१ला व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग सुरू केले. त्यानंतर मराठा बोर्डिंगचे यश पाहता  प्रत्येक जातवार वसतिगृहे सुरू केली.  १९०१ ते १९२२ या काळात वेगवेगळ्या जातींची २३  विद्यार्थी वसतिगृहे  निर्माण करून  राजर्षी शाहू महाराजांनी मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली.

अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणसाठी परदेशी जाण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या.  शाहू महाराजांनी कोल्हापुरात सुरू केलेल्या शैक्षणिक वसतिगृहामध्ये दिगंबर जैन बोर्डिंग, लिंगायत वसतिगृह, मुस्लिम बोर्डिंग, मिस क्लार्क होस्टेल,

दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग, पांचाळ ब्राह्मण वसतिगृह, गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह, ख्रिश्चन होस्टेल, कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह, वैश्य बोर्डिंग, ढोर चांभार बोर्डिंग यांचा समावेश होता आणि आजही त्यातील बहुतेक सर्व वसतिगृहे सक्षमपणे सुरू आहेत.

केवळ कोल्हापूरचाच विचार न करता नाशिक, नगर, नागपूर, पुणे या आपल्या संस्थानाबाहेर असणाऱ्या मोठ्या शहरांतही  गोरगरीब आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी  महाराजांनी वसतिगृहे  सुरू केली.  भटक्या लोकांच्या आयुष्यात स्थिरता यावी, यासाठी घरकुल योजना अंमलात आणली. त्यासाठी त्यांना जमिनीही इनाम दिल्या.

भानावर येण्याची हीच वेळ

सामाजिक सलोखा  बिघडतोय म्हणून ओरड करताना युवकांकडे बोट दाखवले जाते;  पण युवा पिढी घडवण्याचे काम पालक आणि शिक्षकाप्रमाणे राजकीय नेत्यांकडूनही  होत असते. राजकीय नेत्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून राजर्षी शाहूंचे संस्कार कार्यकर्त्यांत रुजवावेत, म्हणजे सलोख्यासाठी किंवा सामाजिक समतेसाठी वेगळे काही करण्याची गरज भासणार नाही.

सत्तेसाठी किंवा सत्ता टिकवण्यासाठी सामाजिक संतुलन बिघडवण्याचे कृत्य अनेक वेळा घडत असते. सामाजिक सलोखा  बिघडवण्याचे काम केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात घडत आहे. तेथील पोलिस प्रशासनाला त्यामुळे अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे सलोखा घडवण्यासाठी सर्वच नेत्यांकडून प्रयत्न होण्याची अत्यंत आवश्‍यकता आहे. राजर्षी शाहूंचा  जयजयकार करणाऱ्या राजकीय नेत्यांनी भानावर येण्याची हीच वेळ आहे. आत्ता जर ही मंडळी भानावर आली नाहीत आणि त्यांच्याकडून योग्य ती पावले टाकली गेली नाहीत तर तर भविष्य अंधःकारमय असेल.

- श्रीमंत शाहू छत्रपती महाराज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT